• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

धुंदूरमासात काय घडलं?

सचिन परब by सचिन परब
January 9, 2021
in प्रबोधन १००
0
धुंदूरमासात काय घडलं?

 

 

सध्या धुंदूरमास सुरू आहे. कॅलेंडरवर लिहिलंय की १६ डिसेंबरपासून सुरू झालेला हा महिना या १३ जानेवारीपर्यंत चालणार आहे. प्रबोधनकार अवघे आठ वर्षांचे असताना एका धुंदूरमासात त्यांचा त्यांच्या जातीमुळे अपमान करण्यात आला. त्यावरची प्रबोधनकारांची प्रतिक्रिया तेव्हा एखाद्या चमत्कारापेक्षाही अद्भुत होती.

 

`मी ब्राह्मणांचा द्वेष्टा, अशी कंडी मत्सरी भटाबामणांनी पिकवलेली आहे. नकली, खोट्या नि दांभिक भटाबामणांचा मी खास द्वेष्टा आहे. तसा द्वेष सगळ्यांनी करावा असे मला वाटते. पण जो खरा ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचे सर्व विहित कर्तव्य पाळतो, तो मला केव्हाही वंद्य नि पूजनीय असणार. मात्र ही पूजा गुलामगिरी वळणाची केव्हाही नव्हती, नाही आणि नसेल.’
– प्रबोधनकार ठाकरे, `माझी जीवनगाथा.’

प्रबोधनकारांच्या लहानपणीची एक महत्त्वाची घटना एका धुंदूरमासात घडली आहे. आता हा धुंदूरमास म्हणजे काय, ते आज आपल्याला माहीत असायचं काही कारण नाही. आपल्याला आपल्या नेहमीच्या कॅलेंडरमधले जानेवारी ते डिसेंबर हे बारा महिने माहीत असतात. मराठी पंचांगातले चैत्र, वैशाख मोजताना थोडे चुकतात, तरीही माहीत असतातच. त्यात कुठेही धुंदूर किंवा धुंधुर नावाचा महिना सापडत नाही. त्यासाठी ‘गुगल’वर सर्च करण्याशिवाय पर्याय नसतो.

‘विकिपीडिया’वरही ते सापडतं. तेही बहुदा कुठून तरी कॉपी पेस्ट केलेलं असावं. त्यातून समजतं की सूर्य धनू राशीत असतो, त्या महिनाभराच्या काळाला धनुर्मास म्हणतात. तोच धुंदूरमास. मकरसंक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. त्याच्या आधी साधारण तीस दिवस हा धुंदूरमास असतो. या थंडीच्या दिवसांत आयुर्वेदाच्या अनुसार म्हणे पहाटेच भूक लागते. त्यामुळे सकाळी लवकर उठून वेगळे मराठमोळे पदार्थ करून खायचे असतात. पूर्वी बहुतेक त्यासाठी घरोघरी जेवायला बोलावलं जात असावं. कारण प्रबोधनकार लहान म्हणजे आठ वर्षांचे असताना ते वडिलांच्या सोबत त्यांच्या एका मित्राकडे धुंदूरमासाच्या प्रात:भोजनासाठी गेले होते.

प्रबोधनकारांचे वडील पनवेलच्या कोर्टात बेलिफ होते. बेलिफ म्हणजे कोर्टाच्या जप्ती, समन्स अशा हुकमांची अंमलबजावणी करणारा अधिकारी. अशा आणखी एका बेलिफाच्या घरी प्रबोधनकारांच्या वडिलांना धुंदूरमासाच्या पहाटेच्या जेवणाचं निमंत्रण होतं. तो समव्यावसायिक मित्र ब्राह्मण होता. तिथला अनुभव प्रबोधनकार आत्मचरित्रात लिहितात तो असा, `तेथे बामण सारे एका बाजूला पंगतीने आणि आम्हा बापलेकांची दोन पाने दूर एका बाजूला. शिवाय भालेराव नावाचा एक कारकून होता. त्याचे पान एकटेच आणखी दूर. का? तर म्हणे तो आकरमाशा जातीचा. वाढणार्‍या बाया आम्हाला प्रत्येक पदार्थ किंचित दुरून आणि उंचावरून पानात टाकीत.’

वेगळी पंगत आणि पानात पदार्थ वरून टाकणं, हा आपला अपमान आहे, हे तेव्हाही अनेकांना वाटत नसे आणि आजही अनेकांना कळतच नाही. बोगस धर्मकल्पनांनी त्यांच्या संवेदनाच बोथट केलेल्या असतात. पण प्रबोधनकार त्याला बालपणापासूनच अपवाद असलेले दिसतात. अवघ्या आठव्या वर्षी यात आपला अपमान झाल्याचं व्यवस्थित समजलं होतं.

