• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कडबू, दिंड, खांडवी, तंबीट : ‘तम्मूचे उत्तम कडबू’

- जुई कुलकर्णी (चला खाऊया!)

जुई कुलकर्णी by जुई कुलकर्णी
September 2, 2021
in चला खाऊया!
0

पुरण भरलेली करंजी म्हणजेच कडबू. माझी आजी मिरज धारवाडकडील असल्याने लहानपणी हा पदार्थ आमच्याकडे बरेचदा होत असे. कडबू करताना पुरणपोळीसारखं बायकांच्या डोक्यावर टेन्शन नसतं.
आपलं नेहमीचंच पुरण पण जरा खुटखुटीत करायचं, डाळ जरा भरडच ठेवायची आणि या पुरणात चिरलेले काजूपण असतात. पारी कणीक आणि बारीक रव्याची असते. तेल घालून घट्ट भिजवायची. पुरण भरून कडबू खमंग तळून काढतात.
कडबूचं पोट बोटानं फोडून आत तूप भरून चेपायचं ही क्रिया मोठीच मनोरम असते.
चंद्रकोरीचा आकार पदार्थाला देणारी पहिली बाई भलतीच रोमँटिक सुगरण असणार.
कडबू नैवेद्याचे असतील तर त्या पुरणात खडीसाखरही घालतात आणि किंचित भीमसेनी कापराचा खमंग वासही असेल. पुरणात खोबर्‍याचे बारीक तुकडे आणि जराशी खसखसपण घालतात. कडुबूचं पुरण मऊ गुळगुळीत वाटत नाहीत. जराशी डाळ राहायला हवी. मुरडीचे कडबू अधिक देखणे दिसतात.
नागपंचमी हा खास माहेरवाशिणींचा सण.
तर या कौतुकाच्या माहेरवाशिणींसाठी आवर्जून तंबीट लाडू केले जातात. हे लाडू पाकाची भानगड नसल्याने सोपे आहेत.

तंबीटाचे लाडू

तांदळाची पिठी एक वाटी ,पिठीसाखर अर्धा वाटी, तूप दीड टेबलस्पून, सुके खोबरे आणि तीळ भाजून कूट करून घ्यायचे- पाव वाटी, वेलची, जायफळ पूड.
१. तुपात पीठ सतत ढवळत तांबूस भाजून घ्यायचं.
२. तीळ सुकं खोबरं भाजून कूट आणि पिठीसाखर असं सर्व एकत्रित मिसळून खूप मळून लाडू करायचे.
३. मळताना पीठ कोरडं वाटलं तर लागेल तसा तुपाचा हात लावायचा, दूध घालायचं नाही.
४. लाडू गरगरीत गोल करून मध्ये किंचित अंगठ्याने दाबायचं.
तांदूळपिठीऐवजी डाळव्याचं पीठ करूनही हे लाडू करतात.

 

खांडवी

खांडवी हा पदार्थ तुम्ही गूगलवर शोधलात तर सुरळीची वडी दिसेल. पण मराठी खांडवी हा कोकणातला हा खास पदार्थ आहे. हा साधा सोपा, फार चविष्ट पण बराचसा दुर्लक्षित पदार्थ आहे. तांदळाच्या कण्या काढून त्या तुपावर खमंग भाजून खांडवी करत. पण हल्ली आपण इडली रवा वापरू शकतो.
साहित्य : एक वाटी इडली रवा, एक टेबलस्पून तूप, एक वाटी गूळ, अर्धा टीस्पून आलं किसून, वेलचीपूड पाव टीस्पून, मीठ चिमूटभर, दोन वाट्या पाणी.
कृती :
१. इडली रवा तुपावर भाजून त्यात अर्धा टीस्पून आलं किसून घालायचं. मग दुप्पट पाणी घालून शिजवून घायचं.
२. त्यात जेव्हढ्यास तेवढा गूळ म्हणजे एक वाटी रवा तर २ वाट्या पाणी आणि एक वाटी गूळ घालून शिर्‍यासारखा शिजवून घ्यायचं. चिमूटभर मीठ घालायचं. वेलचीपूड घालायची.
३. शिजल्यावर ताटाला तूप लावून ते वड्यांसारखं थापून घ्यायचं. वरून ओलं खोबरं घालायचं आणि गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

