दिव्यांच्या झगमगाटात आणि मंत्रांच्या प्रतिध्वनीसह, ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे भव्य पोस्टर रिलीज केले. या पोस्टरमध्ये राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत कृती सेनॉन, शेषच्या भूमिकेत सनी सिंग दिसत आहेत आणि बजरंगच्या भूमिकेतील देवदत्त नागे नमन करताना दाखवण्यात आले आहे. ओम राऊत दिग्दर्शित टी-सीरीज, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्सचे राजेश नायर निर्माते आहेत. भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित “आदिपुरुष” हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी जागतिक स्तरावर, सर्व चित्रपटगृहात IMAX आणि 3D मध्ये प्रदर्शित होणार आहेत