• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मालवण तालुक्यात लेप्टोचे सहा रुग्ण

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 28, 2020
in घडामोडी
0
मालवण तालुक्यात लेप्टोचे सहा रुग्ण

मालवण तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना लेप्टोस्पायरोसिस रुग्ण मात्र वाढले आहेत. गेल्या आठ दिवसात सहा रुग्ण सापडले आहेत. काळसे, चिंदर, राठीवडे, असरोंडी, धामापूर व शिरवंडे या गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडून आला आहे. सहाही रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी दिली.

गेल्या तीन वर्षांत ज्या गावात लेप्टो रुग्ण सापडले होते ती गावे जोखीम ग्रस्त म्हणून नोंदली जातात. तालुक्यातील अश्या २८ गावात गोळ्या वाटप, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ती २८ गावे वगळून अन्य ठिकाणी रुग्ण सापडले. त्या गावातही गोळ्या वाटप करण्यात आले. तापसरीच्या पार्श्वभूमीवर ओवळीये व अन्य गावात सर्वे करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
उंदीर व अन्य प्राण्यांचे मलमूत्र शेतातील पाण्यात मिसळते. शेतीत काम करणाऱ्या व्यक्तीला जखम झाली असल्यास दूषित पाण्याद्वारे जखमेतून लेप्टो मानवी शरीरात प्रवेश करतो. ताप व अन्य लक्षणे दिसून येतात. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा मालवण ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करावा. त्या ठिकाणी लेप्टो टेस्ट किट उपलब्द आहेत. त्याद्वारे तात्काळ तपासणी करावी. तसेच शेतीत पाण्यात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी अधिक काळजी घ्यावी. असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सौजन्य : दैनिक सामना 
Previous Post

‘निवार’ चक्रीवादळाने केलं मालामाल! समुद्राच्या तटावर वाहून आलं सोनं

Next Post

कोणत्या अधिकारात फी वाढवली याची शाळांनाच माहिती नाही! राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

Next Post
कोणत्या अधिकारात फी वाढवली याची शाळांनाच माहिती नाही! राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

कोणत्या अधिकारात फी वाढवली याची शाळांनाच माहिती नाही! राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.