• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

२४ जुलै भविष्यवाणी

- प्रशांत रामलिंग (२४ ते ३१ जुलै)

प्रशांत रामलिंग by प्रशांत रामलिंग
July 21, 2021
in भविष्यवाणी
0

अशी आहे ग्रहस्थिती
बुध मिथुनेत, रवी कर्केत, शुक्र आणि मंगळ सिंहेत, केतू वृश्चिकेत, चंद्र धनुमध्ये, त्यानंतर मकर, कुंभेत आणि सप्ताहाच्या अखेरीस मीनेत, शनि आणि प्लूटो (वक्री) मकरेत, गुरू आणि नेपच्यून (वक्री) कुंभेत, राहू वृषभेत. २७ जुलै रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी.

——-

मेष – अनेक दिवसांपासून काही नवीन मार्गाची चाचपणी करत असाल तर या आठवड्यात नक्की मार्ग सापडेल. गुरू नेपच्यून आणि शुक्र मंगल समसप्तक योगामुळे चांगले आर्थिक लाभ होतील. संततीबाबत सुवार्ता कानावर पडेल. विद्यार्थ्यांना शिक्षण, करियरबाबत घेतलेले निर्णय सकारात्मक ठरतील. काही कारणांमुळे घरातील नातेसंबधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी उच्चपदस्थ अधिकार्‍यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गोड बोलून काम करून घ्या.

वृषभ – येत्या आठवड्यात गृहसौख्याचा लाभ मिळेल, जास्तीत जास्त वेळ घरात घालवाल, त्यामुळे तुमचा उत्साह टिकून राहील. नोकरी, व्यवसायातून चांगली आर्थिक आवक होईल. शुक्र-मंगल-चंद्र नवपंचम योगामुळे धनप्राप्तीचे योग जमून येतील. मात्र, एखादे महत्वाचे काम करण्याच्या बेतात असाल तर तूर्तात ते पुढे ढकलणे हिताचे ठरणारे आहे. सरकारी कामाच्या ठिकाणी एका फटक्यात काम पूर्ण होणार नाही, चकरा माराव्या लागतील. सरकारी बाबूंकडून चिरीमिरीची मागणी होऊ शकते, द्यायची की नाही ते तुम्ही ठरवा.

मिथुन – या आठवड्यात मूड चांगला राहणार आहे, त्यामुळे कामे मार्गी लागतील. कुठे प्रेमप्रकरण सुरू असेल तर यश नक्की पदरात पडेल. उधार उसनवारी करू नका. बुध आणि गुरू नवपंचम योगामुळे संभाषण कौशल्य, पत्रव्यवहार, लेखनकला यामध्ये उत्तम यश मिळण्याचे योग जमून येत आहेत. खासकरून विद्यार्थीवर्गाला चांगली यशप्राप्ती होईल.

कर्क – एखादी नवीन व्यवसायाची आयडिया या काळात सुचू शकते. मात्र, त्यात पाऊल टाकणार असाल तर थोडा अभ्यास करा आणि नंतरच पुढे जा, म्हणजे चांगले यश मिळेल. देशात किंवा विदेशात प्रवासाचे योग जमून येत आहेत. एखादया कामातून अनपेक्षित लाभ पदरात पडू शकतो, त्यामुळे खूष राहाल. तुम्हाला अपेक्षित असणारे मनासारखे बदल घडून येतील, त्यामुळे आठवडा आनंदात जाईल, हे पक्के समजा.

सिंह – येत्या आठवड्यात मौजमजेसाठी पैसे खर्च कराल. एखाद्या ठिकाणी सहलीला देखील जाल. कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे जाल तिथे कोरोनाच्या नियमांचे पालन करा, नाहीतर नसती आफत मागे लागू शकते. सुखस्थानात असणार्‍या राहू-केतूमुळे कौटुंबिक वाद वाढण्यास खतपाणी मिळू शकते. चांगल्या प्रकारचे आर्थिक लाभ होतील, त्यामुळे खिसा भरलेला राहील.

