• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; सोशल मीडियावरही आदरांजली, ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 18, 2020
in घडामोडी
0
शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; सोशल मीडियावरही आदरांजली, ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम

मनामनात हिंदुत्वाचा हुंकार जागवणारे…मराठी माणसात स्वाभिमानाचा अंगार चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींचे आराध्य दैवत. या दैवताचा आज महानिर्वाणदिन. या दिवशी शिवतीर्थावरील शक्तिस्थळावर नतमस्तक होऊन शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी लाखो शिवसैनिकांची रीघ लागते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात ‘आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आणि महाराष्ट्र तसेच देशभरातील शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींनी त्याचे तंतोतंत पालन केले. शक्तिस्थळावर पोहोचता आले नाही तरी विचारांच्या रूपाने हृदयात कायम विराजमान असलेल्या शिवसेनाप्रमुखांना घराघरातून, मनामनातून आज मानवंदना देण्यात आली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या आपल्या लाडक्या दैवताच्या शक्तिस्थळावर नतमस्तक होताना प्रत्येक शिवसैनिकाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटते. मात्र कोरोनाचे संकट असताना इच्छा असूनही शिवतीर्थावर जाता येणार नाही याची रुखरुख या शिवसैनिकांच्या मनात होती. शिवसेनाप्रमुखांनी दिलेली समाजकारणाची शिकवण ठाम ठेवत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शिवसैनिकांनी संपूर्ण शिस्तीचे पालन केले. शिवतीर्थावर न येता पुठे सामाजिक उपक्रम राबवत, तर गरजूंना मदत करीत शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ‘आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्रोत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन’ असे ट्विट पेले. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच सर्वसामान्यांनीही फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.

मान्यवरांकडून मानवंदना

स्मृतिस्थळी उपस्थित राहत राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली. शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, माजी मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, परिवहनमंत्री ऍड. अनिल परब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री विनोद तावडे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, काँग्रेस नेते आमदार भाई जगताप, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार अजय चौधरी, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, रवींद्र फाटक, भाजप आमदार मंगलप्रभात लोढा, निरंजन डावखरे, स्थापत्य समिती अध्यक्षा श्रद्धा जाधव आदींनी शिवतीर्थावरील शक्तिस्थळी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.

समाजोपयोगी उपक्रम

शिवसैनिकांनी शिवसेना शाखा तसेच मतदारसंघांमध्ये ठिकठिकाणी समाजोपयोगी उपक्रम राबवून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली. रक्तदान शिबीर, गरजूंना मदत, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून शिवसैनिकांनी मदत केली. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करून मास्क, सॅनिटायझर वाटप करून शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांनी दिलेली समाजकारणाची शिकवण प्रत्यक्षात आणली.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी पत्रकार तसेच पत्रकार संघातील कर्मचाऱयांकडून आदरांजली वाहण्यात आली.

अमोघ वक्ते, व्यंगचित्रकार

ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरद्वारे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले आहे. ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अमोघ वक्ता, व्यंगचित्रकार व राजकीय भाष्यकार म्हणून कार्यकर्तृत्वही विशेष महत्त्वाचे होते. राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजिगीषु वृत्तीचे प्रकर्षाने स्मरण करणे क्रमप्राप्त आहे. पुण्यतिथीदिनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन!’ अशा शब्दांत त्यांनी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणदिनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी शक्तिस्थळी शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले. यावेळी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

Previous Post

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

Next Post

आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा!

Next Post
आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा!

आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.