• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कसा पण टाका…

तुमचे प्रश्न आणि त्यावर हृषिकेश जोशींचे खुमासदार उत्तर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
September 2, 2021
in कसा पण टाका
0

बटाट पोहे, वांगी पोहे, कांदा पोहे, इंदौरी पोहे की तर्रीवाले पोहे… तुमची फेवरिट डिश कोणती?
अन्वय जोशी, दादर
– माझी फेव्हरेट डिश म्हणाल तर गोडाचा उत्तम शिरा.

बाहेर पावसाची झिम्माड झिम झिम सुरू असताना, हवेत हवाहवासा गारवा असताना तुम्हाला कशाची आठवण येते?
रमाकांत चेंबूरकर, वसई
– स्वेटर धुऊन घातला असता तर बरं झालं असतं याची.

धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय… काय करू?
अविनाश कुलकर्णी, नाशिक
– लचके तुटत नाहीत तोवर कंटाळा येईस्तोवर खेळत बसायचं.

तुमचं एखादं मंदिर कधी बांधलं जाणार?
निसर्ग रावतेकर, रत्नागिरी
– मेल्यावरचं माहित नाही आणि जिवंतपणी बांधायला तेवढे पैसे नाहीत.

आमच्या महाडमध्ये हल्ली इतकं पाणी भरतं की पावसाळ्यात मगरीच पाळण्याचा जोड व्यवसाय करावा म्हणतोय. तुमचा सल्ला काय?
अण्णा दरेकर, महाड
– हो हो अगदीच. एकेक मिळतील तशा धरून ठेवा. पुढच्या पावसाळ्यात उद्घाटन करता येईल.

‘सर असुरण’, ‘कर्णन’, ‘पेरीयेरम पेरुमल’ यांसारखे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत का नाहीत बनवत? तसे चित्रपट मराठीत फक्त बोटावर मोजण्याइतके आहेत. आणि मराठीत तेच तेच विषय वारंवार का वापरला जातात अन् वरून मोठे नामांकित दिग्दर्शक आम्हा मराठी प्रेक्षकांना ओरडून सांगतात, मराठी सिनेमे पाहा म्हणून. तुम्ही बनवणार्‍या चित्रपटात दर्जा अन चांगली कथा असेल तर मराठी प्रेक्षक दुसरीकडे कशाला जातील?
अनिकेत कारणे, नांदेड
– मराठी चित्रपट बनण्यापर्यंत सगळी मराठी माणसं असतात. त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर प्रदर्शित होण्यापर्यंत एकही माणूस मराठी नसतो. त्यामुळे त्याचा व्यवसाय संपूर्णपणे अमराठी लोकांच्या हातात आहे. वर मराठी प्रेक्षकांसाठी मराठी सिनेमा ही प्रायॉरिटीच नाहीये. दक्षिणेत सर्व व्यवसायही त्यांच्या हातात आहे आणि प्रेक्षकांसाठी त्यांच्या भाषेतला सिनेमा ही सर्वात पहिली प्रायोरिटी असते. त्यामुळे तिकडे २०-२५ कोटींपासून १०० कोटींपर्यंतचे सिनेमे बनतात. ते नफा मिळवून देण्याइतपत पाहिले जातात. आणि त्याचा फायदा त्यांनाच मिळतो. आपलं दुष्टचक्र निराळं आहे.

सर तुम्ही स्वत:ला नॉर्मल माणूस मानता की?…
सुयश गांगुर्डे, घाटकोपर
– माणसाला आयुष्यात ‘स्पेशल’ बनण्यासाठी आधी ‘नॉर्मल’च जन्माला यावं लागतं. तसा मी आलोय. तुम्ही दिलेला दुसरा ऑप्शन काहीही असला तरी मी ‘माणूस’ म्हणूनच जगतो.

काबूलमध्ये अवघ्या एक लाखात एअरपोर्टशेजारी १० रूमचा बंगला मिळतोय, गार्डन पण आहे म्हणे! घेऊन टाकू का?
अभिषेक सांगळे, गायवाडी
– आधी घेऊन नंतर टाकावाच लागणार असेल तर पैसेही तुमचेच आणि बंगलाही तुमचाच.

जो बायडेननी डिट्टो सौदागर सिनेमातला राजकुमारचा डायलॉग मारला परवा, आयसिसच्या दहशतवाद्यांना खतम करू, जागा आमची, बंदूक आमची आणि वेळ आम्ही ठरवू ती… हे सगळे चोरून हिंदी सिनेमे बघत असतील काय?
शंतनु वायंगणकर, कुडाळ
– त्यांनी नक्कीच नसतील बघितलेले. कारण कुठे काय बोलावं हे त्यांना नक्कीच कळलं असतं.

तुम्ही जीव तोडून काम केलंत आणि काम करून घेणार्‍याने तुमचे पैसे बुडवलेत, असं कधी झालंय का? अशावेळी काय करता?
चित्रा शिंदे, भवानी पेठ, पुणे
– नुसतं जीव तोडून कुठेच काही होत नाही. व्यावसायिकता चाणाक्षपणे आणि प्रामाणिकपणे यावीच लागते. ती मी खूपच सुरुवातीपासून शिकून आलो आहे. पैसे नसलेल्या ठिकाणीही जीव तोडून काम केलंय, करतो आणि जिथे पैसे कमवायचे असतात ते जीव तोडून कमावतोही.

सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?… तुम्ही पाहिलात का?
प्रमोद खोटे, जळगाव
– फोटो टाकून फेसबुकवर पोस्ट करा ना त्यापेक्षा. मी एकटा कुठे कुठे शोधणार?

मला कोणत्याही पदाचा मोह नाही, मी फक्त जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलो आहे, असं एखादा पुढारी म्हणतो, तेव्हा तुमच्या मनात काय भावना येते?
विष्णु जाधव, सातारा
– त्या पुढार्‍याबद्दल मग काहीच वाटत नाही.

Previous Post

रागावर ताबा कसा मिळवावा?

Next Post

‘काळी माती’ सिनेमात बैल पोळ्याचे गाणे

Next Post
‘काळी माती’ सिनेमात बैल पोळ्याचे गाणे

'काळी माती' सिनेमात बैल पोळ्याचे गाणे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.