• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

संकटमोचकाची एक्झिट

- पराग फाटक (व्हायरल)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 19, 2022
in व्हायरल
0

नाकातोंडाला भरपूर पांढरं क्रीम, जटाधारी केस, समोरच्याचा वेध घेणारे निळेकरडे डोळे, धिप्पाड म्हणता येईल अशी छाती, पिळदार दंड आणि अंगावर आलं तर थेट शिंगावर घेण्याची वृत्ती. रूढार्थाने अँड्यू सायमंड्स क्रिकेटपटू होता. होता लिहायला कीबोर्डची बटनं रेटत नाहीत. पण सायमंड्स शरीरसौष्ठवपटू, पॉवरलिफ्टर, धावपटू, बाऊन्सर काहीही होऊ शकला असता. सायमंड्स हा एक अनुभव होता. नियतीने तो अनुभवच आपल्यापासून हिरावून घेतला आहे. तडाखेबंद फलंदाजी, आवश्यकता असेल तर फिरकी नाही तर मध्यमगती गोलंदाजी, अफलातून क्षेत्ररक्षक ही सायमंड्सची गुणवैशिष्ट्यं. पण तो संकटमोचक होता. जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत असे, सायमंड्स दत्त म्हणून हजर होत असे आणि लीलया संघाची नाव पैलतीरावर पोहोचवून देत असे.
तो सामना आणि प्रसंग डोळ्यापुढे आजही स्मरणात आहे. २००३चा विश्वचषक. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामना. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा मर्दुमकी पाहता तेच जिंकणार असं चित्र. पण घडलं भलतंच. शोएब अख्तर, वकार युनिस, वसिम अक्रम या त्रिकुटापुढे ऑस्ट्रेलियाची अवस्था ८६/४ अशी झालेली. सायमंड्स बॅटिंगला आला. एका बीमरने त्याचं स्वागत झालं. पाकिस्तानचे सगळे गोलंदाज फॉर्मात होते. मैदानात त्यांचे चाहतेही मोठ्या प्रमाणावर होते. बीमरने सायमंड्सला आव्हान दिलं. सायमंड्सने एकेरी-दुहेरी धावांचा रतीब घातला. चेंडूवर नजर आणि खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर सायमंड्सने दांडपट्टा चालवायला सुरुवात केली. दुसरीकडे साथीदार बाद होतच होते. पण सायमंड्सला त्याची फिकीर नव्हती. ५० षटकं संपली तेव्हा सायमंड्सच्या नावावर नाबाद १४३ धावा होत्या. त्याने १८ चौकार लगावले आणि दोन षटकार खेचले. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या होती ३१०. ऑस्ट्रेलियाने अर्थातच तो सामना जिंकला.
सहाव्या सातव्या क्रमांकावर सायमंड्स फलंदाजीला येत असे तेव्हा परिस्थिती कधीच निवांत नसे. एकतर मोठी धावसंख्या रचण्याचं आव्हान किंवा मोठी धावसंख्या पेलण्याचं आव्हान समोर असे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचा सुवर्णकाळ असताना सायमंड्सने त्यात स्वत:ची जागा निर्माण केली. हेडन-गिलख्रिस्ट-पॉन्टिंग-मार्टिन-लेहमन-क्लार्क असे सगळे महारथी परतल्यानंतर सायमंड्स येत असे.
बेसबॉल प्लेयरप्रमाणे तो बुकलून काढत असे. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज वेगवान गोलंदाजीचा समर्थपणे सामना करतात पण फिरकीसमोर गांगरतात असा सर्वसाधारण अनुभव. सायमंड्स इथे वेगळा ठरायचा. उत्तम दर्जाच्या फिरकीपटूलाही तो चोपून काढायचा. तो फिनिशर होता पण त्याला इनिंग्ज बांधताही यायची. चांगल्या गोलंदाजीसमोर त्याचे भिडू माघारी परतल्यानंतर सायमंड्स, कुंभार मातीतून छान मडकं साकारतो तशी इनिंग्ज साकारायचा. संघावरचं संकट स्वत: अंगावर घेऊन, तुफान खेळाद्वारे नंतर प्रतिस्पर्ध्यांना संकटात टाकण्यात तो वाकबगार होता. सायमंड्सच्या बहुतांश खेळी अशा आग लागल्यानंतर फायरब्रिगेडने यावं अशाच आहेत.
