• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

marmik by marmik
April 30, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
फटकारे बाळासाहेबांचे

मार्मिकच्या ३ मे १९७० या तारखेच्या अंकाचे हे मुखपृष्ठ एका अर्थाने विलक्षण आहे, मुखपृष्ठावरील व्यंगचित्र म्हणून त्याची रचना आजही अनेकांना चकवून जाईल. प्रयोगशील व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी मास्टहेड म्हणजे अंकाचे नाव, त्यासमोरची मोकळी जागा, खालच्या चौकटीत चित्र ही नेहमीची रचना बाजूला ठेवून मार्मिक हे शीर्षक उभे केले आहे आणि बाकीची सगळी जागा चित्राने भरली आहे. हा कागदांचा ढिगारा आहेत, त्यात महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक हरवले आहेत, वर पंतप्रधान इंदिरा गांधी याही चिंताग्रस्त आहेत, त्या तोडगा सापडतो आहे का, ते पाहतायत. शिवसेनेमुळे बिदर, भालकी, बेळगाव, विजापूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणा दुमदुमत होती. तोडगेच तोडगे सुचवले गेले, पण त्यांच्यातून कालापव्ययापलीकडे काहीही साधणं शक्य नव्हतं. या तोडग्यांच्या ढिगार्‍यात हा प्रश्नच हरवून जाईल, ही शिवसेनाप्रमुखांची अटकळ किती खरी होती, ते आपण आजही पाहतो आहोत. आजही हा प्रश्न सुटलेला नाही आणि काळाच्या ओघात त्याची धारही बोथट होऊन बसली आहे. कर्नाटकाने मराठी प्रांत गिळून टाकल्यात जमा आहे… एक मात्र बरं आहे या चित्रात, की महाराष्ट्राच्या एका प्रश्नाच्या बाबतीत पंतप्रधान किमान काही विचार करताना दिसत आहेत… महाराष्ट्रातले उद्योग पळवायचे, मुंबई महाराष्ट्रातच ठेवून महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेचा, मराठी माणसाचा उपमर्द करायचा आणि निवडणुका आल्यावरच टोपी, पगडी वगैरे घालून महाराष्ट्राशी जुनं नातं असल्याच्या थापा मारायच्या, यातलं काही त्या करताना दिसत नाहीत.

Previous Post

‘ती’ नुसती लाभार्थी की निर्णयकर्ती!

Next Post

विहिरी बुजवू नका, सुरक्षित बनवा!

Next Post
विहिरी बुजवू नका, सुरक्षित बनवा!

विहिरी बुजवू नका, सुरक्षित बनवा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.