अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू वृश्चिकेत, रवि-गुरु (अस्त) कुंभेत, शनि-बुध-मंगळ-शुक्र- प्लूटो मकरेत, चंद्र -मीन राशीत, त्यानंतर मेष आणि वृषभमध्ये, हर्षल मेषेत.
मेष – अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे. राशीस्वामी मंगळ आणि धनाधिपती शुक्र पंचग्रही होऊन दशम भावामध्ये लाभाधिपती शनी दशम भावात आहे, त्यामुळे जुनी कामे आता मार्गी लागतील. सरकारी क्षेत्रात निविदांच्या माध्यमातून मोठे प्रोजेक्ट करणार्या कंत्राटदारांना मोठी कामे मिळतील. त्यामधून चांगली कमाई होण्याचे योग आहेत. नोकरदार व्यक्तींना बढती मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थीवर्गास अनेक प्रकारचे लाभ होतील. व्यवसायानिमित्त प्रवास होतील. ५ आणि ६ तारखेला कुटुंबासाठी पैसे खर्च करावे लागतील. हे पैसे चैन आणि मौजमजेसाठी खर्च होतील.
वृषभ – नोकरीमध्ये बदल करण्याच्या प्रयत्नात असाल, नव्या ऑफरची वाट पाहत आहात, या तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. राशीस्वामी शुक्र सप्तमाधिपती, मंगळ उच्चीचा भाग्यात, शनी-बुध-प्लूटोबरोबर पंचग्रही स्थितीत आहे, त्यामुळे हे योग जमून येत आहेत. महिलावर्गाला जोडीदाराबरोबर परदेशात उच्चशिक्षणासाठी जाण्याचा योग आहे. काही काळापूर्वी तुम्ही केलेले मेल, पत्रव्यवहार, या प्रकारातून साधलेल्या संवादाला पाच ते सात तारखे दरम्यान सकारात्मक प्रतिसाद मिळेल. उद्योग व्यवसायात अपेक्षित धनलाभ होतील.
मिथुन – येत्या आठवड्यात कामाच्या निमित्ताने धावपळ होईल, त्यामुळे शारीरिक थकवा जाणवेल. अष्टम भावातील पंचग्रही, लग्नेश बुध, शनी-मंगळ-शुक्र-प्लूटोसोबत. अर्धशिशी, मानसिक दडपण याचे त्रास असणार्यांना काही दिवस काळजी घ्यावी लागेल. आठवड्याची सुरुवात आर्थिक बाबतीत सकारात्मक राहणार आहे. वाहन सावकाश चालवा, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हातपायाचे हाड मोडून प्रâॅक्चरसारखे प्रकार होण्याची शक्यता आहे. संततीस जपा, त्यांची विशेष काळजी घ्या. वैवाहिक सौख्य लाभेल. काही जुन्या मित्रांच्या भेटी होतील.
कर्क – थोडे खट्टे, थोडे मिठे अनुभव येत्या आठवड्यात येतील. सप्तमात पाच ग्रह असल्यामुळे काही चांगल्या तर काही मनस्ताप देणार्या घटनांचा अनुभव येईल. आपण केलेले काम चूक आहे की बरोबर अशी मनाची संभ्रम करणारी अवस्था निर्माण होईल. तरुण मंडळींना सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तींबरोबर भेटण्याचा योग आहे. पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग होण्याची शक्यता आहे. भागीदारीतील व्यावसायिकांनी एकमताने निर्णय घेण्यात समजदारी दाखवावी. नोकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग अनुभवास येतील. कुटुंबासाठी एखाद्या गरजेच्या वस्तूची खरेदी होईल. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी चांगला आठवडा राहणार आहे.
सिंह – येत्या आठवड्यात प्रतिष्ठित व्यक्तीचा सहवास लाभणार आहे. रवीचे कुंभेतील सप्तमातील भ्रमण त्यासोबत गुरु (अस्त) आहे. विवाहेच्छुक मंडळींसाठी हा आठवडा सकारात्मक रिझल्ट देणारा राहील. महिलांना काही काळ शारीरिक व्याधीचा राहणार आहे. खासकरून गरोदर महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणार्या मंडळींसाठी हा आठवडा फायदेशीर राहणार आहे. स्पर्धेत यश मिळेल.
कन्या – या काळात चांगले यश मिळेल. बुधाचे थोड्या कालावधीपुरते वास्तव्य पंचमात, त्यासोबत शनि-मंगळ- प्लूटो-शुक्र त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात घवघवीत यश मिळेल. खेळाडूंसाठी हा काळ अतिशय लाभदायक राहणार आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी प्रायोजक मिळवण्याच्या पर्यटनात असाल तर त्यात यश मिळेल. कलाकार मंडळी, संगीत, फॅशन, या क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय लाभदायक राहणार आहे. पाच आणि सहा तारखेस पैशाचे व्यवहार टाळा. अन्यथा तडजोड स्वीकारावी लागेल. सल्लागार म्हणून काम करणार्या मंडळींना शुभ काळ राहणार आहे, आपल्या बोलण्याचा चांगला फायदा त्यांना होईल.