पुरणाचे दिंड

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत अजूनही, विशेषतः ग्रामीण भागात पाळले जातात. म्हणून मग या दिवशी वाफवलेले पदार्थ करण्याची प्रथा आली. मला तर हे गृहिणींच्या कल्पनाशक्तीला केलेलं आव्हान वाटतं.
असाच खास नागपंचमीच्या दिवशी केला जाणारा एक पारंपारिक वाफावलेला गोड पदार्थ म्हणजे दिंड.
साहित्य : सारणासाठी- चणा डाळ – १ कप, गूळ- १ कप, जायफळ वेलची पूड – पाव टीस्पून
आवरणासाठी – गव्हाचं पीठ- २ कप, तेल- ३ टेबलस्पून (मोहन), चिमूटभर मीठ, पाणी आवश्यकतेनुसार.
साजूक तूप खाताना.
कृती :
१. चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. त्यात ३ कप पाणी घालून कुकरमध्ये चार शिट्या होईपर्यंत मोठ्या गॅसवर शिजवून घ्यावी. ४ शिट्या झाल्या की गॅस मंद करून आणखी १० मिनिटं शिजू द्यावी. मग गॅस बंद करावा.
२. दिंडाच्या आवरणासाठी कणिक मळून घ्यावी. चिमूटभर मीठ घालावे. ३ टेबलस्पून तेल एका छोट्या कडल्यात कडकडीत गरम करून ते तेलाचे मोहन कणकेत ओतावे. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्यावी. वीस मिनिटं मुरू द्यावी.
३. कुकरची वाफ निघाली की चणा डाळ एका चाळणीवर निथळून त्यातलं सगळं पाणी काढून टाकावे (हे पाणी फेकू नये, कटाची आमटी करण्यासाठी वापरता येईल). आताही शिजलेली चणा डाळ एका नॉनस्टिक पॅनमध्ये काढून मंद गॅसवर शिजवावे. डाळ अगदी एकजीव व जरा कोरडी होईपर्यंत परतावी. पुरण थंड झाल्यावर आणखी कोरडं होतं. डाळीतलं सगळं पाणी आटून डाळ जरा कोरडी झाली की त्यात गूळ घालावा. गूळ घातला की हे मिश्रण पुन्हा थोडं पातळ होईल. गूळ पूर्ण विरघळून मिश्रण पुन्हा घट्ट एकजीव होईपर्यंत सतत हलवत राहावे. लाकडी उलथणे किंवा स्मॅशरने चांगले घोटून घ्यावे. छान मिळून आलं की त्यात जायफळ वेलची पूड घालून व्यवस्थित हलवून घ्यावे. गार होऊ द्यावे.
४. मोदकपात्र किंवा इडलीपात्र किंवा मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. मोदकपात्राची प्लेट किंवा चाळणीला तेलाचा हात लावून घ्यावा.
५. कणकेच्या लाटीची पातळ पुरी लाटावी, मधोमध भरीव होईल इतके पुरण ठेवावे व समोरासमोरील बाजू पुरणावर ठेवून चौकोनी आकारात लिफाफ्याप्रमाणे बंद करावे. अशा प्रकारे दिंड तयार करून घ्यावेत.
६. आता मोदकपात्रातील चाळणीवर हे दिंड ठेवून मोदकाप्रमाणे १५ ते २० मिनिटे वाफवून घ्यावे.
७. वाढताना बोटाने प्रत्येक दिंडात मध्ये भोक करून त्यावर साजूक तूप घालून गरमागरम खावेत.

(लेखिकेला पारंपरिक अन्नपदार्थांविषयी उत्सुकता आहे आणि पाककलेत रुची आहे.)

Previous Post

विलासराव देशमुख नशीबवान नेता

Next Post

आता चर्चा होऊकंच व्हंयी

Related Posts

चला खाऊया!

फ्राईड राईस

May 15, 2025
चला खाऊया!

मजेदार मेडिटेरियन!

May 5, 2025
चला खाऊया!

सॅलेड्स : एक पूर्ण आहार

April 18, 2025
चला खाऊया!

मूर्तिमंत माधुर्य, चिरोटे!!

April 11, 2025
Next Post
आता चर्चा होऊकंच व्हंयी

आता चर्चा होऊकंच व्हंयी

कुटुंब रंगलंय फेकंफेकीत

कुटुंब रंगलंय फेकंफेकीत

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.