मेहनतीने ऑस्ट्रेलियाचा डावाला खिंडार पाडावं, जरा सुस्कारा टाकणार तोच सायमंड्स यावा अशी प्रतिस्पर्धी संघाची अवस्था व्हायची. असंच एकदा कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडविरुद्ध मुकाबला होता. वेलिंग्टनच्या गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाची अवस्था ५०/३ अशी झाली. बॅटरुपी तलवार घेऊन सायमंड्स मैदानात उतरला. त्यानंतर त्याने जी खेळी केली त्याने जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. सायमंड्सने त्यादिवशी १५६ धावा कुटल्या. १२ चौकार आणि ८ षटकारांनी सजलेली ती सायमंड्सची खेळी आजही सार्वकालीन वनडे इनिंगजमध्ये गणली जाते. सगळं छान छान आटपाट नगरी असताना अनेकजण शेखी मिरवतात. जहाज गाळात रुतलेलं असताना ते बाहेर काढण्याची ताकद सायमंड्समध्ये होती.
धावांचा पाठलाग करताना ४० चेंडूत ७०, ९० चेंडूत १६० अशी परिस्थिती नेहमीचीच. धावगतीचा मीटर सतत उंचावत असतो. कोणाचा सन्मान करायचा, कोणाला फोडून काढायचं याचं सायमंड्सचं गणित ठरलेलं असायचं. सायमंड्स समोरच्या क्षेत्ररक्षकांवर दबाव आणायचा. जिथे एक धाव आहे तिथे तो दोन पळायचा. जिथे दोन आहेत तिथे तीन काढायचा. गरज पडली तर चार धावाही पळून काढायचा. चौकार-षटकार लागत असतील तर सायमंड्स हतबल व्हायचा नाही. कारण धावफलक हलता ठेवण्याची खुबी त्याच्याकडे होती. सायमंड्सचं रनिंग बिटवीन द विकेट्स लाजबाव असायचं. सायमंड्सबरोबर भागीदारी करणं सोपं नसायचं कारण तो पायाला स्प्रिंग लावल्यागत पळायचा.
मुख्य गोलंदाजांना विश्रांती देण्यासाठी संघात कामचलाऊ गोलंदाज असतात. सायमंड्स ही कामगिरी चोख पार पाडायचा. केवळ उपचार म्हणून करायचा नाही. अनेकदा चांगली चाललेली भागीदारी तोडायचा. खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर स्पिन टाकायचा. नाहीतर एरव्ही मध्यमगती गोलंदाज असायचा. सायमंड्ससारखा अष्टपैलू संघात असणं ही कर्णधारासाठी चंगळ होती कारण तो संघाला संतुलित करायचा. अनेकदा दहा ओव्हरचा कोटा तो पूर्ण करायचा.
क्षेत्ररक्षक सायमंड्स हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. पॉइंट्सला सायमंड्स पहाडासारखा उभा असायचा. डावीकडे त्याचा मित्र मायकेल क्लार्क गलीत असायचा. ही भिंत भेदून चेंडूला पिटाळणं फलंदाजांना अवघड व्हायचं. हवेतून उदी काढावी तसं सायमंड्स झेल टिपायचा. सायमंड्स एकहाती थ्रो करून रनआऊट करायचा. एकच स्टंप दिसत असतानाही सायमंड्स त्याचा वेध घ्यायचा. सायमंड्सच्या दिशेने चेंडू गेलाय आणि धाव घ्यायची आहे म्हटल्यावर फलंदाजांच्या मनात धडकी भरायची. कारण सायमंड्सचा थ्रो बंदुकीच्या गोळीसारखा यायचा. धावता धावता, पडता पडताही त्याचा थ्रो स्टंप्स्वर अचूक बसायचा. कितीही अंतरावरून केला तरी त्याचा थ्रो स्टंप्स उडवायचा. चौकार रोखण्यासाठी सायमंड्स झोकून द्यायचा. कठीण वाटणारे झेलही तो टिपायचा. फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर संघात खेळू शकेल आणि जिंकून देऊ शकेल अशी सायमंड्सची ताकद होती.
सायमंड्सला पाहिलं तर जिममधले ट्रेनर दिसतात तसा वाटायचा. कष्टाने कमावलेलं शरीर. एक ग्रॅमही पोट सुटलेलं नाही. सायमंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला तेव्हाही असाच होता आणि खेळातून बाजूला झाल्यावरही तसाच होता. पिळदार शरीरयष्टी ज्या ज्या क्षेत्रात लागते त्यात सायमंड्स कुठेही खपून गेला असता.
