वेगवेगळ्या मालिकांतून चमकलेले यशोमन आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर हे दोन कलाकार प्रथमच एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘नको रुसवा नको दुरावा, सतत वाटे तू इथे जवळी रहा’ असे शब्द असलेला हा म्युझिक व्हिडिओ २७ फेब्रुवारीला सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर रिलीज होतोय. या म्युझिक व्हिडिओचे प्रस्तुतकर्ते आणि साईनाथ राजाध्यक्ष निर्माते आहेत.
कृतिक मझीर या व्हिडिओचे दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर आहेत. अनिरुद्ध बांदिवडेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. चार्वाक माधुरी यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे, तर आदित्य नीला यांनी गाणे गायले आहे. संगीत संयोजन आणि प्रोग्रॅमिंग ध्रुव मुळे आणि शंतनू सपकाळ यांचे आहे, तर अंंकित शिंदे आणि दिव्या घाग कार्यकारी निर्माते आहेेत. यंग आणि फ्रेश जोडी, उत्तम संगीत आणि गीत, नेत्रसुखद छायांकन या म्युझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल असा विश्वास कृतिक मझीर यांनी व्यक्त केला आहे.