कन्या – कुटुंबाबरोबर किंवा व्यावसायिक भागीदाराबरोबर सलोख्याचे संबध ठेवा. कोणत्याही कारणामुळे ताणतणाव निर्माण होणार नाही याची खासकरून काळजी घ्या. व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. कामाच्या निमित्ताने भरपूर प्रवास करावा लागणार आहे, तिथे वादाचे प्रसंग घडू शकतात. मन शांत ठेवा. अध्यात्मिक क्षेत्रात असाल तर एखादा चांगला अनुभव येईल.

तूळ – खिसा पाकीट या आठवड्यात भरलेले राहील. मंगळाचे होणारे राश्यांतर तुमच्यासाठी घबाडयोग घेऊन येत आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागण्यास आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे कामे पूर्ण करताना काही प्रमाणात तारांबळ उडेल. गुरूची कृपा चांगली राहील. घरात आई-वडिलांना आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व्यक्तींना मान द्या. मन शांत ठेवा. कोणत्याही प्रकारे कर्ज वाढवू नका.

वृश्चिक – या आठवड्यात काही वेगळे अनुभव येतील. मंगळाचे होत असणारे राश्यांतर पथ्यावर पडणार आहे. मात्र, वक्री शनि आणि प्लूटो यांची दृष्टी रविवर राहणार आहे, त्यामुळे सत्मार्गाने काम करा. कोणत्याही कामात चुकारपणा करू नका. अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. नोकरीत पदोन्नतीचे योग जमून येत आहेत. घरातील मंडळींबरोबर आठवडा आनंदात जाईल.

धनू – सप्ताहाच्या सुरुवातीला काही कारणांमुळे मन चिंताग्रस्त राहील. विनाकारण एखादी विवंचना लागून राहील. नोकरीमध्ये असाल तर बदली होऊ शकते. घरापासून लांब जावे लागू शकते. मात्र, त्यामुळे चांगला फायदा होईल. परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते. कुठे प्रेमप्रकरण सुरू असेल, तर त्यात अडकू नका. उगाच नसता त्रास मागे लागण्याची शक्यता आहे.

मकर – सध्या साडेसातीचा काळ सुरू आहे, त्यामुळे शुभकार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. व्यवसायात असाल तर मोठा घाटा होण्याची शक्यता आहे. दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार आहे. शुक्र-मंगळ-गुरू समसप्तक योग आणि लाभातले राहू-केतू यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसेल. धार्मिक ग्रंथपठण करा, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल.

कुंभ – मनामध्ये येणार्‍या शंका-कुशंकाचा परिणाम प्रकृतीवर होईल. आठवड्याची अखेर विशेष लाभदायी ठरणार आहे. गुरू-चंद्र-शुक्र-मंगळ यामुळे आर्थिक बाजू चांगली राहील. कुटुंबाबरोबर थोड्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थीवर्गाला नवीन शिक्षणाच्या संधी मिळतील. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि खाण्यापिण्याची पथ्ये सांभाळा.

मीन – आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. विद्यार्थीवर्गाला नवीन प्रवेशाबाबत विलंब होऊ शकतो. बुधामुळे कौटुंबिक वार्ता आनंद देणारी ठरणार आहे. धार्मिक वृत्तीच्या लोकांना अध्यात्मिक क्षेत्रात विशेष अनुभव येईल. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस तोंड द्यावे लागेल. ऑफिसात एखादा निर्णय विरोधात जाऊ शकतो. त्यामुळे या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काळजी घ्या.

Previous Post

‘काळी माती’ला १९४ दिवसात 301 पारितोषिके

Next Post

शाबास पोरांनो, मनापासून अभिनंदन!

Next Post

शाबास पोरांनो, मनापासून अभिनंदन!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.