विलक्षण प्रतिभेला शाप असतो म्हणतात. सायमंड्सचंही तसंच होतं. २००८ मध्ये मायदेशात बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम मीटिंग होती. सायमंड्स ती सोडून फिशिंगला गेला. शिस्तभंगाची कारवाई झाली आणि सायमंड्स त्या मालिकेत खेळू शकला नाही. दारू पिण्याच्या सवयीने त्याचा घात केला. २००९ ट्वेन्टी२० विश्वचषकावेळी सायमंड्सला चक्क घरी पाठवण्यात आलं. दारू पिण्याच्या सवयीने कारकीर्दीत अनेकदा त्याच्यावर कारवाई झाली. शिक्षा भोगून परतल्यावर सायमंड्स नेहमीच्याच तडफेने खेळत असे. मैदानावरचा जिगरबाज सायमंड्स बाहेर असा का वागतो हे कोडं कधीच उलगडलं नाही.
सायमंड्सच्या आईवडिलांपैकी एक आप्रिâकन-कॅरेबियन आणि एक स्वीडन-डॅनिश. सायमंड्सचा जन्म इंग्लंडमधला. त्याला दत्तक घेतलेल्या पालकांनी ऑस्ट्रेलिया गाठलं. तो इंग्लंडसाठीही खेळू शकला असता पण त्याने ऑस्ट्रेलियाची निवड केली.
सायमंड्सचं नाव निघालं की मंकीगेट प्रकरण प्रकर्षाने आठवतं. २००८मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात तो प्रकार घडला होता. सिडनी कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाची अवस्था ११९/४ अशी होती. सायमंड्सने संकटमोचकाची भूमिका पार पाडत शतक केलं. सामना संपल्यानंतर हरभजन सिंगला सायमंड्सला वर्णभेदी टिप्पणी केल्याप्रकरणी तीन सामन्यांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली. हरभजन सायमंड्सला मंकी म्हणाला अशी तक्रार करण्यात आली होती. ते प्रकरण चिघळलं. हरभजनवरची शिक्षा रद्द होत नाही तोवर पुढची कसोटी खेळणार नाही असं भारतीय संघाने स्पष्ट केलं. दौरा अर्धवट सोडण्याचाही इशारा दिला. एका तटस्थ आयोगापुढे या प्रकरणाचा निवाडा झाला. हरभजनने हिंदीत उद्गार काढल्याचं स्पष्ट झालं. वर्णभेदी उद्गार नसल्याचं सिद्ध झाल्याने त्याच्यावरची बंदी उठवण्यात आली आणि त्याच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापून घेण्यात आली. याप्रकरणाने सायमंड्सची कारकीर्द झाकोळून गेली. याआधी त्याचं मैदानावरचं कर्तृत्व बाजूलाच पडलं. मंकीगेट प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलिया सायमंड्सच्या पाठीशी उभं राहिलं नाही, त्याला खलनायक म्हणून दाखवण्यात आलं असं तत्कालीन कर्णधार रिकी पॉन्टिंगने आत्मचरित्रात म्हटलं होतं. काही काळानंतर हरभजन आणि सायमंड्स आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी एकत्र खेळले. मंकीगेट प्रकरणाने सायमंड्सची कारकीर्द भरकटली, ती पुन्हा रुळावर आलीच नाही.
‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ कार्यक्रमात भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने सायमंड्सचं अतिशय चपखल शब्दात वर्णन केलं होतं. लक्ष्मण आणि सायमंड्स आयपीएल स्पर्धेत डेक्कन चार्जर्स संघासाठी खेळायचे. यासंदर्भात लक्ष्मणने एक आठवण सांगितली. तो म्हणतो, ‘डेक्कन चार्जर्सचा राजस्थानविरुद्ध सामना होता. गिलख्रिस्ट आमचा कर्णधार होता. डॅरेन लेहमन आमचा प्रशिक्षक होता. फलंदीजाला युसुफ पठाण होता. तो चांगल्या फॉर्मात होता. युसूफला झटपट बाद करणं आवश्यक होतं. लेहमन आणि गिलख्रिस्टने सायमंड्सला सिली पॉइंटला उभं केलं. झेल टिपण्यासाठी नव्हे तर बोलून युसूफला उकसवण्यासाठी. युसूफचं खेळावरचं लक्ष विचलित व्हावं, त्याला राग येऊन एकाग्रता भंग व्हावी यासाठी. तू हे का करतो आहेस, असं लक्ष्मणने सायमंड्सला विचारलं. सायमंड्स म्हणाला, मी सैनिक आहे, लीडर नाही. संघाला जे आवश्यक आहे ते मी करीन. मला जो आदेश मिळेल त्याचं मी पालन करेन. ते बरोबर आहे की चूक याचा मी विचार करणार नाही’.