जेवण आटोपल्यानंतर त्यांचे वडील त्यांचं खरकटं काढायला लागले. आपल्या पानाला स्पर्श करणं ब्राह्मण अपवित्र समजत होते, हे बघून प्रबोधनकार चिडले. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यावर वडिलांनी स्पष्टीकरणही दिलं. ते बोलणं काय झालं याचा तपशील प्रबोधनकारांनी दिलेला नाही. तो आपल्याला अंदाजानेच समजून घ्यावा लागतो. पण या संभाषणाच्या शेवटी प्रबोधनकारांनी जो वङ्काप्रहार केला, तो त्यांनी दिलाय. प्रबोधनकार कडाडले, `हे बामण जर आपल्याला असे निराळेपणाने वागतात तर आपण तरी त्यांच्याशी कशाला आपलेपणाने वागावे? आपल्या घरी त्यांना तसेच वागवावे.’ एक आठ वर्षांचा चिमुरडा हे चारचौघात आपल्या वडलांना सुनावतोय, हे दृश्य त्या काळात चमत्कारापेक्षा वेगळं नसेल.

तो काळ एकोणिसाव्या शतकाच्या शेवटचा. ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांपासून अंतर राखणं त्या काळात कॉमन होतं. प्रबोधनकारांना अर्थातच त्याचे अनुभव आले होते. प्रबोधनकार आपल्या शाळेतल्या मित्राच्या घरी गेले आणि प्यायला पाणी मागितलं, तर तो तपेलीतून पाणी आणायचा. घरातल्या ओटीच्या खाली प्रबोधनकार उभे राहायचे. मित्र ओटीच्या वर. तो वरूनच तपेलीतलं पाणी प्रबोधनकारांच्या ओंजळीत ओतायचा. त्या भांड्याला प्रबोधनकारांचा स्पर्शही झालेला नसायचा. तरीही ते भांडं घराच्या बाहेरच ठेवलं जायचं आणि ते धुऊनच घरात घेतलं जायचं.

अर्थातच अगदी लहान असताना हे ब्राह्मणांचं वागणं त्यांना कळायचं नाही. ते जेव्हा कळू लागलं, तेव्हा प्रबोधनकार शाळेतल्या मित्रांच्या या सोवळ्याची उठताबसता टिंगल करायला लागले. प्रबोधनकारांची आजी बय हिने केलेल्या संस्कारांमुळे प्रबोधनकारांना जातभेदाची निरर्थकता लहानपणीच कळली होती. शाळेतल्या मित्रांपासून सुरू झालेली ही टिंगलटवाळी प्रबोधनकारांनी मरेपर्यंत केली. चिकित्सक पत्रकार आणि संशोधक म्हणून ते भल्याभल्यांच्या वैचारिक सोवळ्याची चिरफाड आयुष्यभर करत राहिले. त्यातून कुणीही सुटले नाहीत, मग ते इतिहासाचार्य राजवाडे असोत, लोकमान्य टिळक असोत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असाेत. त्यामुळे प्रबोधनकारांना ब्राह्मणद्वेष्टे ठरवण्यात आलं. त्यावर प्रबोधनकारांचं म्हणणं लेखाच्या सुरुवातीला दिलंय आणि ते स्वयंस्पष्ट आहे.

खरंतर जातिभेदाचे कठोर अनुभव येण्यासाठी ठाकरे काही अस्पृश्य नव्हते. ते कष्टकरी कारागीर किंवा शेतकरी जातींचेही नव्हते. ते होते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी. हा शिक्षणाचा वारसा असणारा पांढरपेशा समाज. लेखणी हीच त्यांची ताकद. हिशेब, पत्रव्यवहार, कारकुनी, कार्यालयीन कारभार, कामकाजाच्या नोंदी, इतिहासाचं डॉक्युमेंटेशन अशी कामं या समाजाने पिढ्यानुपिढ्या केली. प्रसंगी लेखणीइतक्या ताकदीने तलवारही चालवली. सत्ताधीश बदलत राहिले. पण कायस्थ प्रभूंनी देशभर खरा कारभार केला.

छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याचीही सेवा केली. पण पेशवाईत चित्पावन ब्राह्मणांनी या पुढारलेल्या समाजाचं जाणीवपूर्वक खच्चीकरण केलं. त्यामुळे ब्राह्मण विरुद्ध कायस्थ असा संघर्ष सुरूच राहिला. त्यातून शक्य होईल तिथे कायस्थांना हलकं लेखण्याचे प्रकार पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यंत तरी घडत.

