• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत इस्त्रायलला मिळालेल्या प्रवेशाचा अन्वयार्थ

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 3, 2020
in भाष्य
0
सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत इस्त्रायलला मिळालेल्या प्रवेशाचा अन्वयार्थ

सौदी अरेबियाने ३० नोव्हेंबरला आपल्या हवाई हद्दीतून इस्त्रायलच्या विमानांना प्रवास करण्यास सूट दिली आहे. सौदीने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की संयुक्त अरब अमिरातीच्या मागणीवरून आम्ही इस्त्रायलच्या विमानांना आमच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी देत आहोत. सौदीने इस्त्रायलसाठी हवाई हद्द खुली करणे हे अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे यश आहे, असे म्हणायला हरकत नाही.

इस्त्रायलच्या स्थापनेपासूनच सौदी अरेबिया आणि आसपासच्या इतर देशांशी सतत तणावाचे संबंध राहिले आहेत. पॅलेस्टाईनच्या भूमीवरून इस्त्रायलचे अरब राष्ट्रांशी सतत युद्ध होत राहिले आहे. एकमेकांच्या देशातील नागरिकांच्या हत्या करणे, लष्करी करवाया, गुप्तचर कारवाया, हमाससारख्या संघटनांना हाताशी धरून केले जाणारे नागरी युद्ध यामुळे मध्य पूर्वेत खासकरून इस्त्रायल आणि अरबी राष्ट्रात सतत तणावाची परिस्थिती कायम राहिली आहे.

पॅलेस्टाईन अस्तित्वात यावा यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांच्या जीवावर उठणारे इस्त्रायल आणि सौदी अरेबिया हे आज एकमेकांशी शांतीचर्चा करत असल्याच्या वार्ता अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमात दाखवल्या जात आहेत.

काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्त्रायलच्या आणि अमेरिकेच्या राजकीय मुत्सद्दींनी सौदी अरेबियात भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. या भेटीवेळी सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान उपस्थित होते, अशी देखील वार्ता इस्लामिक देशातील अनेक प्रसार माध्यमांनी प्रसारित केली होती, परंतु सौदीचा परराष्ट्र मंत्र्यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. परंतु, आता आपल्या हवाई हद्दीत सौदीने इस्त्रायलला दिलेला प्रवेश आणि गेल्या आठवड्यात इराणच्या अणु संशोधन कार्यक्रमाच्या प्रमुखाची झालेली हत्या, यामुळे मात्र सर्वत्र इस्त्रायल आणि सौदीत आता चांगले संबंध निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, सुदान, बहरीन पाठोपाठ आता सौदीचे इस्त्रायलच्या बाजूने पडलेले पाऊल, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम देणारे असेल.

सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी बदलेल्या धोरणामुळे आणि त्याला अमेरिकेच्या साथीमुळे हे आता संयुक्त अरब अमिराती – सौदी अरेबिया – इस्त्रायल हे नवे समीकरण निर्माण झाले आहे.

खरंतर गेल्या आठ दहा महिन्यात टर्की- इराण – पाकिस्तान या देशातील अप्रत्यक्ष युती, सौदीचा तेल प्रकल्पावर इराणकडून येमेनच्या खांद्यावर बंदूक ठेऊन करण्यात आलेला हल्ला यांसारख्या अनेक बाबींनी सौदीला इस्त्रायलच्या जवळ जाण्यास भाग पाडले आहे. सध्या अरबस्थानात निर्माण झालेली ही नवीन युती भविष्यात दीर्घ काळ टिकली तर मध्य पूर्वेच्या संघर्ष भूमीसाठी एक शांतता पूर्ण भविष्याचे आशादायी चित्र प्रत्यक्षात येणार आहे.

इराण आणि टर्की सारख्या इस्लामिक मुलतत्ववादी प्रेरणेच्या देशांवर देखील यामुळे दबाव कायम ठेवता येणार आहे. हे चित्र जरी आशादायी असले तरी अमेरिकेतील नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पॅलेस्टाईनच्या प्रश्नांवरील जगभरातील मुस्लिमांच्या भावना लक्षात घेता हा मार्ग खडतर असणार आहे. जो बायडेन हे बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना उपाध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत मध्य पूर्वेतील प्रश्न फार मोठ्या प्रमाणात चिघळला होता, त्यामुळे ते आणि त्यांची परराष्ट्र सल्लागार मंडळी हा प्रश्न किती गंभीरतेने आणि व्यावहारिकपणे हाताळता यावर सर्व अवलंबून असणार आहे.

पॅलेस्टाईन हा गेल्या अनेक वर्षांपासून न्यायचा प्रतीक्षेत आहे. तेथील नागरिकांना इस्त्रायलच्या वसाहतवादी धोरणामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पॅलेस्टाईनचे नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सौदी आणि इतर देशांच्या बळावर आपले हक्क मिळवण्यासाठी लढणाऱ्या पॅलेस्टाईनच्या लोकांचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Tags: international politicsisrael-saudi relationssaudi arabia
Previous Post

ब्रेन स्ट्रोक… वेळीच सावध व्हा!

Next Post

प्रबोधनकारांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचा विश्वास

Next Post
प्रबोधनकारांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचा विश्वास

प्रबोधनकारांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचा विश्वास

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.