• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘उसासून आलंय मन’ रसिकांच्या भेटीला

अश्विनी बागलचा पहिलाच म्युझिक अल्बम

नितीन फणसे by नितीन फणसे
August 30, 2021
in मनोरंजन
0

संगीत हे सर्व तणावांवरील रामबाण उपाय असल्याचं सिद्ध झालं आहे. मागील दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या या तणावाच्या काळात मानवी मनाला म्युझिक थेरेपीची खरी गरज आहे. पिकल म्युझिकसारखी संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख म्युझिक कंपनी मागील दीड वर्षभरापासून विविध कारणांमुळं तणावाखाली जीवन जगणाऱ्या रसिकांसाठी रोमँटिक थेरेपी घेऊन आली आहे. स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत ‘उसासून आलंय मन’ या आगळ्या वेगळ्या प्रेमगीताचं पोस्टर लाँच झालेलं हे गाणं आता रिलीज करण्यात आलं आहे. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांची पिकल म्युझिक आणि शशिकांत पवार यांची प्रस्तुती असलेल्या ‘उसासून आलंय मन’ या गाण्याच्या पोस्टरनं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवल्यानंतर आता हे रोमँटिक साँग रसिकांच्या सेवेत सादर करण्यात आलं आहे.

मनमोहक व्हिडीओ आणि श्रवणीय ऑडीयो ही एम. ए. प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘उसासून आलंय मन’ या गाण्याची खासियत आहे. पोस्टरवर रिव्हील केलेल्या मनमोहक चेहऱ्याचं सौंदर्य या गाण्यात अधिकच खुलून दिसत आहे. नायिकेचं ते गावाकडचं रुपडं रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी पुरेसं आहे. अभिनेत्री अश्विनी बागलचं गांव की छोरीच्या रुपातील सौंदर्य आणि तिच्या जोडीला असलेला रोहन भोसले हा नवा चेहरा ‘उसासून आलंय मन’चा प्लस पॅाइंट ठरत आहे. या दोघांची केमिस्ट्री सिंगलमध्येही अगदी सहजपणे अनुभवायला मिळते. आजवर चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अश्विनीचा हा पहिलाच सिंगल असून, या गाण्याच्या निमित्तानं रोहननं प्रथमच कॅमेरा फेस केला आहे. उत्कृष्ट शब्दरचना, सुमधूर संगीतरचना आणि सहजसुंदर अभिनयानं सजलेलं ‘उसासून आलंय मन’ हे गाणं रसिकांना नक्कीच चांगली अनुभूती देईल. या गाण्याचं चित्रीकरणही आजवर कधीही कॅमेऱ्यात कैद न झालेल्या साताऱ्यातील लोकेशनवर करण्यात आलं आहे. त्यामुळं हे गाणं सर्वार्थानं रसिकांना एक फ्रेश अनुभव देणार आहे. या गाण्याबाबत अश्विनी म्हणाली की, माझ्या करियरमधील हे पहिलंच सिंगल आहे. एका रोमँटिक गाण्याच्या माध्यमातून पहिलं पाऊल टाकताना खूप आनंद होत आहे. तरुणाईसोबतच सर्व वयोगटातील रसिकांना भावणारी शब्दरचना आणि त्याला लाभलेली सुमधूर संगीताची साथ ही ‘उसासून आलंय मन’ या गाण्याची प्रमुख जमेची बाजू आहे. पिकल म्युझिकच्या माध्यमातून हे गाणं तळागाळातील संगीतप्रेमीपर्यंत पोहोचणार असल्याचंही अश्विनी म्हणाली.

‘मन उसासून आलं’ या गाण्याच्या निमित्तानं रसिकांना नावीन्यानं सजलेलं एक सुमधूर गाणं पाहिल्याचं समाधान मिळेल. कोरिओग्राफीपासून सिनेमॅटोग्राफीपर्यंत सर्वच क्षेत्रात वेगळा प्रयत्न केल्याचं जाणवतं. तरुण गीतकार वैभव भिलारे यांच्या लेखणीतून आकाराला आलेलं ‘उसासून आलंय मन’ हे गाणं वैभवनं विकी सक्सेनाच्या साथीनं संगीतबद्ध केलं आहे. वैभवनं स्वत:च हे गाणं गायलंही आहे. पंकज चव्हाणनं या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. अनुप जगदाळे यांचं विशेष सहकार्य लाभलेल्या या गाण्याची सिनेमॅटोग्राफी सूर्यकांत घोरपडेंची आहे, तर संकलन ऋषिराज जोशीनं केलं आहे.

Previous Post

मिलिंद कवडेंचा नवा चित्रपट लवकरच

Next Post

‘क्यों रिश्तों में कट्टीबट्टी’ मालिकेचे २०० भाग

Next Post
‘क्यों रिश्तों में कट्टीबट्टी’ मालिकेचे २०० भाग

‘क्यों रिश्तों में कट्टीबट्टी’ मालिकेचे २०० भाग

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.