• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तणाव : शत्रू की शिक्षक?

कौस्तुभ भास्कर मनोमनी

Marmik Team by Marmik Team
November 21, 2026
in मनोमनी
0
तणाव : शत्रू की शिक्षक?

पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधील ट्रॅफिक आणि डेडलाईन्सच्या गर्दीत आदित्य हा एक तरुण `सक्सेसफुल’ म्हणून ओळखला जायचा. हातात लेटेस्ट आयफोन, राहिला बाणेरमध्ये स्वतःचा फ्लॅट आणि दिमतीला ब्रँडेड गाडी… वरून पाहणार्‍याला वाटायचं, `काय नशीब आहे याचं!’ पण या चकचकीत आयुष्याच्या पडद्यामागे एक वेगळंच युद्ध सुरू होतं.
आदित्यच्या मनात विचारांची `बॅक एंड’ प्रोसेस कधीच थांबत नसे. त्याच्यासाठी सोमवारची सकाळ म्हणजे एखादी भयानक `ब्लॅक मंडे’ची भीतीच असायची.
`आज बॅकलॉग क्लिअर होईल का?’
`क्लायंट कॉलमध्ये माझं इम्प्रेशन डाऊन तर होणार नाही ना?’
`मॅनेजरच्या केबिनमध्ये आज काय `प्रसाद’ मिळेल?’
असे हजारो एरर मेसेजेस त्याच्या डोक्यात सतत फ्लॅश होत असायचे.
तणावाची पहिली एन्ट्री…
एका सोमवारी सकाळी सातचा अलार्म वाजला. आदित्यने डोळे उघडले, पण शरीरात त्राण नव्हते. `आज पुन्हा तेच… तेच कॉल्स, तेच मेल्स, तेच स्केलिंग इश्यूज,’ तो वैतागून पुटपुटला.
त्याने अर्धवट डोळ्यांनी मोबाईल चेक केला. नोटिफिकेशनमध्ये एक मेल चमकत होता—विषय होता : `ळRउEर्‍ऊ: झ्Rध्Dळण्ऊघ्ध्र्‍ घ्एएळE’. त्या एका शब्दाने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. छातीत धडधड वाढली. तळहात ओले झाले. अचानक पाठ दुखू लागली. त्याला जाणवलं की तो स्वतःच्याच आयुष्यात `हँग’ होतोय.
ऑफिसमध्ये आदित्य म्हणजे `मिस्टर डिपेंडेबल.’ `आदित्य, तू आहेस म्हणून हे प्रोजेक्ट वेळेत होतंय,’ मॅनेजर कौतुकाने पाठीवर थाप मारायचा. बाहेरून तो हसून `थँक्स’ म्हणायचा, पण आतून तो एखाद्या जुन्या बॅटरीसारखा ड्रेन होत होता. त्याच्या मनात एकच भीती घर करून बसली होती. `मी चुकलो तर? जर माझा परफॉर्मन्स ग्राफ खाली गेला तर?’
एके दिवशी ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये आदित्य डोकं धरून बसला होता. समोरचा चहा थंड झाला होता, पण त्याच्या डोक्यातलं चक्र गरमच होतं. तेवढ्यात त्याचा जिवलग मित्र सौरभ तिथे आला. सौरभकडे पाहिल्यावर नेहमी असं वाटायचं की याच्या आयुष्यात `बग्स’च नाहीत.
`काय रे आदित्य? आज चहाऐवजी विचारांनाच उकळतोयस का?’ सौरभने हसत विचारलं.
आदित्यने कसाबसा प्रयत्न करून म्हटलं, `काही नाही रे… जरा कामाचं प्रेशर आहे.’
सौरभने त्याच्या डोळ्यांत पाहत विचारलं, `फक्त कामाचं प्रेशर आहे, की तू स्वतःवर कामाचं `ओझं’ करून घेतलंयस?’
आदित्यचा बांध फुटला. `मला सतत ताण येतोय, सौरभ. काहीच कंट्रोलमध्ये वाटत नाहीये. वाटतंय सगळं सोडून देऊन कुठेतरी पळून जावं.’
सौरभ शांतपणे म्हणाला, `तुला वाटतंय तणाव तुझा शत्रू आहे, बरोबर? पण खरं सांगू, तणाव हा शत्रू नसून तो एक `सिग्नल’ आहे.’
`कसला सिग्नल?’ आदित्यने गोंधळून विचारलं.
`आपल्या डॅशबोर्डवर जशी एखादी रेड लाईट लागते ना, तसाच! तो तुला सांगतोय की तू कशाची तरी खूप मनापासून काळजी करतोयस. पण तू त्या लाईटला बघून गाडी थांबवणार की इंजिन चेक करणार, हे तुझ्यावर आहे.’
तीन `कोडिंग’ मंत्र :

१. तणावाला व्हेरिएबल नाव द्या

सौरभने सांगितलं, `जेव्हा ताण येईल, तेव्हा स्वतःला विचार-प्रॉब्लेम नक्की कुठे आहे?’ त्या रात्री आदित्यने शांतपणे विचार केला. `मला ताण येतोय कारण मला चुका करायची भीती वाटतेय.’ त्याला उमजलं की प्रॉब्लेम काम नाही, तर `परफेक्शनचा अट्टहास’ आहे.

२. तुमच्या `कंट्रोल’मध्ये काय आहे?

दुसर्‍या दिवशी सौरभने पुढचा धडा दिला. `तुझ्या नियंत्रणात काय आहे? क्लायंटचं डोकं की तुझी तयारी? जे तुझ्या कंट्रोलमध्ये नाही, त्यावर प्रोसेसिंग पॉवर खर्च करणं बंद कर.’

३. मायक्रो-टास्किंगची ताकद
आदित्यने ठरवलं की आता `मोठा डोंगर’ बघायचा नाही. त्याने कामाची विभागणी केली. `आज फक्त हे दोन फीचर्स टेस्ट करायचे आहेत. बाकी उद्या बघू.’

काही आठवड्यांनंतर आदित्यचा मॅनेजर त्याला म्हणाला, `काय रे, हल्ली कामं वेळेत होतायत आणि तूही एकदम रिलॅक्स दिसतोयस. काय जादू केली?’ आदित्य हसून म्हणाला, `सर, आता मी तणावाशी फाईट करत नाही, तर त्याच्याकडूनच फीडबॅक घेतोय.’ त्या रात्री आदित्य आपल्या बाल्कनीत बसला होता. पुण्याची गार हवा अंगाला स्पर्श करत होती. त्याने आयफोन बाजूला ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, `तणाव आजही आहे, पण आज मी त्याला हाताळायला शिकलोय. तो आता माझं वादळ नाही, तर मला योग्य रस्ता दाखवणारा माझा `मेंटॉर’ आहे.’

तरुण पिढीसाठी Takeaway!
तणाव अपरिहार्य आहे, पण तो पाहण्याचा दृष्टिकोन ऐच्छिक आहे. तणाव म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं नाही तर तुम्ही काहीतरी महत्त्वाचं करत आहात याचा तो पुरावा आहे. स्वतःला विचारा : `यातलं माझ्या हातात काय आहे?’ आणि उरलेलं `डिलिट’ करा. स्वतःचा `डिबग’ करायला शिका, स्वतःवर चिडू नका.

Previous Post

तरुणाईला भिडणारी बहिणाबाई

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.