• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 30, 2021
in टपल्या आणि टिचक्या
0

□ कोरोनाकाळात गर्दी करून चंद्रभागेला प्रेतवाहिनी करायची आहे का?- विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा सवाल
■ चिंता करू नका. हा महाराष्ट्र आहे. इथले लोक राजकारणाला भुलून कोरोना संकटात शुंभमेळा भरवण्याइतके बेजबाबदार नाहीत.

□ ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट, लसीकरणावर भर
■ आमच्याकडेही तिसरी लाट येण्याची शक्यता; पण भर राजकारणावर, इव्हेंटबाजीवर, प्रतिमानिर्मितीवर.

□ कांदिवलीपाठोपाठ बोरिवलीतही बोगस लसीकरण झाल्याचा संशय
■ मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे हा शब्दप्रयोग आपल्याकडे कसा जन्माला आला असेल, तेच दाखवून देताहेत हे लोकांच्या जिवाशी खेळणारे नराधम.

□ पुण्यात चितळे बंधूंकडे २० लाखांची खंडणी मागणार्‍यांना अटक.
■ कोणीतरी सोशल मीडियावर म्हटलंय ते बरोबरच आहे, जागा चुकलात. तिथे अर्धा बाकरवडीचा तुकडाही जास्त मिळत नाही ग्राहकाला. तुम्हाला २० लाख द्यायला बसलेत.

□ कुडाळमध्ये शिवसेना १०० रुपयांत दोन लिटर पेट्रोल देणार या घोषणेने भाजपचा भडका
■ तुम्ही १०० रुपयांत चार लिटर द्या की! तुम्हाला काय कमी आहे? हवं तर एखादं पंचतारांकित पक्ष कार्यालय कमी बांधा.

□ चीनची कूटनीती जोरात, भारतातल्या अनेक क्षेत्रांना हॅकिंगचा धोका
■ आपल्याकडे सोशल मीडिया वापरून लोकांचे मेंदूही हॅक केले जातात, हे हॅकिंग चिल्लर आहे आपल्यासाठी.

□ जीवनसाथी निवडण्याचा व्यक्तीचा हक्क अबाधित; समाज किंवा सरकार हस्तक्षेप करू शकत नाही : न्यायालयाचा निर्वाळा
■ जिकडे तिकडे ‘लव्ह जिहाद’ दिसणार्‍यांना आणखी एक चपराक

□ संभाव्य पूरस्थिती टाळण्याच्या दृष्टीने अलमपट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत महाराष्ट्र-कर्नाटकात समन्वय
■ याच सामंजस्याने बिदर, भालकी, निप्पाणी, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रही होऊन जाऊ द्या.

□ श्रीमंत मुलांप्रमाणेच मध्यमवर्गीय आणि गरीब मुलांनाही
ऑनलाइन शिक्षण मिळावं यासाठी शैक्षणिक आणीबाणी जाहीर करावी : डॉ. सुनीलकुमार लवटे यांची मागणी
■ अगदी योग्य मागणी. आधीच एक वर्ष गेलं आहेच मुलांचं; आता तरी जागे व्हा!

□ केंद्र सरकारचा बंपर सेल सुरूच; सरकारी तेल कंपन्या १०० टक्के विकणार
■ त्या कोण खरेदी करणार तेही उघड आहे! हे त्यांचेच प्रधान सेवक आहेत.

□ लोकशाहीचे धडे आम्हाला देऊ नका : रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना सुनावले
■ बरोबर आहे त्यांचं… धडे त्यांना द्यावेत ज्यांच्यात काही शिकण्याची कुवत आहे… कोरोनाच्या पहिल्या लाटेने एवढा मोठा धडा दिलाष्ठ हे काही शिकले का?

□ चेन्नईत लस घेतलेल्या ग्राहकाला सलूनमध्ये ५० टक्के सवलत
■ बारवाल्यांनो, वाइन शॉपवाल्यांनो, जरा काहीतरी शिका या सलूनवाल्याकडून.

□ दूरदर्शनवरील प्रादेशिक भाषांतील बातमीपत्रांवर कुर्‍हाड आणण्याच्या हालचाली सुरू
■ एक देश, एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती अशा एकारलेल्या तत्त्वांना बळ दिल्याची ही फळं आहेत. मोकळंढाकळं वैविध्य हे आपलं बलस्थान आहे, याचा विसर पडला की प्रादेशिक तुकडे पडणं अटळ आहे.

□ सुसंस्कृत डोंबिवली आणि ऐतिहासिक कल्याण नशेच्या गर्तेत; एक कोटींचे एलएसडी पेपर सापडले
■ आपणच सुसंस्कृत आहोत आणि आपल्यालाच ऐतिहासिक वारसा आहे, यांच्या नशेपुढे एलएसडी क्या चीज है?

□ उत्तर प्रदेशात धर्मांतराचे रॅकेट; गोरगरीब हिंदूंना पैसे देऊन धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या मौलानांना अटक
■ इथल्या उच्चजातीचा टेंभा मिरवणार्‍या हिंदूंनी आधी आपल्याच धर्मातल्या गोरगरीब बांधवांना माणूसपणाचा दर्जा द्यावा, मग, पैशासाठी धर्म बदलण्याचं पातक त्यांच्याकडून होणारच नाही.

Previous Post

एका श्वासाची किंमत!

Next Post

रोहिणी नक्षत्र

Next Post
रोहिणी नक्षत्र

रोहिणी नक्षत्र

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.