प्रबोधन पाक्षिकाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे साहित्य, त्यांचे पुरोगामी विचार व उपक्रम नव्या पिढीपर्यंत विविध उपक्रमांद्वारे पोहोचवले जातील, असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केला.
प्रबोधन पाक्षिकाचा शताब्दी महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी साहित्य संस्पृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, प्रा. दीपक पवार, प्रा. महावीर मुळे, सचिन परब, सुनील वेलणकर यांनी सूचना केल्या. डॉ. विठ्ठल घुले यांनी प्रबोधनकारांचे प्रबोधन, शिवाय इतर साहित्य पुनर्प्रकाशित करावे तसेच तरुणांसाठी ‘प्रबोधनकार’ असे पुस्तक प्रसिद्ध करावे.
समाजसुधारक, पत्रकार असा वारसा पुढे नेणाऱयांना पुरस्कार द्यावा तसेच एकपात्री प्रयोग करण्याच्या सूचना केल्या. उद्योजक प्रबोधनकार म्हणून लोकांपुढे आणावेत, त्यासाठी अभ्यास केंद्र निर्माण करण्याची सूचना डॉ. मनीष देशमुख यांनी केली. दरम्यान, या सूचनांची दोन विभागांत वर्गवारी करून त्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले.
सौजन्य- सामना