ऑस्ट्रेलियात मैदानांमध्ये सामना सुरू असताना सुरक्षायंत्रणेला चकवा देऊन स्ट्रीकर (विवस्त्र स्थितीतील चाहता) घुसतात. असं काही घडलं तर खेळाडू त्याच्यापासून स्वत:ला दूर राखतात. सुरक्षारक्षक मैदानात त्वरेने धाव घेऊन त्याला ताब्यात घेतात. सायमंड्स हा माणूसच वेगळा होता. एकदा स्ट्रीकर मैदानात घुसल्यानंतर त्याने कोणत्याही खेळाडूला काहीही इजा करू नये, भेटू नये यासाठी पॉइंट्ला क्षेत्ररक्षण करत असलेल्या सायमंड्सने स्ट्रीकरच्या मागे सुसाट धावायला सुरुवात केली. क्षणार्धात त्याने त्याची मानगूट पिरगाटून त्याला रोखला. खाली पाडलं. संपूर्ण मैदान अवाक होऊन पाहत होतं. सुरक्षारक्षक तोवर मैदानात पोहोचले आणि स्ट्रीकरला घेऊन गेले.
मॅथ्यू हेडन आणि सायमंड्स जिगरी दोस्त. सायमंड्ससारखीच हेडनची बलदंड शरीरयष्टी. त्या दोघांना एकत्र पाहून समोरच्याची गाळण उडू शकते. असे हे दोघं बोट घेऊन समुद्रसफरीला निघाले. खोल समुद्रात पोहोचले. अचानक आलेल्या वादळाने त्यांची बोट भेलकांडली. ते पाण्यात पडले. किनार्‍यावरच्या लोकांना काळजी वाटू लागली. पण हेडन-सायमंड्स ही जोडी विलक्षण अशी. पट्टीचे पोहणार्‍या या दोघांनी तीन तास पोहून किनारा गाठला. मायकेल क्लार्क आणि सायमंड्स घट्ट मित्र होते. मैदानावर त्यांनी असंख्य भागीदार्‍या करून संघाला तारलं होतं. पैशाने मैत्रीत वितुष्ट आणलं.
काही वर्षांपूर्वी सायमंड्स आयपीएलच्या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून दिसला होता. ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेदरम्यान तो समालोचन करत असे. क्रिकेट खेळत असतानाच तो मध्येच काही महिने रग्बीही खेळला होता. सायमंड्स बिग बॉसच्या पाचव्या पर्वातही झळकला होता. पतियाळा हाऊस नावाच्या हिंदी चित्रपटात त्याने छोटी भूमिकाही त्याने साकारली होती.
२६ कसोटी आणि १९८ वनडे या आकडेवारीत सायमंड्स सापडणार नाही. सायमंड्स समजून घ्यायचा असेल तर त्याला खेळताना पाहावं लागेल. सायमंड्सचा दरारा असे. त्याचं असणं जाणवत असे. त्याचं असणं प्रतिस्पर्धी संघाला दडपणात टाकत असे. ‘हा मला संकटातून बाहेर काढेल’ असा विश्वास कर्णधाराला असे. असं म्हणतात किती खेळलात यापेक्षा कसं खेळलात याला महत्त्व असतं. सायमंड्स जीव तोडून खेळत असे. ऑस्ट्रेलियाचा तो निष्ठावान सेवक होता. विलक्षण प्रतिभेचा हा सेवक आपल्या वाट्याचं जगून निघूनही गेलाय. सायमंड्स नावाची ऊर्जामय सळसळ जगभरातल्या क्रिकेटचाहत्यांना पोरकं करून गेलेय.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बंदिस्त `वाद’ ते `संवाद’ नाट्य!

Related Posts

व्हायरल

बाबा… सोबत आहेत… राहतील

June 22, 2023
व्हायरल

हाफ प्लेट

June 22, 2023
बिनलशीचा चॅम्पियन
व्हायरल

बिनलशीचा चॅम्पियन

June 22, 2023
व्हायरल

आगरकर आणि नेहरू लायब्ररी

June 22, 2023
Next Post

बंदिस्त `वाद' ते `संवाद' नाट्य!

वात्रटायन

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.