• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पत्रकारांच्या डोक्यावर हॅम्लेटचे भूत

अ‍ॅड. नोएल डाबरे (विशेष लेख)

marmik by marmik
June 29, 2026
in विशेष लेख
0
पत्रकारांच्या डोक्यावर हॅम्लेटचे भूत
मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या शासनकाळामध्ये विचार स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे. भारतामधील सर्व माध्यमे मोदी सरकारचे गुणगान गाताना आढळून येत आहेत. भारतामध्ये गरिबी, महागाई, बेरोजगारी, वाहतूक व्यवस्था समस्या आदी कोणत्याही प्रश्न उरलेले नाहीत, असे चित्र सध्या रंगवले जात आहे. हे चित्र खोटे आहे. हे सिद्ध करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. परंतु भारतातील जवळपास सगळे पत्रकार विकले गेले आहेत. त्यांनी शरणागती पत्करली आहे. भारताचे हे दुर्दैव आहे. पत्रकारांनी स्वतःभोवती विणलेल्या जाळ्यातच भारतीय पत्रकार सापडलेले आहेत.
लच्या कार्यकारी संपादिका सुप्रिया शर्मा या धडाडीच्या पत्रकार. सरकारला प्रश्न विचारणार्‍या निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना पत्रकारितेचा वीस वर्षांचा अनुभव आहे. भारतातील अत्यंत दुर्गम भागात जाऊन त्यांनी पत्रकारिता केली आहे. छत्तीसगडमधील माओवादी संघटनांच्या प्रभावावर त्यांनी शोध निबंध लिहिलेले आहेत. मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरूपयोग करून राजकीय विरोधकांना कसे घाबरवते, यावर सुप्रिया शर्मा यांनी अहवाल प्रसिद्ध केलेले आहेत. रामनाथ गोएंका पुरस्कार, चमेलीदेवी पुरस्कार आदी सर्व मोठ्या पारितोषिकांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
कताच त्यांनी ओस्लो फ्रीडम फोरम २०२६ या कार्यक्रमात भाषण केले. त्या म्हणाल्या ‘भारतामध्ये सध्या विचारस्वातंत्र्याची मोठ्या प्रमाणात गळचेपी होत आहे. स्वतंत्र पत्रकारिता लोप पावत आहे. पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरूंगात टाकले जात आहे. भारतात लोकशाही केवळ दिखाव्यापुरती शिल्लक उरली आहे. भारतातील सत्य परिस्थितीवर लिहिले तर त्याची जबर किंमत मोजावी लागते. आपण उत्तर प्रदेशातील एका दलित महिलेच्या दैनंदिन खडतर जीवनावर प्रकाशझोत टाकणारे वृत्त लिहिले होते. ते योगी सरकारला इतके झोंबले की त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. अटकेपासून बचाव व्हावा यासाठी दोन महिने ताटकळत राहावे लागले. तेव्हा कुठे जामीन मिळाला. मी लेखात दलितविरोधी भाष्य केल्यामुळे दलितांच्या भावना भडकल्या असा आरोप टाकून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतातल्या सगळ्या नामवंत पत्रकारांना अशा प्रकारची भीती दाखवून मोदी सरकारने त्यांना नमवल्याचे सुप्रिया म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की अर्णव गोस्वामी, राजदीप सरदेसाई, सुधीर चौधरी, शेखर गुप्ता, अंजना कश्यप, राहुल कनवाल आदी पत्रकार २०१४च्या अगोदर काँग्रेस सरकारवर घणाघाती हल्ला करीत होते. काँग्रेसच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडत होते. आता मात्र ते मूग गिळून बसलेले आहेत. खोट्या बातम्या, मनोरंजक बातम्या किंवा धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या बातम्या देणे यात धन्यता मानत बसले आहेत. भारतीय पत्रकारांचे मला हसू येते. त्यांनीच विणलेल्या जाळ्यात ते फसलेले आहेत. आपल्या पत्रकारितेचा दुरुपयोग करून घेतला जातो, याचे भान या पत्रकारांना असते तर आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली नसती.
