अनेकविध भूमिका साकारल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा आता लवकरच वेबसिरीज विश्वात पाऊल ठेवतोय. जिओ स्टुडिओज आणि गोल्ड माऊन्टेन पिक्चर्सच्या या नव्या वेबसिरीजमध्ये रणदीप इन्स्पेक्टर अविनाश साकारणार आहे. नीरज पाठक यांचे दिग्दर्शन असलेली ही वेबसिरीज वास्तवातील ‘सुपर कॉप’ म्हणून गाजलेल्या अविनाश मिश्रा यांच्या जीवनावर आधारलेली आहे. उत्तर प्रदेशात अविनाश मिश्रा यांनी आपल्या कारकीर्दीत गुन्हेगारांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांचीच स्टोरी दाखवणार्या या वेबसिरीजमध्ये रणदीप हुडा खणखणीत पोलीस इन्स्पेक्टर साकारणार आहे.
या भूमिकेबाबत खुद्द रणदीप हुडादेखील उत्सूक आहे. तो म्हणतो, इन्स्पेक्टर अविनाशची ही भूमिका खूपच दमदार असेल असे मला वाटते. वास्तवातील एखाद्या पोलीस अधिकार्यावर ती बेतलेली असल्यामुळे त्यात थरारकता आणि संघर्ष नक्की असणार. दिग्दर्शक आता ही भूमिका कशी करवून घेतात त्याची उत्सुकता मला लागली आहे. जिओ स्टुडिओजसोबत माझा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला एक वेगळा अनुभव असेल हे नक्की. याच डिसेंबरमध्ये या वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू होणार असल्याचे दिग्दर्शक नीरज पाठक म्हणाले.