हिंदुस्थान हा मोबाइल-फर्स्ट प्रकारचा देश असल्याने 90 टक्क्यांहून अधिक ऑनलाइन गेमर्स त्यांच्या फोनवरून खेळतात. आता 500 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचलेली गेमिंग बाजारपेठ 2021 पर्यंत 1.1 अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. जलद गतीने होणारी वाढ आणि आरएमजी जाहिरातींचा नकारात्मक परिणाम यांमुळे एएससीआयने जाहिरातींसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. वापरकर्त्यांना आर्थिक तसेच गेमिंगच्या आहारी जाण्याच्या धोक्याची कल्पना यावी हे निश्चित करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालय आणि ग्राहक व्यवहार विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या मार्फत सरकार, एएससीआय मार्गदर्शक तत्त्वांना, या क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या व हानीकारक जाहिरातींबद्दलची वाढती सर्वसमावेशक पद्धतीने चिंता दूर करण्याच्या उद्देशाने, पूर्ण पाठिंबा व पाठबळ देत आहे.
ही मार्गदर्शक तत्त्वे 15 डिसेंबर 2020 पासून जारी होणार आहेत आणि कायदेशीर परवानगी असलेल्या जाहिरातींना ती लागू असतील.
कोणत्याही गेमिंग जाहिरातीमध्ये 18 वर्षे वयाखालील व्यक्ती किंवा 18 वर्षांहून कमी वयाची वाटणारी व्यक्ती प्रत्येक्ष पैसे जिंकण्यासाठी गेम्स खेळताना दाखवली जाऊ नये किंवा तसा संकेतही जाऊ नये असे स्पष्ट म्हटले आहे.
2. गेमिंगच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये अस्वीकृती (डिसक्लेमर) देणे बंधनकारक आहे.
3. जाहिरातीमध्ये ‘ऑनलाईन गेमिंग फॉर रिअल मनी विनिंग्ज’ प्रकारच्या गेमिंगला उत्पन्नाचे साधन म्हणून किंवा रोजगाराला पर्याय म्हणून सादर केले जाऊ नये.
4. गेमिंग करणारी व्यक्ती ही अन्य व्यक्तींच्या तुलनेत अधिक यशस्वी आहे, असा पुसटसाही संकेत या जाहिरातीमधून दिला जाऊ नये.
सौजन्य : दैनिक सामना