भारतामध्ये मुक्त पत्रकारितेला १९९० नंतर चालना मिळाली. जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रे आणि वाहिन्या अस्तित्वात आल्या. त्यातील पत्रकारांनी देशातील लोकशाहीचा फायदा घेऊन सरकारवर प्रचंड टीका केली. त्यांच्या विचार स्वातंत्र्यावर २०१४ पर्यंत बंधने लागली नव्हती. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नव्हते. त्या काळात सरकारवर पत्रकार जहरी टीका करीत होते. त्यांचा प्रभाव जनमतावर होत होता. लोकशाहीचे मूल्य मानत त्यांच्यावर सरकारे कारवाई करत नसत. नरसिंह राव, देवगौडा, अटल बिहारी, मनमोहन सिंग या सर्व सरकारांना त्यांचे त्यांचे श्रेय द्यावे लागेल. काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांचे प्रकरण आठवा. ते क्रीडामंत्री असताना त्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप करीत पत्रकारांनी त्यांना भंडावून सोडले होते. ते जिथे जात तिथे पत्रकार त्यांचा पाठलाग करीत. त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारीत, त्यांच्यावर तुटून पडत. त्याचा विपरीत अर्थ पत्रकारांनी काढला. देशातील लोकशाही आपण सुरक्षित ठेवीत आहोत असा त्यांना भ्रम झाला होता. सरकार आपल्यावर गुन्हे दाखल करीत नाही, त्यामुळे आपल्या विचाराचे स्वातंत्र्य राखले गेले आहे, याचा विसर सर्व पत्रकारांना पडला होता. विषारी आणि विखारी टीकेचा फटका मनमोहन सिंग यांना बसला. २०१४मध्ये त्यांचे सरकार गेले. पत्रकारांनी हा आपला विजय मानला. भ्रष्ट सरकार आपण घालवले अशा तोर्‍यात पत्रकार होते.
२०१४नंतर सगळे चित्र बदलले. मोदी सरकारने विचारस्वातंत्र्याची गळचेपी चालू केली. सरकारला प्रश्न विचारणार्‍या पत्रकारांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली. घाबरलेले पत्रकार दिवसरात्र मोदी सरकारचे गुणगान गाऊ लागले. मोदी सरकारने इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षांत आणि सरकारमध्ये आणले. त्या विरोधात विरोधी सूर उमटविण्याचे धैर्य वर नमूद केलेल्या एकाही पत्रकारांमध्ये राहिले नाही. मनमोहनच्या मंत्र्यांना सळो की पळो सर्व सोडणारे पत्रकार शेपूट घालून बसले. ज्या पत्रकारांना वाटत होते की आपल्यामुळे मनमोहनसिंगाचे भ्रष्ट सरकार पडले, त्यांना मोदी सरकारने चालविलेल्या उघड भ्रष्टाचाराविरुद्ध प्रश्न विचारण्याचे धैर्य राहिले नाही. Dााज ही मंडळी करोडो रुपये कमावून बसले आहेत. परंतु त्यांनी आत्मा गमावलेला आहे. त्यांच्या धनदौलतीला काडीचीही किंमत नाही. त्यांना भारतीय जनमानसात काडीची किंमत राहिलेली नाही. ते त्यांना देखील ठाऊक आहे. अंतर्मनात ते प्रचंड अस्वस्थ असणार हे सांगायला कोणत्याही आरशाची गरज नाही. हॅम्लेटचे भूत त्यांच्या डोक्यावर बसलेले आहे.
Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post

इथेनॉल : नुकसान भरपाई कोण करणार?

Next Post
इथेनॉल : नुकसान भरपाई कोण करणार?

इथेनॉल : नुकसान भरपाई कोण करणार?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.