छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘क्यों रिश्तों में कट्टीबट्टी’ या मालिकेने नुकताच आपला २०० भागांचा टप्पा पार केला. ही मालिका एका अशा दोन मुलांची कहाणी दाखवते, जे आपापल्या आईसोबत आपल्या वडिलांना परत मिळवण्याची खटपट करत आहेत. या मालिकेत नेहा आणि सिद्धार्थ यांनी नायक व नायिका साकारले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळणारा दमदार सपोर्ट पाहून ते खूश झाले असून त्यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत प्रेक्षकांचे मनापासून आभारही मानले आहेत. नेहा या शोच्या २०० भागांबाबत बोलताना म्हणते, आम्ही हा टप्पा पार केल्याचा मला खूप खूप आनंद वाटतोय. आमच्या युनिटमधल्या प्रत्येकाचे हे श्रेय आहे. कारण या प्रत्येकाने आपले सर्वस्व पणाला लावून ही मालिका बनवली आहे. आमच्या सर्वांच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश म्हणूनच आनंदाचे वाटतेय. आमच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. याचा अर्थ आमची मालिका, आमच्या व्यक्तिरेखा लोकांना आवडताहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते. कारण प्रेक्षकांशिवाय आम्ही हा पल्ला गाठूच शकलो नसतो, असेही तिने स्पष्ट केले.