मालवण तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना लेप्टोस्पायरोसिस रुग्ण मात्र वाढले आहेत. गेल्या आठ दिवसात सहा रुग्ण सापडले आहेत. काळसे, चिंदर, राठीवडे, असरोंडी, धामापूर व शिरवंडे या गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडून आला आहे. सहाही रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी दिली.
उंदीर व अन्य प्राण्यांचे मलमूत्र शेतातील पाण्यात मिसळते. शेतीत काम करणाऱ्या व्यक्तीला जखम झाली असल्यास दूषित पाण्याद्वारे जखमेतून लेप्टो मानवी शरीरात प्रवेश करतो. ताप व अन्य लक्षणे दिसून येतात. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा मालवण ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करावा. त्या ठिकाणी लेप्टो टेस्ट किट उपलब्द आहेत. त्याद्वारे तात्काळ तपासणी करावी. तसेच शेतीत पाण्यात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी अधिक काळजी घ्यावी. असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सौजन्य : दैनिक सामना