तूळ – उद्योजक, व्यावसायिक, फिरतीची नोकरी असणार्या मंडळींसाठी हा आठवडा खूपच धावपळीचा राहणार आहे. सुखस्थानात पंचग्रही, शनी-मंगळ-बुध-शुक्र-प्लूटो एकत्र, शनि मंगळाची दृष्टी सप्तम भावावर. दाम्पत्यजीवनात कुरबुरी राहतील. विनाकारण कोणत्याही विषयात आकांडतांडव होण्यापर्यंत वाद टाळा. शिक्षणक्षेत्रातील मंडळींसाठी शुभ काळ राहील. खासगी अथवा सरकारी ठिकाणी सल्लागार अथवा मध्यस्थीचे काम करणार्या मंडळींची प्रतिष्ठा वाढणार आहे. कमी-अधिक प्रमाणात आरोग्याच्या समस्या जाणवतील. मात्र, त्या त्रासदायक नसतील.
वृश्चिक – राशीस्वामी मंगळ उच्च पराक्रम भावात, पंचग्रही, बुद्धाचे होणारे कुंभेतील राश्यांतर त्यामुळे कर्तृत्व सिद्ध करून दाखवणार आहात. हाती घेतलेले काम तडीस नेण्याची किमया साध्य कराल. नोकरीसोबत व्यवसाय करण्याची कल्पना करत असाल तर त्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे. वडीलधार्या माणसांचा सल्ला संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे कोणतेही कार्य करण्याबाबत योग्य विचार करून निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी जुन्या मित्रमंडळींची गाठभेट होईल. कार्यक्षेत्रात त्याचा उपयोग होईल.
धनू – मन:स्थिती व्दिधा राहणार आहे. साडेसातीचा काळ सुरु आहे. पंचग्रही व्दितीय भावात आहे. त्याम्ाुळे बोलताना प्रखर शब्दप्रयोग टाळा. चुकीचे बोलून शत्रू वाढवून घेऊ नका. व्यसनाधीन होणे टाळा. ग्रहस्थिती बदलत असल्यामुळे आर्थिक गणिते अचूक ठरतील. त्यामधून अनपेक्षित लाभ होतील. प्रवासयोग जुळून येतील. लांबच्या प्रवासाचे नियोजन करा. कर्जाबाबतची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक सुधारेल. आदरतिथ्य क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी चांगला काळ आहे, आर्थिक लाभ चांगले होतील.
मकर – लग्नामध्ये पंचग्रही, उच्च मंगळ, सप्तम भावावर पंचग्रहींची दृष्टी, कोर्टकचेरीच्या संदर्भात प्रश्न निर्माण होतील. व्यापारीवर्गाला खूप कष्ट करावे लागतील. वैवाहिक सौख्याऐवजी कडवटपणाचा अनुभव येईल. प्रवासामुळे कंबरदुखीचे दुखणे वाढेल. स्थावर मिळकतीमधून वादाचे प्रसंग घडतील. जिवलग मित्रांपासून धोका संभवतो. व्यवहार करताना नियम पाळा. चुकीचे काम करू नका. आंधळा विश्वास ठेवून कोणताही निर्णय घेऊ नका.
कुंभ – मनासारख्या घटना घडल्यामुळे आनंदात राहाल. राशिस्वामी शनि व्यय भावात, व्यय भावात पंचग्रही, षष्ठभावावर पाच ग्रहांची दृष्टी. सध्या या राशीच्या मंडळींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, लग्नामधील रवी-गुरु युतीमुळे मनासारखी कामे होतील. अनपेक्षित गाठीभेटी होतील. उच्चपदस्थ व्यक्तींच्या सहकार्यामुळे नव्या कामाला हातभार लागेल. विद्यार्थीवर्गाला परीक्षेत भरघोस यश मिळेल. शेअर बाजारात सावध भूमिका ठेवा. पूर्वी केलेल्या सत्कर्माचे अनुभव या आठवड्यात येतील.
मीन – अपेक्षापूर्तीचा काळ राहणार आहे. लाभात पंचग्रही. वाहनखरेदीचा योग जुळून येईल. काही मंडळींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रॉपर्टीच्या संदर्भात काही अनिश्चित नुकसान होऊ शकते. औषधोपचारावर पैसे खर्च होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक गणित चुकल्यामुळे तोटा सहन करावा लागेल. वडील बंधूसोबत वादाचे प्रसंग घडतील. संततीसोबत चिंता वाटावी अशी घटना घडेल. विमा, वारसा हक्क या माध्यमातून काही जणांना लाभ होण्याची शक्यता आहे.