• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मगजबाजीच्या गमतीजमती

(प्रबोधन १००) - सचिन परब

marmik by marmik
March 29, 2021
in प्रबोधन १००
0
मगजबाजीच्या गमतीजमती

गिरगावात मुक्काम असताना `बॅचलर लाईफ’च्या गमतीजमती प्रबोधनकारांनी रंगवून सांगितल्या आहेत. त्यात गरिबी आहे, पण त्याचं प्रदर्शन नाही. उलट एक मस्ती आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्राचा हा तुकडा अभावग्रस्त गावांतून नोकर्‍या शोधण्यासाठी मुंबईत आलेल्या पांढरपेशांच्या पहिल्या पिढीचं आत्मकथन बनलंय.

‘सामाजिक समतोलपणाचा कल श्रीमंतांच्या राक्षसी पोटाकडे कलंडल्यामुळेच आज पोटार्थी गरिबांचे हाल कुत्रासुद्धा खाईनासा झाला आहे. गरिबांच्या पोटाचे हे हाल किंवा त्यांच्या पोटाचे हे बंड जगाच्या दुःखाला सर्वस्वी कारण आहे.’
– प्रबोधनकार ठाकरे, ‘पोटाचे बंड’

प्रबोधनकारांचं आत्मचरित्र `माझी जीवनगाथा’ हे फक्त एका माणसाची गोष्ट नाहीच मुळी. त्यांचं सामाजिक आणि राजकीय भान किती तीव्र होतं, याविषयी वेगळं सांगायला नकोच. सामाजिक परस्परसंबंधांचे बारकावे नीट माहीत असलेल्या त्यांच्या काळातल्या महाराष्ट्रातल्या लिहित्या आणि कर्त्या लोकांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. या जाणिवांचा अँटेना कायम उभा ठेवून टिपलेल्या आठवणी कोणताही अविर्भाव न आणता सहजपणे सांगण्याची त्यांची हातोटी अफलातून आहे. त्यांच्या गोष्टीवेल्हाळपणामुळे आपल्याला लक्षातच येत नाही की `माझी जीवनगाथा’मध्ये आपण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाचा इतिहास वाचतोय.
१९०४-०५च्या सुमारास प्रबोधनकार काही महिने, कदाचित एखाद दोन वर्ष गिरगावात राहिले. त्याच्या त्या `बॅचलर लाईफ’मधल्या गमतीजमती त्यांनी रंगवून लिहिल्या आहे. ते बेधडक होते, रंगेल होते. पण हूडपणा किंवा रंगेलपणा करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. मुळात जबाबदारीची जाणीव असल्यामुळे घरची गरिबी त्यांना तसं करण्याची परवानगी देत नव्हतीच. तरीही ते घडणारी मुंबई, उभं राहणारं गिरगाव रसरसून अनुभवत होते. खिसे रिकामे होते, पण धमाल थांबली नव्हती. त्यामुळे त्यांच्या लिखाणात दुःखाचं प्रदर्शन करून सहानुभूतीची भीक दिसत नाही. उलट त्यात मस्ती आहे. त्यातून हे त्यांच्या एकट्याचं आत्मकथन उरत नाही. ती त्यांना चिकटलेल्या सगळ्याच फुकट्या मित्रांची गोष्ट बनते. आणि त्यांच्या आत्मचरित्राचा हा तुकडा अभावग्रस्त गावांतून नोकर्‍या शोधण्यासाठी मुंबईत आलेल्या पांढरपेशांच्या पहिल्या पिढीचं आत्मकथन बनतं.
प्रबोधनकारांनी सांगितलेल्या या धमाल गोष्टी मुळातूनच वाचायला हव्यात. त्याचा नायक प्रबोधनकार नाही, तर भास्कर रणदिवे नावाचा कॉपीरायटर आहे. आजच्या भाषेत विशेषत: जाहिरातींसाठी किंवा प्रसिद्धीच्या इतर माध्यमांसाठीचा मजकूर लिहून देणार्‍याला कॉपीरायटर म्हणतात. पण तेव्हा कॉपीरायटर या शब्दाचा अर्थच वेगळा होता. तेव्हा टाइपरायटर भारतात आले नव्हते. खरं तर टाइपरायटर यंत्र भारतात कधी आली ते नेमकं तारीखवार सांगता येत नाही. भारतातल्या टाइपरायटरचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार डेव्हिड अरनॉल्डही सांगतात, या यंत्रांच्या भारतातल्या आगमनाच्या कोणत्याच नोंदी सापडत नाहीत, पण किमान विसाव्या शतकाच्या दुसर्‍या दशकात मुंबईत तरी टाइपरायटर रुळले असावेत. कारण `विथ ग्रेट ट्रूथ अ‍ॅण्ड रिगार्ड’ या पुस्तकात १९१०ची जाहिरात सापडते. त्यात अमेरिकेतली रेमिंग्टन कंपनीने तेव्हा इंग्रजीबरोबरच मराठी आणि दुसर्‍या मराठीसह सहा भारतातल्या भाषांत टायपिंगची सुविधा असलेल्या टाइपरायटरची माहिती आहे. विशेष म्हणजे त्यात `कोरोना’ नावाचा फोल्डिंग टाइपरायटरही आहे.
