अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, मंगळ तुळेत, ६ डिसेंबरनंतर वृश्चिकेत, रवी-केतू-बुध (अस्त) वृश्चिकेत, चंद्र वृश्चिकेत, त्यानंतर धनुमध्ये आणि सप्ताहाच्या अखेरीस कुंभेत, शुक्र धनू राशीत, ९ डिसेंबरपासून मकरेत, शनी-प्लूटो मकरेत, गुरू-नेपच्युन कुंभेत, हर्षल मेषेत.
दिनविशेष – ५ डिसेंबर रोजी मार्गशीष मास प्रारंभ.
मेष – तबियत ठीक तो सबकुछ ठीक असे म्हणतात. या आठवड्यात आरोग्याची काळजी कटाक्षाने घ्यावी लागणार आहे. मंगळाचे सप्तमातील तुळेमध्ये होणारे भ्रमण, दोन दिवसांनंतर म्हणजे ६ डिसेंबर रोजी अष्टमातील वृश्चिकेतील भ्रमण त्याबरोबर रवी-केतू यांच्याबरोबर होणारे योग यांच्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, त्यामुळे काळजी घ्या. अतिउत्साहाच्या भरात कामे पूर्ण कराल, त्यामधून चांगला मोबदलाही मिळेल. मात्र, त्यातून वाढणार्या धावपळीचा परिणाम तब्येतीवर होणार नाही याची खबरदारी घ्या. गुरूचे राश्यांतर झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक शुभघटना घडतील. शिष्यवृत्ती, प्रवेश, उच्चशिक्षणाच्या संधी यांच्यात सुसह्यता येईल. शुक्राचे मकर राशीत भ्रमण उद्योग-व्यवसायवाढीस चांगले फायदेशीर राहील. दाम्पत्यजीवनात खास करून महिलावर्गास अनपेक्षित लाभाचा काळ राहील.
वृषभ – सुख म्हणजे नक्की काय असते, याचा अनुभव या आठवड्यात येईल. राशिस्वामी शुक्राचे भाग्यात भ्रमण होत असल्यामुळे अनेक सुखद घटनांचे साक्षीदार व्हाल. मनाला आनंद देणारी घटना घडतील. नोकरीच्या निमित्ताने प्रवासाचे योग जुळून येतील. छोट्या-मोठ्या कारणामुळे दाम्पत्य जीवनात कुरबुरीचे प्रसंग घडतील. सहा डिसेंबर रोजी होत असणारे मंगळाचे सप्तमातील भ्रमण, रवी-केतू ग्रहण योग यामुळे थोडे ताणतणावाचे प्रसंग निर्माण होतील. जोडीदार, व्यावसायिक भागीदार यांच्यासोबत तू तू मैं मैंचे प्रसंग घडतील. ते टाळण्यासाठी या कालावधीत थोडा दुरावा ठेवलेला बरा. अन्यथा प्रसंग हाताबाहेर जाऊ शकतात. प्रेमी युगुलांनी अधिक काळजी घ्यावी. एखादी छोटी गोष्ट आत्मघातकी ठरू शकते. विद्यार्थीवर्गाचा हिरमोड होईल.
मिथुन – कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे महागात पडू शकते. बुध अस्तात, त्यासोबत येणारा मंगळ, रवी-केतू-बुध-मंगळ अशी ग्रहस्थिती षष्ठात राहणार आहे. नोकरदारवर्गापासून त्रासाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. धोका, फसवणूक, अशा घटनांचा सामना करावा लागू शकतो. उच्च रक्तदाब, हृदयविकार असणार्या मंडळींनी प्रकृतीची काळजी घ्यावी. मिथुन लग्न असणार्या मंडळींच्या कुंडलीत राजयोग होत आहे. नुकताच राश्यांतर झालेला भाग्यस्थानातील गुरू या राशीच्या मंडळींना चांगली फळे देणारा राहील. त्यामुळे अनपेक्षित लाभ मिळण्याचे प्रसंग अनुभवायला येतील.
कर्क – येत्या आठवड्यात अनेक शुभघटना होणार आहेत, त्यामुळे चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसेल. मंगळाचे पंचमातील राश्यांतर त्यामुळे काही अनपेक्षित लाभ पदरात पडतील. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. धावपळ टाळा, कोणताही त्रास जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ९ डिसेंबरनंतर सप्तमातील शुक्राचे मकरेतील भ्रमण होत असल्यामुळे आई-वडिलांकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे लाभ मिळतील. व्यवसायवृद्धीसाठी अनुकूल काळ आहे. अनेक दिवसांपासून अडकून पडलेले पैसे अचानक हातात पडतील.
सिंह – या आठवड्यात सुखद क्षण अनुभवायला मिळणार आहेत. एखादी नवीन कामाची संधी चालून येऊ शकते. पण, निर्णय घेताना थोडे वेट अँड वॉच करा. रवी ग्रहणयोगात, मंगळाचे सुखस्थानातले राश्यांतर त्यामुळे काही कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात. सळो की पळो करणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोणाशीही वाद वाढवू नका. जवळची व्यक्ती मदतीला धावून येईल. छोटा प्रवास घडेल. सासू-सुनेचे नाते सांभाळा. वाद विकोपाला जाऊ शकतो. विवाहेच्छु मंडळींचा लग्नाचा योग जमून येईल.