कायस्थ प्रभू समाजाची बदनामी करण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा प्रबोधनकारांनी त्याला सडेतोड उत्तर दिलंय. तो स्वाभिमान त्यांच्यात लहानपणापासूनच होता, असं एका प्रसंगातून दिसतं. तेव्हा प्रबोधनकार शिक्षणासाठी कल्याणमध्ये होते. नुकतेच इंग्रजी सहावी झाले होते. वडलांची नोकरी सुटली होती. प्लेगमुळे गावाबाहेर राहावं लागत होतं. अन्नान्नदशा झाली होती. अशा वेळेस संपूर्ण कुटुंब तळ्यातल्या वेली उकडून दिवस काढत होते. जवळच असणार्‍या मौनीबाबाच्या समाधीचा पुजारी मच्छिंद्रनाथ त्यांचा मित्र झाला होता. ठाकरेंची बिकट परिस्थिती बघून त्याने सुचवलं की समाधीवर रोज खूप तांदूळ वाहिले जातात. ते तुम्ही घेऊन जा. त्यावर प्रबोधनकारांनी दिलेलं उत्तर मस्त आहे, `नहीं नहीं स्वामिजी, मैं तो छत्री हूं. ऐसा काम मेरेसे कभी नहीं बनेंगा. माफ कीजिये.’ आम्ही छत्रिय आहोत, आम्ही फेकलेलं खाणार नाही, असं ते सांगत होते.

प्रबोधनकारांनी लहानपणी जातिभेदाचे अनुभव घेतले. त्याची तटस्थ चिकित्सा करताना ते लिहितात, `माझा बालपणाचा शाळकरी जीवनाचा काळ ब्राह्मणी वर्चस्वाच्या उतरंडीचा होता. पेशवाईने चित्पावनांना आलेल्या हंगामी माहात्म्याची त्यांची धुंदी ओसरत होती. पण नाहीशी झाली नव्हती. एकूणेक ब्राह्मणेतरांपेक्षा आम्ही जन्माने, कर्माने आणि संस्कृती ती काय म्हणतात तिने फार वरच्या थरातले आहोत, ही त्यांची आढ्यता कायम होती. ब्राह्मण मंडळी ब्राह्मणेतरांना अंशतः अस्पृश्यांच्या धाटणीने वागवायची. बामण काय किंवा बामणेतर काय, दोघेही जातिभेदाच्या जुन्या कल्पनांचे गुलाम. इतरांना आम्ही निराळेपणाने का वागवतो, हे बामणांना समजत नव्हते आणि आपण त्या निराळेपणाला अपंगाप्रमाणे का जुमानतो, हे बामणेतरांना उमजत नव्हते. दोघेही रूढीचे बंदे गुलाम. बामणी वरचढपणाचे माझे अनुभव पुष्कळ आहेत.’

हे सांगताना प्रबोधनकार हे सांगायलाही विसरत नाहीत की, लहानपणापासून त्यांच्याभोवती ब्राह्मणेतरांपेक्षा ब्राह्मण मित्रांचाच गोतावळा आहे. नातेवाईकांपेक्षाही ब्राह्मण स्नेहीच त्यांच्याशी दिलदारीने वागत आलेत. त्याचं कारणही ते सांगतात, काळानुसार बदलण्याची क्षमता आणि गुणग्राहकता बाह्मणांच्या नव्या पिढीत इतरांपेक्षा विशेष आहे.

प्रबोधनकार असोत किंवा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले असोत, छत्रपती शाहू महाराज असोत किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ही सगळीच माणसं ब्राह्मण किंवा कोणत्याही जातीचा द्वेष करण्याइतकी छोटी नव्हतीच. त्या सगळ्यांनी ब्राह्मण मित्रांच्या गुणग्राहकतेचा जवळून अनुभव घेतला होता. ब्राह्मण त्यांचे फक्त मित्रच नाही, तर सहकारी आणि अनुयायीही होते. तरीही या सगळ्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेचा, ब्राह्मणी पुरोहितशाहीचा कडाडून विरोध केला. तसं या सगळ्या महामानवांनी का केलं असेल, याचं उत्तर मिळालं तर आपण खर्‍या अर्थाने जातीच्या पलीकडे एक माणूस म्हणून जगू शकू. धुंदूरमासानिमित्त हा विचार तर करूया.

 

– सचिन परब

(लेखक प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक आहेत.)

Previous Post

फुले का पडती शेजारी?

Next Post

आक्रमकता संयमेन शोभते!

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post
आक्रमकता संयमेन शोभते!

आक्रमकता संयमेन शोभते!

मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त हवेत, पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त हवेत, पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.