सांगायची गोष्ट ही की, भास्कर रणदिवे या कॉपीरायटरच्या काळात मुंबईत टाइपरायटर नव्हते. त्यामुळे उत्तम इंग्रजी हस्ताक्षर असणारे कोर्टात सरकारी अर्ज आणि अपिलं लिहायचे. त्यांना खूप मागणी आणि उत्तम कमाई असायची. त्यांनाच कॉपीरायटर म्हटलं जात असे. सर महादेव भास्कर चौबळ हे हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती होते. रणदिवे त्यांच्या ऑफिसात कॉपीरायटरचं काम करायचा. तो गिरगावातल्या चाळीत प्रबोधनकारांच्या शेजारीच राहायचा. त्याचं लग्न झालं होतं आणि सोबत पत्नीही होती. प्रबोधनकारांनी फक्त तीन शब्दांत त्याचं व्यक्तिमत्व उभं केलंय, `मगजबाज बेरकी वल्ली.’
झावबावाडीतल्या एका खोलीत राहणार्‍या बाराजणांपैकी फक्त प्रबोधनकार आणि रघुनाथ खोपकर हेच कमावते होते. त्या दोघांनी भाडं काही महिने निभावलं होतं. पण फुकट्या मित्रांवर होणार्‍या खर्चामुळे खोलीचं भाडं थकलं होतं. तेव्हाच्या काळात भाडी तुंबणं ही नवलाची गोष्ट नव्हतीच. आता मुंबईत घरं कमी आणि भाडेकरू जास्त आहेत. प्रबोधनकार सांगताहेत त्या काळात घरं जास्त आणि माणसं कमी होती. प्रबोधनकार वर्णन करतात, `त्यावेळी मुंबईत नवनव्या चाळी ठिकठिकाणी बांधल्या जात होत्या, पण भाडेकर्‍यांचीच काय ती टंचाई असे. जागोजाग `टू बी लेट’च्या पाट्या टांगलेल्या. केवळ याच लहानमोठ्या पाट्या रंगविणार्‍या पेण्टरांची खास दुकानेच होती.’
तरीही राहत्या घरातून भाडं न देता निघून जाण्यासाठी मगजबाज भास्कर रणदिवेंने `नाना फडणिशी’ डोकं चालवलं. हा प्रबोधनकारांचा शब्द. त्याने तिथून थोडं लांब मांगलवाडीत दोन जागा ठरवल्या. एक बेकारांच्या नरपागेसाठी आणि दुसरी स्वत:साठी. मग एका सकाळी त्याच्या युक्तीनुसार प्रबोधनकारांनी बेकार मित्रांकडे भाडं भरण्याचा हट्ट धरला. सगळ्यांशी कडाक्याचं भांडण केलं. हातघाईवर प्रकरण नेलं. भाडं द्यायचं नसेल, तर आत्ताच जागा खाली करून चालते व्हा, असं म्हणून यांनी मारल्यासारखं केलं. जागेची मिजास कशाला?, असं बडबडत ते सगळे एकेक करून निघाले. स्वतःच्या पांघरुणाच्या वळकट्या आणि ट्रंका डोक्यावर घेतल्याच, पण प्रबोधनकार आणि खोपकरांच्याही घेतल्या. सगळ्या रूममेटचं सामान नव्या जागेत पोचलं. आता खोलीत फक्त जुन्या फाटक्या पायताणांची रास, बुडाला भोक असलेली बालदी आणि बाहेर संडासात नेण्याचं टमरेल इतक्याच गोष्टी उरल्या. सगळ्यांना हाकलून दिलं, हे चाळ सांभाळणार्‍या भय्याचं सर्टिफिकेट घेऊन प्रबोधनकारही सटकले. गावी पेणला जाण्याचा बहाणा करून रणदिवेही निघून आला.
मांगलवाडीच्या नव्या जागेची चाळ मात्र जुनी होती. या चाळीत लावलेल्या बोर्डावर वाचलेला मजकूर प्रबोधनकारांनी जवळपास पन्नास वर्षांनी जसाच्या तसा नोंदवून ठेवलाय. `इया चारीमंदी कोलिया भारीयानी देन्याचा असो. बहियाला ईचारावा.’ भय्याच्या अगाध भाषेचा मराठी तर्जुमा असा, `या चाळीत खोल्या भाड्याने देण्याचे आहे. भय्याला विचारावे.’ आपल्यापैकी अनेकांना वाटतं की भय्ये मुंबईत आजकाल आलेत. पण ते १२० वर्षांपूर्वीच्या आठवणीत तरी आहेत.
