• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बेरोजगारांना लॉजिस्टिक क्षेत्र खुणावतंय!

योगेंद्र ठाकूर बेधडक

Marmik Team by Marmik Team
July 31, 2026
in बेधडक
0
बेरोजगारांना लॉजिस्टिक क्षेत्र खुणावतंय!

शिक्षित असण्याबरोबर प्रशिक्षित असणेही नोकरी-व्यवसायासाठी महत्त्वाचे आहे. या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी योग्यता-पात्रता आणि कुशलता मराठी युवकांच्या अंगी असणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रात नोकरी-व्यवसायात मराठी तरुण मागे राहू नयेत म्हणून पूर्वीपासूनच लोकाधिकार समिती महासंघातर्फे बँका, विमा-विमान क्षेत्र, तेल व वायुक्षेत्रात कारकून व अधिकारी वर्गासाठी परीक्षापूर्व प्रशिक्षण वर्ग भरवले जात आहेत. आता काळाची पावले ओळखून ‘इंपोर्ट-एक्सपोर्ट लॉजिस्टिक’ क्षेत्रातील ज्या विविध संधी नोकरी-व्यवसायात उपलब्ध आहेत त्याचा लाभ मराठी तरुणांनी घ्यावा यासाठी लोकाधिकार समिती महासंघातर्फे ‘इंर्पोर्ट-एक्स्पोर्ट’ लॉजिस्टिक प्रशिक्षण वर्ग मार्च महिन्यापासून भरवले जात आहेत.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि इंडियन इस्टिट्यूट ऑफ फ्रंट फॉरवर्ड्स (एफएफएआयची शिक्षण शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे मार्च महिन्यात झाले. त्यावेळी विद्यमान अध्यक्ष अमित कामत यांनी अभ्यासक्रमातून उपलब्ध होणार्‍या नोकरीच्या संधींची माहिती दिली. एफएफएआयचे माजी अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी लॉजिस्टिकमधून देश आणि विदेशात नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात याची माहिती दिली. तेव्हा फेडरेशन आणि लोकाधिकार समिती महासंघाच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला.

शिवसेना भवनात हा अभ्यासक्रम २८ मार्चपासून सुरू झाला. पहिली बॅच प्रशिक्षित झाली व आता दुसरी बॅच सुरू झाली आहे. या कोर्सच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. पाच आठवडे दर शनिवारी सहा तासांचा वर्ग आहे. विद्यार्थ्यांना आयात-निर्यात, लॉजिस्टिक याच्यासह विमानतळ आणि बंदरातील मालवाहतुकीची माहिती देण्यासाठी भेटी आणि लॉजिस्टिक या विषयातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल, तसेच कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणूनच कामाचा अनुभवही दिला जाईल. अधिक माहितीसाठी शिवसेना भवनमधील स्थानीय लोकाधिकार समितीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोर्ट व संबंधित प्रकल्पात नोकरी रोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल. याची नोंदणी व माहिती शिवसेना भवन दादर (पश्चिम) येथे मराठी तरुण-तरुणींना मिळणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या उमेदवाराला सर्टिफिकेट दिले जाईल आणि नोकरी-रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. जवाहरलाल नेहरू पोर्ट, कांडला पोर्ट, अदानी पोर्ट व तत्सम होऊ घातलेल्या प्रकल्पात त्यांना नोकरी-व्यवसाय करण्याची संधी निश्चितच मिळणार आहे. पहिल्या बॅचमध्ये काही उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना आठवड्याच्या आत रोजगाराची संधीही मिळाली. या अभ्यासक्रमामुळे मराठी तरुण-तरुणी खासगी कंपन्या व कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम असतील. सुशिक्षित व होतकरू तरुण-तरुणी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वतःच आयात-निर्यात व्यवसायही सुरू करू शकतील.

‘एक्स्पोर्ट-इंपोर्ट लॉजिस्टिक्स कोर्स’च्या पहिल्या बॅचचा प्रमाणपत्र वितरण सोहळा शिवसेना भवन येथे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. शिवसेना नेते खासदार अनिल देसाई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपक्रमाचे कौतुक करत तरुणांच्या सक्षमीकरणासाठी हे एक परिवर्तनीय पाऊल असल्याचे सांगितले. लॉजिस्टिक्स हे देशाच्या आर्थिक वाढीचे महत्त्वाचे क्षेत्र असून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित तरुण ही सध्याची मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तर अनिल देसाई यांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि कौतुक केले. ६०० उमेदवारांची प्रतीक्षा यादी आहे. सर्वांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे व त्यानंतर नोकरी-व्यवसायाचीही संधी मिळणार आहे. शंतनू भडकमकर आणि अमित कामत यांनी या कोर्ससाठी व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि महासंघाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई व सरचिटणीस प्रदीप मयेकर यांचे आभार मानले. अनिल देसाई यांनी या कोर्ससाठी सर्वतोपरि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्या-त्या क्षेत्रात कुशल बनावे म्हणून लोकाधिकार समिती महासंघातर्फे वेळोवेळी प्रशिक्षण वर्ग भरवले जातात. काळाची पावले ओळखून व इम्पोर्ट-एक्स्पोर्ट लॉजीस्टिक क्षेत्रात नोकरी-व्यवसायाची चांगली संधी असल्यामुळे व त्याचा फायदा मराठी तरुण-तरुणींना मिळावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. पहिल्या बॅचमधील ४० उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र ठाकूर यांनी लेखन-संपादन केलेले ‘ठाकरे-प्रबोधनकार ते आदित्य’ या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली.

या सोहळ्यास एफएफएफएआयचे माजी अध्यक्ष दुष्यंत मुलानी, अखिल  महाराष्ट्र लॉजिस्टिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकर (नाना) हळदणकर, स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, बीसीबीए अध्यक्ष संजीव हराळे, लॉजिस्टिक्स आणि फ्रंट फॉरवर्डिंग क्षेत्रातील मनोहर पटयाने, विनायक अपराज, संजय शिंगोटे, प्रशांत पोपट, केतन देसाई, चैताली मेहता, मिहीर भडकमकर आदी मान्यवर उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अमित कामत, शंतनू भडकमकर तसेच योगेंद्र ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. ह्या उपक्रमासाठी ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांना लवकरात लवकर प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल अशी माहिती नाना हळदणकर आणि प्रदीप मयेकर यांनी दिली. या कोर्ससाठी महासंघाचे पदाधिकारी सर्वश्री दिनेश बोभाटे, शरद एक्के, सुधाकर नर, श्रीराम विश्वासराव, उमेश नाईक, उल्हास बिल्ले, मयूर सावंत आदींनी अतोनात परिश्रम घेतले.

Previous Post

लाडकी बहीण योजना युतीच्या लुटीचा खजिना

Next Post

विक्रमवीर मुख्यमंत्री महोदय,पाठिंब्याची आठवण ठेवा!

Next Post
विक्रमवीर मुख्यमंत्री महोदय,पाठिंब्याची आठवण ठेवा!

विक्रमवीर मुख्यमंत्री महोदय,पाठिंब्याची आठवण ठेवा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.