• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राजहट्ट

- सई लळीत (विचारवंतीण)

सई लळीत by सई लळीत
March 17, 2022
in मी बाई विचारवंतीण
0

शेवटी पुतीन यांनी कुणाचेही न ऐकता हट्टीपणाने युक्रेनबरोबर युद्ध पुकारले आहे. युद्धानंतर वैफल्य आलेल्या सम्राट अशोक किंवा जगज्जेता सिकंदर यांची गोष्ट पुतीनना माहित नाही काय? नसेल तर.. आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती ऐका, असं म्हणून पुतीनना सचित्र गोष्ट सांगायला हवी.. आणि गोष्ट न आवडणारा माणूस या जगात जन्माला यायचा आहे. लेकराला कोणीच मायेने गोष्ट ऐकवल्या नसतील कदाचित..! काय करणार तरी काय?
गोव्यात कोकणी भाषेत लाडक्याला पुता म्हणायची पद्धत आहे. पूत याचा अर्थ मूल असा होतो. या पुताने असा काही हट्ट केलाय की सगळ्या जगाला याचे परिणाम भोगायला लागताहेत. आपण पृथ्वीचा बाळ आहे हे पुतीन विसरलेत की काय..!
लहानपणी कदाचित पुतीन खूप वेळा ढिशांव ढिशांव खेळले असतील किंवा
आई, मला छोटीशी बंदूक घेना..
बंदूक घेईन,
…लढाईला जाईन,
…शत्रूला मारीन ठो ठो ठो..
…हे गाणं दिवसातून शंभर वेळा म्हटले असतील बहुतेक!
किंवा शत्रूला मारीनच्या ऐवजी मित्राला मारीन.. ठो ठो ठो.. असेच मोठ्याने आरडले असतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे आपुन कसं सिद्ध करणार?
..नाहीतर… मला आपलं वाटतं की आपण जन्माला येतो तेव्हा सगळेच एकदम शापच निरागस असतो… किमान वयाची तीन वर्ष तरी! नंतर कधीतरी एखाद्या बेसावध क्षणी हा कली मनामधे घुसला असणार नक्की! तो बेसावध क्षण मानसोपचारतज्ञांनी शोधून काढला तर पुढे निर्माण कितीतरी राक्षस कदाचित आधीच रोखता येतील.
…एकवेळ शत्रूला मारणं आपण समजू शकतो… पण शत्रू मारुन मुटकून निर्माण करुन त्याची अकारण विल्हेवाट लावणं, हे महा सैतानी कृत्य आहे… कुठे फेडणार ही लक्षावधी पापं? आणि अशी होलसेलमधली पापं होलसेलमधे फेडता येत नाहीत.ती सिंगल सिंगल रिटेलमधी फेडावी लागतात, असं मला दुनियादारी बघून जजमेंट आलं आहे. तुमचं काय मत्त?
बरं, ही पापं फेडण्यासाठी पाच पन्नास जन्म घ्यावे लागले तर पृथ्वी तवसर शाबूत असेल की नाही कोण जाणे! आणि तिची मुलं अशी बिनडोक असतील तर तिची तब्येत कशी धडधाकट राहील? सगळीकडे आता विनाशाचे ढीग तयार झाले असतील तर कसं सावरायचं तिने? तिला पण डिप्रेशन येणार नाही का? याचा विचारच कोण करत नाहीये!
…कधीकधी मला असं वाटायला लागतं की मनुक्ष प्राणी अजूनही मागासलेलाच आहे. अजूनही आपल्या फायद्यासाठी तो दुसर्‍यालाला सहजतेने छळायला मागेपुढे बघत नाही. जमिनीच्या तुकड्यासाठी जीव घेत सुटलाय.. एका बाजूने एवढा समृद्ध, एवढा विचारी, एवढा सुसंस्कृत आणि दुसर्‍या बाजूने एवढा हावरट, एवढा राक्षसी… एवढा निर्दय आणि एवढा हट्टी आहे की पृथ्वी कपाळावर हात आपटत असेल! काय करायचं या पोराला? कसा दम भरायचा? अतिशहाण्याला शहाणपणा शिकवायचा कसा? अरे बाबांनो आवशीची जरा तरी कदर करा!