ही नवी जागा भाडं बुडवून आलेल्यांसाठी योग्य अशीच होती. प्रबोधनकारांनी त्याचं फर्मास वर्णन केलंय. `आमची जागा खरोखरच चहुबाजूंनी तटबंदी होती. गल्लीत चालत गेल्याबरोबर समोर अचानक बोहर्‍यांची मशीद आडवी थाटलेली. म्हणजे रस्ता बंद पाहून परतण्याचा प्रसंग. पण तेथेच उजव्या बाजूला सहसा न दिसणारा चारफुटी बोळ. तेथूनही कोणी पुढे सरकलाच तर समोर बोहर्‍यांच्या कबरस्थानाची थडगी त्याला धमकवायला उभी. चटकन डाव्या बाजूला वळल्यावर मात्र आतील वाडीचा देखावा नजरेला पडायचा. सुप्रसिद्ध शिल्पकार म्हात्रे यांचे घर तेथेच. त्यासमोरच आमची दोन मजली चाळ. `या चाळीतल्या शंभर चौरस फुटी खोलीत बारा जणांचा संसार सुरू झाला आणि तो संसार चालवण्याची जबाबदारी प्रबोधनकारांवर आली.
आपल्याला चहा बनवून पिता यावा, म्हणून प्रबोधनकारांनी एक स्टोव्ह आणला होता, पण बाकीच्यांना न देता एकट्याने चहा पिताना तो घशाखाली उतरायचाच नाही. पण घरी पैसे पाठवायचे की, बेकार मित्रांना चहा पाजायचा, हा प्रश्न होताच. ते खोलीत एक पौंड म्हणजे साधारण अर्धा किलो चहा पावडर तसंच दूध भुकटीचा डबा आणून ठेवायचे, पण ते घराबाहेर पडताच त्याचा फन्ना उडायचा. त्यावरही भास्कर रणदिवेकडे उपाय होता.
प्रत्येकाने मिळतील त्या कोटाला आत मोठमोठे खिसे शिवून घेतले. ते घालून बाहेर पडले. चहावाल्याच्या किंवा किराण्याच्या दुकानात गेले. तिथे शहरातल्या एखाद्या मोठ्या नामदाराचं नाव घेतलं. त्यांच्या घरी लग्न आहे किंवा मुंज आहे असं सांगितलं. चहाचे नमुने दाखवा, साखरेचे दाखवा, असं सांगून नमुन्याच्या पुड्या गोळा केल्या. कागदावर भाव टिपून घेण्याचं नाटक केलं. असा सगळा बाजार फिरले. प्रबोधनकार खानावळीत जाऊन जेवून येईपर्यंत सात आठ किलो चहा पावडरीचा ढीग आणि तेवढाच वेगवेगळ्या प्रकारच्या साखरेचाही ढीग खोलीत पडला. आता दूध भुकटी विकत आणण्याची जबाबदारी प्रबोधनकारांची होती.
पण स्टोव्हच्या रॉकेलचा प्रश्न उरला होताच. त्यावरही भास्कर रणदिवे म्हणाला, `रॉकेलला काय पैसे मोजावे लागतात काय?’ रॉकेल चोरण्यासाठी रणदिवेने एक युक्ती केली होती. रॉकेल विकणारा भैय्या रोज संध्याकाळी चाळीत यायचा. चाळीचा जिना अरूंद होता म्हणून तो रॉकेलचा उघडा डबा कोपर्‍यावरच्या खोलीबाहेर ठेवून गिर्‍हाइकांच्या बाटल्या गोळ्या करण्यासाठी वर जायचा. कारण जिना अरूंद होता. कोपर्‍यावरची खोली यांचीच होती. रणदिवे तिथेच आडोशाला लपून बसलेला असायचा. रॉकेलवाला वर गेला की तो बाटली डब्यात बुचकळून भरून घ्यायचा. त्यावर त्याचं तत्त्वज्ञानही तयार असायचं, `हे नाही ते नाही, ही कसली रडगाणी गात बसता? या मुंबईत जगायचं आहे ना तुम्हाला? मग अशाच लटपटी केल्याशिवाय सुटका नाही. एरवी कोण शहाणा येणार तुमची कीव नि मदत करायला?’
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)

Previous Post

मराठी इतिहासाची वाङ्मयीन गाळण

Next Post

रंगी रंगला बेरंग!

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post
रंगी रंगला बेरंग!

रंगी रंगला बेरंग!

झी टॉकिजवर कॉमेडीचा तडका

झी टॉकिजवर कॉमेडीचा तडका

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.