कलर्स वाहिनीवरील ‘बॅरीस्टर बाबू’ या मालिकेने आता चांगलाच जम बसवला आहे. त्यातल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेच्या प्रत्येक एपिसोडमधून अनोख्या घटना घडताना दिसतात. यातच बोंदिता (औरा भटनागर) आणि अनिरुद्ध (प्रविष्ट मिश्रा) यांचे जीवनचरीत्र प्रेक्षकांसमोर उलगडत आहे. या सर्व नाट्यामध्ये कॅमेऱ्यासमोर घटना घडतच होत्या, पण त्याचवेळी कॅमेऱ्याच्या मागे चाहत तेवानी आणि औरा भटनागर या दोघीजणी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनल्या.
यावर बोलताना औरा भटनागर उर्फ बोंदिता म्हणाली, चाहत दिदी खूप गंमतीशीर आहे. मला तिची कंपनी खूप आवडते. आम्ही एकत्र खातो, अभ्यास करतो आणि गंमतीशीर व्हिडिओसुद्धा एकत्र पाहतो. मी माझ्या कुटुंबात सर्वात मोठी मुलगी आहे. त्यामुळे मला एखादी मोठी बहीण हवी असं मला नेहमी वाटायचं. चाहत दिदी मला मोठ्या बहिणीसारखीच वाटते, असेही ती स्पष्ट करते.