देशाचे पोट भरणाऱया अन्नदाता शेतकऱयांवरच सोमवारी उपाशी राहण्याची वेळ आली. राजधानी दिल्लीच्या सिंघु सीमेवर हजारो शेतकऱयांनी एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले. जोपर्यंत मोदी सरकार तीन पृषी कायदे रद्द करीत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही हा निर्धार 19 व्या दिवशी कायम आहे. दरम्यान, शेतकऱयांच्या सिंघु आणि टिकरी सीमेवर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माता-भगिनीही सहभागी होणार आहेत.
मोदी सरकारने मनमानी पद्धतीने केलेले तीन पृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी लाखो शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी 19 वा दिवस होता. पण शेतकरी मागे हटलेला नाही. सिंघु आणि टिकरी सीमेवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंजाब-हरयाणातील किमान दोन हजार माता-भगिनी येत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र तंबू उभारले जात आहेत. अशी माहिती शिवपुमार कक्का यांनी दिली.
मध्यप्रदेशच्या कृषीमंत्र्यांचे डोके फिरले; आंदोलन करणारे शेतकरी देशद्रोही, साप, विंचू
भाजपच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बेताल बडबड सुरूच आहे. त्यात आता मध्य प्रदेशचे कृषीमंत्री कमल पटेल यांनी संतापजनक विधान केले. आंदोलन करणारे शेतकरी दलाल, देशद्रोही आहेत. विदेशी शक्तीच्या इशाऱयावर आंदोलन करत आहेत. साप, विंचूसारख्या, कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे अचानक पाचशे शेतकरी संघटना पुढे आल्या आणि आंदोलन करीत आहेत, असे भयंकर वक्तव्य त्यांनी केले.
दान नाही, तर योग्य दाम पाहिजे; जनतेची माफी!
संयुक्त किसान मोर्चाने एक जाहीर पत्रक काढून आमच्या आंदोलनामुळे अडचणी येत असल्यास आम्ही जनतेची माफी मागतो, असे म्हटले आहे. आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला अन्नदाता असेही म्हटले जाते. आम्हाला दिल्लीत जाऊन पंतप्रधानांच्या कानावर तीन पृषी कायदे रद्द करा हे सांगायचे होते. कायद्यांसंदर्भात तक्रार करायची होती. पण आम्हाला जाऊ दिले जात नाही. आमच्या शेती उत्पादनास उचित किंमत मिळावी एवढीच मागणी आहे. आम्हाला दान नको तर योग्य दाम हवे आहेत. कष्टाचे योग्य मूल्य मिळायला हवे. जनतेला त्रास देण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. जर कोणी आजारी, वयोवृद्ध व्यक्तीला त्रास होत असेल, अॅम्ब्युलन्सने दवाखान्यात न्यायचे असेल तर आमच्या स्वयंसेवकांशी संपर्क करावा. पृपया आम्हाला समजून घ्या, अशी विनंती या पत्रकाद्वारे संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.
सौजन्य- सामना