वाढत्या प्रदुषणामुळे शहरांमध्ये सर्वांनाच श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागलेला आहे. पण आता श्वास घ्यायला त्रास म्हटलं म्हणजे लोकांच्या मनात वेगळीच भीती येते. प्रदुषणामुळेच अस्थमा, हृदयरोग आणि रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित विकारांचा धोका खूपच वाढला आहे. मोठ्यांसोबतच हे प्रदूषण लहान मुलांनाही घातक आहे. त्यामुळे बाहेर जाण्यापेक्षा घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. पण… बाहेरच्या हवेप्रमाणेच आपल्या घरातील हवाही प्रदूषित होऊ शकते. घरातल्या या प्रदूषित हवेमुळे आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठीच हा खटाटोप…
शेकोटी पेटवणे
हिवाळा आला सकाळच्या वेळी लोक मोकळ्या जागेवर शेकोटी पेटवून शरीराला उष्णता आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. शेकोटीवर हात पाय शेकून लोकांना बरे वाटते. पण हिवाळ्यातील या शेकोटीमुळे आगीद्वारे प्रदूषणाचे कण घरात शिरून आपल्या फुफ्फुसे, हृदय आणि गळ्यासाठी घातक ठरू शकतात.
धूम्रपान
बाहेर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करता येत नाही, म्हणून बरेचसे लोक घरातच धूम्रपान करतात. पण यामुळे त्यांच्या धूम्रपानातून निघणारा धूर घरातल्या विडी-सिगारेट न पिणार्या लोकांच्या फुफ्फुसासाठी घातक ठरू शकतात. त्यांनाही ते हानिकारक ठरतात. तुम्हाला माहीत आहे का… विडी आणि सिगारेट न पिणारे किमान ३ हजार लोक दरवर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे बळी ठरतात.
घरातील कार्पेट
घरात कार्पेट असणे म्हणजे खरे तर अभिमानाची गोष्ट… पण या कार्पेटमुळेही घरात अनेकदा प्रदूषण पसरते याची आपल्याला माहीती नसते. धुळीचे कण, जनावरांच्या अंगावरील लव, अनेक प्रकारचे जीवजंतू या कार्पेटमध्ये लपून बसलेले असतात. त्यामुळेही घरातल्या लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
एक्झॉस्ट फॅन
जेवण बनवताना निघणारा धूर आणि बाथरूममधला दुर्गंध बाहेर निघून जावा यासाठी शक्यतो आपण एक्झॉर्स्ट फॅनचा वापर करत नाही. पण तो आवर्जून करावा. तसा फॅन उपयोगी पडतो. त्यामुळे घरात प्रदूषण टिकून राहात नाही. विंडो एअर कंडीशनरही फॅन सेटिंगवर एक क्लीन फिल्टर लावून त्याचा वापर करता येईल.