• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आंब्राई

श्रीकांत आंब्रे

Marmik Team by Marmik Team
July 21, 2026
in भाष्य
0
आंब्राई

पाऊस
यांची पापे धुण्यासाठी
इतका पाऊस पुरणार नाही
पूर्ण रिता झालो तरीही
एकही डाग जाणार नाही

सूर्य इतका कोपला तरीही
यांना त्याची नव्हती चाड
इतके निगरगट्ट शासन

चामडी गेंड्यासारखी जाड

आम्ही एकदाच दाखवून देऊ
निसर्गाची दिव्य शक्ती
सत्ता गेल्यावरती कळेल
निसर्गानेच दिलीय मुक्ती

सचिन अहिर
इतके वैभव भोगूनसुद्धा
आणखी मला सुटली हाव
एकनाथराव तर मित्रच माझे
म्हटले, करा धावाधाव

एका रात्रीत नव्हताच ठरला
लांब उडीचा माझा डाव
कधीपासून शोधत होतो
अचूक मोका करण्या घाव

जमेल तेव्हा जमेल जसा
घ्यावा लोण्यात हात मारून
जेव्हा शिंदेच पळतील तेव्हा
मीही जाईन लाथ मारुन

रावण
बघ श्रीरामा तुझे भक्त
तुलासुद्धा सोडले नाही
मंदिर तुझे लुटण्यासाठी
बघ त्यांना किती घाई

दहा तोंडे असली तरीही
खात नव्हतो बकाबका
यांनी तुझी लूट केली
चोरले सोने, चांदी, पैका

अपराध्यांना सावरुन घेती
बघ तुझे मोठे योद्धे
सारवासारव किती करतील
वाचवायाला चोरटे गद्धे

 

एकनाथ शिंदे
मुंबईसह सहा पालिका
आंदण दिल्या भाजपाला
उपकाराची फेड केली
जागलो त्यांच्या अळणी मिठाला

ठाकरे-सेनेची होती आधी
त्यांच्यावरती पूर्ण सत्ता
मिळवून देण्या भाजपाला
सत्तेचा तो खाया भत्ता

आतासुद्धा देती मला ते
सीएमपदाची गोड गोड ऑफर
म्हणती भाजपात विलीन करा
पक्ष आणि तुमचे लोफर

 

जनता
लोकशाहीवर हल्ला करती
सत्तेचेच रखवालदार
`निर्भय बनो’ संदेश देती
न्यायमूर्ती जमादार

सत्तेपुढे झुकला नाही
त्याला करती तडीपार
जनता नाही गुलाम तुमची
कडाडती मग जमादार

भ्रष्ट नेते, भ्रष्ट प्रशासन
शुद्ध करी पहा हे सरकार
त्याला उघडे-नागडे करती
फटके मारुन जमादार

Previous Post

भारताची `निर्यात’बनायचे की जगाचा डोकेदुखी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.