• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

Marmik Team by Marmik Team
August 28, 2026
in भाष्य
0
नाय नो नेव्हर

पुण्यात राहुल गांधींनी छात्रों की गूँज कार्यक्रम घेतल्यानंतर मुंबईत एक शिळा बनपाव करपला आहे. त्याचा वापर करून काही वेगळी रेसिपी करता येईल की तो फेकूनच देणे योग्य ठरेल? -यशवंत विचारे, घाटकोपर
आधी ठरवा तुम्हाला रोगाशी लढायचे आहे की रोगाच्या लक्षणांशी… असे किती शिळे बनपाव तुम्ही फेकून देणार? फेकूनच द्यायचे असेल, तर असे ‘बनपाव तयार करणार्‍यांना’ फेकून द्या… हे ज्यांना कळेल त्यांनाच करावं लागणार… एकट्या दुकट्या तुकाराम मुंढेंचं काम नाही.

तुमच्या नाटकांच्या जगात अभिनयाची संधी देण्याच्या आधी कोणती लेखी परीक्षा घेतात? त्यात कोणकोणत्या शब्दांची लघुरूपं, दीर्घरूपं विचारतात? ती उत्तरं येणार्‍याला अ‍ॅक्टिंग आली नाही तरी चालतं का? – विराज जंगम, डोंबिवली
स्क्रीन टेस्ट, ऑडिशन (काही ठिकाणी ‘स्किन’ टेस्ट) अशा खूप काही परीक्षा आहेत आमच्या क्षेत्रात. पण त्या अंधश्रद्धा आहेत… मला सगळं येतं… मला सगळं कळतं… आम्ही खूप अभ्यास करून कलाकृती बनवतो… असं आम्हा लोकांनाच वाटतं… खरी परीक्षा ही मायबाप रसिकांच्या समोरच असते… आम्हाला अ‍ॅक्टिंग येते की नाही येत, हे तेच ठरवतात… आणि त्यावरूनच ठरतं की आमचं रूप दीर्घरूप ठरणार की लघुरूप ठरून आम्ही गायब होणार. आमच्या इथे पेपर फुटून आणि फोडून काही उपयोग नसतो…

जी मुळात अनेक पदार्थांची मिसळण करून बनते, तिची एकच एक रेसिपी नाही, ती मिसळ फक्त आमच्या गावातच ऑथेंटिक मिळते, बाकी ठिकाणी मिळतात त्या मिसळी बोगस आणि कचराच असतात, असं बोलण्याचा कॉन्फिडन्स लोक कुठून आणत असतील?- निकिता राणे, कणकवली
आपल्या गावाबद्दल आणि आपल्या स्वतःबद्दल सांगण्यासारखं दुसरं काहीच नाही, हाच कॉन्फिडन्स अशा लोकांना मिसळीबद्दल सांगण्याचा आत्मविश्वास देतो… आणि चांगल्या क्वालिटीची मिसळ आपल्याला कुठे खायला मिळेल हा विश्वासच नसलेले… आणि अशा मिसळी खाऊन कॉन्फिडन्स गमावलेले… आपल्यासारखे लोक… अशी मिसळ खातात… आणि नंतर होणारा त्रास, हे असे प्रश्न विचारून बाहेर काढतात.
सगळ्या रस्त्यांवर वाहतुकीचे नियम तोडणार्‍या वाहनचालकांच्या गाडीचा नंबर पण स्पष्ट दिसेल इतक्या उच्च दर्जाचे कॅमेरे बसवलेले आहेत सरकारने. रस्त्यातले खड्डे दिसतील असे कॅमेरे कधी बसतील आपल्या देशात? – इरफान हुसेन, प्रभादेवी
एक कॅमेरा रस्त्यावर रोखलेला असताना, अनेक कॅमेरे आपल्याकडे वळलेले आहेत, याचं भान ‘त्यांना’ ज्या दिवशी येईल, त्या दिवशी तसं होण्याची शक्यता आहे. पण एक बोट विरोधकांवर रोखताना, बाकी बोटं आपल्याकडेच वळलेली आहेत याचं भान अजून ‘ज्या’ लोकांना येत नाही, त्यांना कॅमेर्‍याचे भान कसे येणार?

तरुणांना रोजगार नाहीत, अशी बोंब सतत मारली जाते. ठिकठिकाणच्या कवींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून काही विशिष्ट रक्कम घेऊन त्यांच्या कविता ठराविक वेळ ऐकून घेणारे श्रोते तयार झाले तर केवढी रोजगारनिर्मिती होईल?- मोहन घरत, रोहा
वा… वा! स्वतःच्या रोजगाराच्या निर्मितीची आयडिया छान आहे… लाडके रसिक योजना या नावाने सुरू करा अशी योजना… लोकांना काही काम देऊ न शकणारे, अशा योजना सुरू करून लोकांना बिनकामाचे करून टाकतात… एवढं कळलं तर बघा… नाहीतर तुम्हीही या सुद्धा योजनेचा लाभ घ्या!

घरात पसारा असला की मला वस्तू बरोबर सापडतात, हे बायकोला कितीही वेळा सांगितलं तरी ती नेहमी सगळ्या वस्तू आवरून ठेवते आणि मग मला वस्तू कशा सापडत नाहीत, यावर फिदीफिदी हसते. हे वागणं बरोबर आहे का सांगा, संतोषराव? – पद्माकर औरंगाबादकर, जालना
असा अडचणीचा प्रश्न विचारायचा आणि उत्तर देणार्‍याच्या घरात आग लावायची, हे तुमचं वागणं बरोबर आहे का सांगा, पद्माकर राव. संजय राऊत साहेब काय बोलतात याकडे जसं सत्ताधार्‍यांचं लक्ष असतं, त्यापेक्षा बारीक लक्ष आमच्या बायकोचं आमच्या बोलण्याकडे आणि लिहिण्याकडे असतं… तुमच्या प्रश्नाचे आम्ही दिलेले उत्तर हा तिला मारलेला टोमणाच आहे असं जर आमच्या बायकोला वाटलं… तर आम्ही आवरलेल्या घराचा जो पसारा होईल तो परत आम्हालाच आवरावा लागणार आहे…

 

 

विचारून टाका प्रश्न

तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या[email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

Previous Post

दिमाग के दुश्मन!

Next Post

…म्हणून मीच हवा, मीच हवा, मीच हवा!

Next Post
…म्हणून मीच हवा, मीच हवा, मीच हवा!

...म्हणून मीच हवा, मीच हवा, मीच हवा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.