सध्याचे जग ऑनलाईन व्यवहाराचे आहे. त्यासाठी फक्त लॉग इन आयडी आणि पासवर्डची गरज लागते. महत्त्वाचे म्हणजे आपला पासवर्ड मजबूत असणं आवश्यक आहे. नाहीतर एका क्लिकवर ऑनलाईन फसवणुकीला सामोरे जावे लागेल. नुकतीच खराब पासवर्डची यादी जाहीर झाली आहे. 2020 साली अनेक कमपुवत (वीक) पासवर्ड तयार झाले आहेत. त्यांना 2.3 कोटी वेळा क्रॅक करण्यात आले आहे. यामध्ये 123456 आणि 123456789 हे दोन पासवर्ड सर्वात जास्त लोकप्रिय आहेत आणि ते एका सेकंदापैकी कमी वेळेत क्रॅक झाले आहेत.
पासवर्ड मॅनेजर सोल्युशन फर्म नॉर्डपासने 2020 सालच्या खराब पासवर्डची यादी नुकतीच जाहीर केली. यादीत सुमारे 200 डेंजर पासवर्ड आहेत. त्यामध्ये सर्वात टॉपवर 123456 हा पासवर्ड आहे. तो अर्ध्या सेकंदात क्रॅक केला जाऊ शकतो. दुसऱया स्थानावर 123456789 आहे आणि त्याखालोखाल Picture1 चा समावेश आहे.
2015 सालीदेखील 123456 हा खराब पासवर्ड ठरला होता. तरी लोकांनी 2020 साली त्याच पासवर्डचा पुन्हा पुन्हा वापर केल्याचे दिसून येतंय.
नॉर्डपासच्या अहवालानुसार, chocolate हा पासवर्ड 21 हजार 409 लोकांनी ठेवला आहे. 90 हजार लोकांनी aaron431 हा पासवर्ड ठेवलाय. 37 हजारपेक्षा अधिक लोकांनी pokemon हा पासवर्ड वापरला. 2020 च्या यादीत iloveyou पासवर्ड 17 व्या स्थानावर आहे.
गेल्या दोन वर्षांतील कमकुवत पासवर्डच्या यादीवर नजर टाकली, तर दोन्ही वर्षांची यादी जवळपास सारखी आहे. जरी काही पासवर्ड बदलले असले, तरी हॅकर्स त्यांना सहजपणे क्रॅक करू शकतात. तुम्ही नॉर्डपासच्या यादीतील एखादा पासवर्ड ठेवलेला असेल तर त्वरित तो बदला. कारण तुमच्या पासवर्डशी पुणीही सहज खेळू शकतो.
पासवर्ड कसा निवडाल?
पासवर्ड निवडताना युजरने ठराविक पॅटर्न्स, आणि पुनरावृत्ती टाळायला हवी. मिश्र क@रेक्टर वापरा. अंक, अक्षरं, क@पिटल लेटर, स्पेशल क@रॅक्टर असे एकत्र करून रँडम पासवर्ड तयार करा. पासवर्डमध्ये खासगी माहिती नसावी, जसे की, तुमची जन्मतारीख, तुमचं नाव या गोष्टींचा वापर टाळावा. युजरने स्वतŠचे नाव आणि जन्मतारीख वापरून अल्फान्युमरिक पासवर्ड जरी सेट केला असला तरी तो पासवर्ड क्रॅक करणं सोपं असतं.12345, abcdef, asdfgh असे पासवर्ड निवडू नयेत. मजबूत पासवर्ड तयार करण्यासाठी पासवर्ड जनरेटर टूलदेखील वापरू शकतो.
हे पासवर्ड बदला
123456
123456789
Picture1
Password
12345678
111111
123123
12345
1234567890
Senha
सौजन्य : दैनिक सामना