कन्या – विचार न करता कोणतीही कृती करू नका, अडचणीत याल. बुध अस्त स्थितीत, रवी-मंगळ-बुध-केतू पराक्रम भावात राहणार आहेत. त्यामुळे विचार ना करता कोणतीही कृती नको. चुकून शब्द द्याल आणि अडकून बसाल. वडील बंधूंकडून धोका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाऊबंदकीमधील व्यवहार पुढे ढकला, पराक्रमातील मंगळामुळे अंगातील जोश वाढेल. पण हुशारी दाखवू नका. शुक्राचे पंचमातील मकरेत होणारे भ्रमण खासकरून कला क्षेत्र, संगीत, साहित्य, करमणूक या क्षेत्रांसाठी अतिशय लाभदायक राहणार आहे.
तूळ – तोंडावर आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्याचे पथ्य या आठवड्यात पाळावे लागणार आहे. शुक्राचे ९ डिसेंबर रोजी मकरेतले राश्यांतर योगकारक शनीच्या मकर राशीमध्ये होणार आहे. ६ डिसेंबर रोजी मंगळाचे राश्यांतर वृश्चिकेत होणार आहे. रवी-केतू ग्रहणयोग आणि मंगळ-केतू अंगारक योग त्यामुळे खाण्यापिण्यावर निर्बंध ठेवणे, बंधनकारक राहणार आहे. चुकून खाण्याच्या मोहात पडाल आणि दवाखान्याची पायरी चढाल. कोणाशी बोलताना जरा जपून शब्द वापरा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. सुखस्थानातल्या शनीसोबत येणारा लग्नेश शुक्र, नुकताच राश्यांतर करून कुंभेत आलेला गुरू कौटुंबिक सौख्य आणि संततीसाठी शुभवार्ता घेऊन येईल. आर्थिक आवक सुधारणार असली तरी खर्च वाढत राहील. कलेशी जवळीक असणार्या मंडळींना हा आठवडा फायद्याचा राहील. विद्यार्थीवर्गासाठी उत्तम काळ.
वृश्चिक – हा आठवडा खूप धावपळीचा जाणार आहे. त्यामुळे घाई गडबड करून कोणताही निर्णय घेऊ नका. चुकून काहीतरी भलतेच घडेल. मंगळाचे ६ डिसेंबर रोजी स्वराशीत आगमन होत आहे. सुखस्थानातले गुरुचे राश्यांतर आणि ९ डिसेंबर रोजी शुक्राचे तृतियेतील भ्रमण यामुळे कोणत्याही कामाला गडबड करू नका. केतू-मंगळाच्या युती योगामुळे तडकाफडकी निर्णय घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. दाम्पत्यजीवनात ओढाताण निर्माण होईल. समज-गैरसमजातून वादंग उठण्यासारखी स्थिती निर्माण होईल. व्यावसायिक हितसंबंध जपा. अहंकार बाजूला ठेवला तर फायद्यात राहाल. नोकरीच्या ठिकाणी सांभाळून राहा. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील.
धनू – संमिश्र घटनांचा अनुभव या आठवड्यात येईल. मंगळाचे होणारे राश्यांतर व्यय भावातून होत आहे. शुक्राचे मकर राशीमधील राश्यांतर होत असल्यामुळे आर्थिक आवकजावक समसमान प्रमाणात राहील. षष्ठ भावातील मंगळामुळे जुना आजार पुन्हा डोके वर काढू शकतो. वैद्यकीय उपचारावर पैसे खर्च होतील. साडेसाती अजून सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी आर्थिक नुकसान होऊ शकते. प्रवासात काळजी घ्या म्हणजे झाले. भाग्यस्थानावर गुरुची दृष्टी असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात दानधर्माच्या स्वरूपात पैसे खर्च होतील. घरासाठी एखादी महागडी वस्तू घेण्यासाठी पैसे खर्च होतील.
मकर – अनपेक्षित लाभ मिळवून देण्यासाठी उत्तम काळ आहे. खासकरून लॉटरी, शेअरबाजार यामधून चांगले पैसे मिळतील. आईच्या इच्छेनुसार एखाद्या मौल्यवान वस्तूचा लाभ मिळेल. शुक्राचे मकरेतले राश्यांतर, गुरूचे कुंभेतील भ्रमण कौटुंबिक सौख्य मिळवून देईल. नवीन घर घेण्यासाठी कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर त्यात यश मिळेल. जुने येणे वसूल होईल. घरातील जुने हेवेदावे मार्गी लागतील. शनी-शुक्राबरोबर रवि-मंगळ-बुध-केतूचे लाभयोग अनेक शुभघटनांसाठी शुभकारक राहील.
मीन – येत्या आठवड्यात भरपूर लाभ मिळणार आहेत. कौटुंबिक सौख्य, आरोग्य एकदम उत्तम राहणार आहे. हातून एखादे सत्कर्म घडेल. नोकरीच्या ठिकाणी बदलीचे योग जुळून येत आहेत. नोकरदार मंडळींसाठी शुभ काळ राहणार आहे. देवदर्शनाला जाण्याचा योग आहे. नवीन गुंतवणूक कराल, त्यामधून चांगला लाभ होईल.