मला तर वाटतं की युद्धाची खुमखुमी असणार्‍या या सर्वाना मंगळावर ढकलून दिलं पाहिजे… किंवा मग पृथ्वी सोडून कुठल्याही आवडत्या ग्रहावर जा आणि युद्ध युद्ध खेळा! संतापाने मला पुतीनची कशी निर्भत्सना करु कळेनासं झालंय… असं म्हणून मी संगीत नाटकात दाखवतात तसा आलाप वगैरे घेणार नाहीये… घाबरु नकात! नाहीतर तुम्हाला वाटेल की मी या कठीण प्रसंगी स्वगत बोलून नाट्यगीत सुरु करेन आणि तुम्हाला इतर पात्रांप्रमाणे चुपचाप चेहर्‍यावर कौतुकाचे भाव आणून मान हलवत राहावे लागेल… तसं काही नाहीये. पण एखाद्याच्या राक्षसी महत्वांकाक्षेपायी किती निरागसांचा अकारण जीव जातोय.. होरपळतोय.. ते बघवत नाहीये एवढंच!
…बाकी सर्व ठीक आहे ते बरंच म्हणायचं! तरीपण मला वाटलं कोरोनाची महामारी येवून गेली.. जग बर्‍यापैकी ठिकाणावर आलं असेल. जगाचं चुपचाप प्रबोधन झालं असेल. धरणीमातेची निसर्गाची हवापाण्याची, दगडाधोंड्यांची महती कळली असेल. पण नाही.. शेपूट वाकडं ते वाकडचं!
…बहुतेक… पुतीन सायबांकडे व्हॉटस्अप नाहीये बहुतेक.. नाहीतर कोरोनाच्या काळात त्यांचं एवढं प्रबोधन झालं असतं की युध्दातला यु म्हणताना त्यांनी बावीस वेळा विचार केला असता (बावीस हा आकडा मी युक्तीपूर्वक आणि अत्यंत हुशारीने निवडलेला आहे).
…युद्धाची थरकाप उडवणारी दृश्यं सतत चॅनेलांवर दाखवत आहेत. ती बघून काळजाचा ठोका चुकतोय. आपल्याच खळ्यात बाँब पडलाय असाही भास होतो! आपल्यालाही असं युद्ध अनुभवावे लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं! मला वाटायचं पूर्वी झालेल्या युद्धाच्या गोष्टी आणि सिनेमे बघण्यात आपलं आयुष्य व्यतीत होणार आहे! (स्वप्न अजूनही उद्या गणितचा पेपर आहे असंच पडतंय.. लग्न होवून संसारात पडल्यावर दूध ओतू गेल्याचं पडतं.. कधीतरी आठवड्यातून एखाद्या वेळी… स्वप्नातही काटकसर होत राहते).
…आपला देश आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आता सगळ्यांच्या चांगलंच लक्षात आलं असेल. विशेषतः युद्धामुळे बाहेरील देशात राहणार्‍यांना कधी एकदा भारतमातेच्या कुशीत येतो असं झालं असेल. आपला देश, आपली माणसं, आपली झाडंपेडं, माती, दगडधोंडे आपल्यासाठी किती ‘मायने रखतात’ हे नव्याने सगळ्यांना कळलं असेल. विशेषतः सकाळी डोळे उघडल्यावर आपण आपल्या देशात आहोत, हे कळल्यावर किती बरं वाटलं असेल.. या कल्पनेने मला बरं वाटलं आहे.
…आणि म्हणून… भारतमाता की जय.. जय हिंद.

Previous Post

राजगिरा : एक अमर सुपरफूड

Next Post

चोराच्या उलट्या बोंबा

Next Post

चोराच्या उलट्या बोंबा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.