कोरोना व्हायरसपासून आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करायचे तर तोंडावर मास्क घालणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना चेहर्यावर मास्क लावलाच पाहिजे. पण चेहरा व नाकावर सतत मास्क असल्यामुळे बरेचदा श्वास घ्यायला त्रास होतो. मास्क काढला की हुश्श… असे वाटते. म्हणूनच कोणता मास्क चांगला, कोणता वाईट… मास्क कधी धुवावा… कधी फेकायचा… याबाबत माहिती असणेही आवश्यक बनले आहे. कारण सतत एकच मास्क घातल्यास तो हानिकारक ठरू शकतो. म्हणून मास्क वापरताय ना… तर मग हा लेख वाचाच.
कोणता मास्क योग्य…?
मेडिकल गाइडलाइन्सनुसार तीन प्लायवाले मास्क घालणे योग्य आहे. कारण त्यात श्वास घेता येण्यायोग्य फॅब्रिक वापरलेले असते. या प्रकारचे मास्क जास्तीतजास्त वापरायला काहीच हरकत नाही. त्याशिवाय ते बजेटमध्येही बसतात. हे मास्क कितीही वेळा धुवून आपण घालू शकतो. अर्थात मास्क सतत धुतल्यामुळे त्यामधील फॅब्रिक बेजान होऊ शकते. त्यामुळे खरं पाहायचं तर कोरोना संकटाच्या या काळात चांगल्या क्वालिटीचे फॅब्रिक असलेला मास्कच परिधान करा.
मास्क धुण्याची पद्धत
अनलॉक सुरू झालेले असल्यामुळे घराबाहेर तर पडावेच लागणार आहे. मग तोंडावर मास्क लावणंही आलंच. त्यामुळेच आता गरज ही निर्माण झाली आहे की आपल्या मास्कची काळजी कशी घ्यावी? ते कधी धुवावेत? आणि ते योग्य प्रकारे कसे ठेवावेत? ज्या मास्कला नोज क्लिप लावलेली असते त्या मास्कची काळजी जरा जास्त घ्यायला हवी. तशी ती घेतली गेली नाही तर त्यात किटाणू शिरू शकतात. सतत धुलाई आणि त्यावर केमिकल्सचा वापर यामुळे मास्कचे फॅब्लिक खराब होऊ शकते. हा मास्क रियुजेबल कपड्याने बनविलेला असेल तर तो साधारण कोमट पाणी आणि डिसइन्फेक्टींग सॉल्युशनमध्ये भिजवून ठेवा आणि नंतर सुकायला ठेवा. चार ते पाचवेळा धुतल्यानंतर ते फेकून देणे योग्य ठरेल.
मास्क फेकणे कधी योग्य?
– मास्क अनेकदा धुवून अनेकदा वापरला असेल तर त्याचे फॅब्रिक कमजोर पडू लागते. अशावेळी तो फेकून देणे चांगले. नवीनच मास्क घ्या.
– तुमचे घराबाहेर सतत येणेजाणे होत असेल तर एका आठवड्याहून जास्त काळ एक मास्क वापरू नका. तो बदलायलाच हवा.
– मास्क केवळ कोरोना रोखण्यासाठीच नव्हे तर हवेतील प्रदूषण रोखण्यासाठीही उपयुक्त असतो. त्यामुेळे हवामान बदलले की मास्कही बदलाल तर ठीक.
– जर मास्क तुमचे नाक आणि चेहरा नीट झाकू शकत नसेल तर… तो सतत अॅडजस्ट करावा लागत असेल तर… तर तो मास्क टाकून द्या आणि नवा मास्क घेऊन या.
– जर तुमच्या मास्कचा बॅण्ड वा रबर ढिला झाला असेल तर… तो वारंवार नीट बसवावा लागतर असेल तर नवा मास्क घेऊन येणेच योग्य.
– जर तुमचा मास्क सतत धुतल्यामुळे कमजोर झाला असेल तर बदलून टाका तो मास्क.
– जर मास्कमध्ये छिद्र पडले असेल वा तो फाटला असेल तर लगेच तो फेकून दिला पाहिजे. त्याच्या जागी नवीन मास्क घेऊन या.
– जर एखाद्या मास्कमध्ये तुम्ही स्वत:ला सुरक्षित वाटून घेऊ शकत नसाल तर… किंवा कंफर्टेबल वाटत नसेल तर तो मास्क बदलून नवीनच घेतला पाहिजे.