बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानचा कमबॅक सिनेमा म्हणून त्याचे चाहते ज्या ‘पठाण’ या सिनेमाची वाट बघत आहेत तो सिनेमा या वर्षी येणारच नाहीये. यशराज बॅनरखाली बनत असलेला हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे 2022 सालात प्रदर्शित होणार आहे असं कळतंय. सिने समीक्षक तरण आदर्शने ट्विटरवर टाकलेल्या या ब्रेकिंग न्युजमुळे त्याचे चाहते हिरमुसणार हे नक्की. याच जानेवारीत नववर्षाचा आपला संदेश देताना शाहरूखने तेव्हा व्हिडीओत म्हटले होते की, ‘2021 वर्षात मोठ्या पडद्यावर भेटूच…’ पण त्याने चाहत्यांना दिलेले वचन मोडले असेच म्हणावे लागेल. 2018 साली आलेल्या ‘झीरो’ या सिनेमानंतर शाहरूख मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही.
‘पठाण’मध्ये शाहरूखसोबत जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण, शाजी चौधरी, गौतम रोडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय ‘दबंग’ खानही यात एका पाहुण्या भूमिकेत येतोय अशीही न्यूज मध्यंतरी आली होती.