नवोदित दिग्दर्शक तेजस लोखंडे याने आपल्या नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला नुरतीच सुरूवात केलीये. या वेबसिरीजच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो त्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. चंद्र फिल्म ॲण्ड एंटरटेन्मेंट, चंद्रप्रकाश यादव आणि प्रशांत सावंत हे या वेबसिरीजची निर्मिती करत आहेत. यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
‘अंजली’, ‘दुहेरी’, ‘नकळत सारे घडले’ या प्रसिद्ध मालिकांचे दिग्दर्शक तेजस लोखंडे त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतो, ही माझी पहिलीच वेबसिरीज असल्याने मी उत्सुक आहे. हा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे. ही वेबसिरीज करण्यापूर्वी मी बऱ्याच वेबसिरीज पाहिल्या आणि त्यांचा अभ्यास केला. माझ्या नव्या वेबसिरीजसाठी देवाचे आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू दे, असेही तो सांगतो. लॉकडाऊननंतर सिनेमांच्या आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे अनेक सिनेमांचे आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. तरीही सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकवर्ग वेबसिरीजकडे वळला आहे. या वेबसिरीजचे निर्माते चंद्रप्रकाश यादव म्हणाले, ही माझी पहिलीच वेबसिरीज आहे. तेजस हा अनुभवी दिग्दर्शक आहे तर अजिंक्य ठाकूर हा लेखन कौशल्यात तरबेज आहे. त्यामुळे मी फार उत्सुक आहे.