लसणामध्ये अॅण्टी-बॅक्टेरीयरल, अॅण्टी फंगल आणि अॅण्टी ऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर असतात. या गुणधर्मांचा फायदा आपल्याला होतोच, पण हिवाळ्यात लसूण खूपच महत्त्वाचा ठरतो. लसूण भाजून त्याचा चांगला वापर हिवाळ्यात करता येतो. हिवाळा आलाच आहे. तेव्हा या लसणाबद्दलच बोलूया…
आयुर्वेदातही लसणाचे भरपूर फायदे सांगण्यात आले आहेत. जेवणाला फोडणी देतो तेव्हा आपण लसणाचा वापर करतो. तडका म्हणून लसणाची फोडणी दिली की डाळ, वरण, भाजी यांची चव वाढते. लसूण कच्चा किंवा शिजवून अशा दोन्ही प्रकारे खाता येतो. हिवाळ्यात लसूण आहारात असणे फायदेशीर असते. पुरुषांनाही लसूण खाणे खूपच उपयुक्त असते. लसणातील अॅण्टी-बॅक्टेरीयल, अॅण्टी-फंगल आणि अॅण्टी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. ते माहीत असतील तर हिवाळ्यात त्यांचा मोठा फायदा होईल.
कर्करोगापासून बचाव
लसूण हा कर्करोगापासून बचाव करणारा पदार्थ म्हणूनही ओळखला जातो. लसणात विशेषत: प्रोस्ट्रेट आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्याचे भरपूर गुणधर्म असतात.
हिवाळ्यात फायदेकारक
थंडीच्या ऋतूमध्ये भाजलेल्या लसणाच्या दोन-तीन पाकळ्या खाल्ल्या तर थंडीचे विकार होण्याची शक्यता बहुतांश टाळता येते. लसणामुळे शरीरात गरमी निर्माण होते.
पोटाच्या समस्या घालवतो
हिवाळा आला की लोकांना पोटाच्या समस्या वाढतातच. अनेक लोकांना या दिवसांत गॅसच्या समस्याही सतावतात. त्यामुळे या दिवसांत भाजलेल्या लसणाचे सेवन फायदेकारक सिद्ध होईल.
सेक्स हार्मोन बनवतो
लसणामध्ये अॅलीसिन नावाचे द्रव्य असते. हे द्रव्य पुरुषांमध्ये सेक्स हार्मोनचा स्तर वाढवायला कारणीभूत ठरते. त्यामुळे पुरुषांमधील इरेक्टाईल डिस्फंक्शन दूर होते असे डॉक्टर सांगतात. दुसरे म्हणजे लसणामध्ये सेलेनियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म क्वालिटी वाढते.