• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कोकणी कमाल

- शुभा प्रभू साटम (चला खाऊया!)

शुभा प्रभू साटम by शुभा प्रभू साटम
September 22, 2021
in चला खाऊया!
0

ओल्या काजूची भाजी, रस्सा किंवा पोहे, उप्पीट यात नारळ वापरणे कोकण, गोव्यात सर्रास प्रचलित आहे. पण शहाळे आणि काजू जोडी कुठे उगम पावली ते कळत नाही. कुठल्या तरी हुशार हॉटेलवाल्याची डोक्यालिटी आहे नक्की. मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये पण ही डिश जबर हिट आहे.
कॉपीराइट कदाचित त्यांचाच असावा. लोकांना अफाट आवडते. कोवळे खोबरे किंवा शहाळे घालून केलेले डोसा अथवा चटणी यांची चव फार सुंदर. हे शहाळेपुराण सांगायचे कारण सणासुदीच्या दिवसात घरी नारळ येतात. त्यांचा वापर करून नेहमीच्या जेवणात थोडा सोप्पा रुचीबदल करता येतो!!
ओले नसतील तर साधे काजू भिजवून चालतात. मसाला नेहमीचा साधा. दोन प्रकारे करू शकता, एक कांदा खोबरे वाटप घालून आणि दुसरी नारळदुधात मिरीखोबरे घालून. ही दुसर्‍या प्रकारे केलेली भाजी सौम्य असते. यात छोटी कोळंबी पण सुरेख चव देते. घरच्या घरी आपली मेजवानी…
गणपती किंवा भाद्रपद महिन्यात हंगामी पावसाळी तवसे/ काकडी मिळते. याची साल जाड असते. खूप जून झालेल्या काकड्या गणपतीच्या माटवी सजवायला वापरल्या जातात. नेहमीच्या काकड्यांप्रमाणे यांची कोशिंबीर न करता गोड पक्वान्न होते, ज्याचे नाव धोंडस किंवा सांदण. एक प्रकारचा केकच. कमीत कमी साहित्यात होणारे पक्वान्न. याच्या कृती वेगवेगळ्या असतात. गावाकडे चूल असतेच त्यामुळे हे धोंडस वर निखारे ठेवून भाजले जाते. ही झाली पारंपरिक कृती. निखारे नसल्यास ओव्हनमध्ये भाजतात. आपण यातील सुवर्णमध्य काढू. उकडून करू. शंभर टक्के व्हेगन असे हे पक्वान्न आहे.

काकडी सांदण/धोंडस

साहित्य :
मोठी पिवळसर काकडी जाडसर किसून (बिया वगळाव्यात)- १ वाटी
इडली रवा/ जाड रवा/ तांदूळ रवा- १ वाटी
गूळ किसून- १ वाटी
पाणी- १ वाटी
ओले खोबरे काप- पाव वाटी
शेंगदाणे भिजवून थोडे
मनुका थोड्या
वेलची
तूप

कृती :
काकडी किसाला गूळ फासून ठेवावा.
जाड बुडाच्या टोपात तूप तापवून त्यात इडली रवा गुलाबीसर भाजून घ्यावा.
त्यात एक वाटी गरम पाणी घालून, मिश्रण ढवळून, मंद आगीवर थोडावेळ शिजवावे.
आता यात काकडी-गूळ मिश्रण घालून, व्यवस्थित ढवळून घ्यावे.
मिश्रण प्रथम पातळ होऊन मग घट्ट होऊ लागेल आणि काकडी पारदर्शक दिसू लागेल की वेलचीपूड + शेंगदाणे + खोबरे काप + मनुका टाकून, व्यवस्थित ढवळून, मंद गॅसवर खदखदू द्यावे. सतत ढवळत राहावे. गूळ पूर्ण विरघळू द्यावा.
खोलगट डब्याला तूप नीट फासून घ्यावे.
साधारण घट्ट होत आले, की या डब्यात ओतून, ठोकून एकसमान करावे, तुम्हाला हळद पाने मिळाली तर वर पसरावी.
कुकर अथवा इडलीपात्रात पाणी गरम करावे. आणि हा डबा त्यात ठेवून १५/२० मिनिटे वाफवून घ्यावे.
सुरी खुपसून पहावे. कोरडी सुरी आली म्हणजे शिजले. आता प्लेटमध्ये उलटं करून घ्यावे.
दुसर्‍या कृतीमध्ये
खरपूस तापलेल्या कढईत भांडे ठेवून, भांड्यावर झाकण ठेवून भाजू शकता. अर्धा तास लागेल.

शहाळे काजू भाजी

साहित्य :
ओले अथवा नेहमीचे काजू (तुकडा)- १ वाटी कोमट पाण्यात भिजवून
कोवळे खोबरे/ मलई -१ वाटी लांबट तुकडे करून
शहाळे पाणी- १/२ वाटी
कांदा- १ मोठा बारीक चिरून
मालवणी मसाला
लाल तिखट
आले लसूण वाटण
कांदा खोबरे खमंग भाजून, वाटून अर्धी वाटी
मीठ
तेल

कृती :
कढईत तेल कडकडीत गरम करून, तमालपत्र + मिरी + जिरे फोडणी करावी.
आता बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी करावा, आले-लसूण टाकून, परतून त्यात भिजवलेले काजू, हळद, तिखट, गरम मसाला असे क्रमाक्रमाने टाकावे. व्यवस्थित ढवळून, अंगाबरोबरच्या पाण्यात पाचेक मिनिटे शिजवावे.
कांदा खोबरे वाटण + नारळ पाणी घालून, हवे तितके सरसरीत करावे, आता शहाळे तुकडे आणि मीठ घालून, ढवळून मंद आचेवर एक वाफ घ्यावी.
यात शक्यतो गूळ घालू नये.

शहाळे काजू सुक्के

साहित्य :
काजू भिजवून १ वाटी
कोवळे खोबरे/ मलई १ वाटी, लांबट तुकडे
नारळ दूध १/२ वाटी
कोथिंबीर + मिरची + आले + मिरी + लसूण + ओले खोबरे वाटून १/२ वाटी.
कांदा १ वाटून.

कृती :
तेल तापवून जिरे आणि हिंग फोडणी करा.
आता कांदा घालून गुलाबीसर झाला की हिरवे वाटण घालून परतून हळद आणि काजू घालून परतावे. किंचित कोमट पाणी, मीठ, शहाळे तुकडे आणि एक उकळी. गॅस मंद ठेवा. आता नारळ दूध आणि परतून झाकण ठेवून एक मोठी वाफ घ्यावी.
ही भाजी फार पातळ नसते. नैवेद्यासाठी हवी तर लसूण कांदा वगळू शकता.

– शुभा प्रभू साटम

(लेखिकेचे पारंपरिक अन्न या विषयावर प्रभुत्व आहे)

Previous Post

रबर स्टार विजय पाटकर

Next Post

पुलावरची बाई…

Next Post

पुलावरची बाई...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.