• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कोल्हापूरचे सुपुत्र शहीद जवान संग्राम पाटील अनंतात विलीन

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 23, 2020
in घडामोडी
0
कोल्हापूरचे सुपुत्र शहीद जवान संग्राम पाटील अनंतात विलीन

पोलीस व लष्करा कडुन हवेत बंदुकीच्या फैरी झाडून,अखेरच्या मानवंदनेनंतर शासकीय इतमामात करवीर तालुक्याचे सुपुत्र शहीद जवान संग्राम शिवाजी पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी निगवे, खालसा गावात अत्यंत भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानकडून सीमेवर जम्मु-काश्मीर येथे हिंदुस्थानच्या सैन्यावर गोळीबार सुरुच आहे. शनिवारी रात्री राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर येथे पाकिस्तान सैन्याच्या हल्ल्यात निगवे, खालसा, ता.करवीरचे सुपुत्र आणि 16 मराठा बटालियनचे जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाले.

गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणार्थ शहीद झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली होती. कुटुंबाचा एकूलता एक मुलगा सीमेवर शहीद झाल्याने कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला होता. तर गेल्याच आठवड्यात ऐन दिवाळीच्या पुर्वसंध्येला बहिरेवाडी,ता.आजरा येथील अवघ्या 20 वर्षाचे जवान ऋषिकेश जोंधळे हे जम्मु काश्मीर येथे पाकिस्तान सैन्याशी लढताना शहीद झाले होते. दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यातील आणखी एक सुपुत्र शहीद झाल्याने, संपूर्ण जिल्ह्यात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली होती.

शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव सोमवारी सकाळी 6.30 च्या सुमारास कोल्हापूरहून निगवे खालसाकडे दाखल होत असताना, मार्गावरील गावांनी रस्त्याच्या दुर्तफा रांगोळी काढून, ठिकठिकाणी श्रध्दांजलीचे फलक लावून तसेच ग्रामस्थांकडून पुष्पे वाहून आदरांजली वाहण्यात येत होती. निगवे खालसा येथील घरी पार्थिव काही काळ अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. येथे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. यानंतर सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.चौका-चौकात फलक लावून आदरांजली वाहण्यात येत होती. ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी पुष्पहार आणि फूले वाहून आदरांजली वाहत होते. “अमर रहे अमर रहे संग्राम पाटील अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम,पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आली.

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी.एन.पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्य. अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सरपंच पांडुरंग महाडेश्वर आदी लोकप्रतिनिधींनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

सैन्य दलाच्यावतीने सुभेदार मेजर भाऊ तांबे, शहीद जवानाचे वडील शिवाजी पाटील, बंधू संदीप, कर्नल शिवाजी बाबर, शिवाजी पवार, कर्नल विजय गायकवाड, सुभेदार संतोष कोकणे, सुभेदार अनिल देसाई, सुभेदार जयसिंग देशमुख, सुभेदार सीताराम दळवी, सुभेदार नारायण नरवडे, कर्नल डी.एस.नागेश आणि आजी माजी सैनिक संघटच्यावतीनेही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.

यानंतर पोलिसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत 3 फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवान संग्राम पाटील यांना अखेरची मानवंदना दिली. शहीद जवान संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्यकडून पार्थिवाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post

ऑफिसच्या नावावर थायलंडला गेला, बायकोसमोरच फुटले बिंग!

Next Post

मेघालयाच्या जंगलात सापडली इलेक्ट्रिक मशरूम, रात्रीच्या वेळी होतात प्रकाशमय

Related Posts

घडामोडी

गुलाबी पाहुण्यांची गर्दी; पण स्वागतास कुणीच नाही!

May 15, 2025
घडामोडी

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

April 4, 2025
घडामोडी

मराठी चित्रपटांना आता एक पडदा थिएटर्सचा आधार?

March 20, 2025
घडामोडी

सेन्सेक्सची गटांगळी, अर्थव्यवस्थेची डुबकी

March 7, 2025
Next Post
मेघालयाच्या जंगलात सापडली इलेक्ट्रिक मशरूम, रात्रीच्या वेळी होतात प्रकाशमय

मेघालयाच्या जंगलात सापडली इलेक्ट्रिक मशरूम, रात्रीच्या वेळी होतात प्रकाशमय

चांगली बातमी की वाईट बातमी

चांगली बातमी की वाईट बातमी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.