• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६

भास्कर आचार्य

Marmik Team by Marmik Team
September 28, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य

ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुनेत, गुरु कर्केत, शुक्र तुळेत, प्लूटो मकरेत, राहु कुंभेत, शनि नेपच्युन मीनेत, रवि-केतु सिंहेत, बुध कन्येत. दिनविशेष : २६ सप्टें. प्रौष्टपदी पौर्णिमा, २९ सप्टें. अंगारकी चतुर्थी, चंद्रोदय रा. ८ वा. १० मि., २ ऑक्टो. महात्मा गांधी जयंती.

 

मेष : नोकरी-व्यवसायात समजूतदारपणा कामी येईल. कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होईल. कोर्ट-कचेरीच्या कामामध्ये यश मिळेल. मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होईल. व्यवसायात महत्वाचे निर्णय पुढे ढकला. आठवड्याअखेर कामानिमित्ताने प्रवास करावे लागतील. आर्थिक स्थिती भक्कम राहील. कामात अहंकारी वृत्ती त्रासदायक ठरेल. यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा वापर टाळा. घरात मोठी कामाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. तरुणांना नव्या कामाची संधी चालून येईल. संधीचे सोने होईल. नवीन गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे.

वृषभ : मित्रांबरोबर ताणलेले वाद निवळतील. घरातील वातावरण चांगले राहील. नोकरीत कामाशी काम ठेवा. वरिष्ठ खूष राहतील. व्यवसायात महत्वाचे निर्णय पुढे ढकला. कामानिमित्ताने भरपूर प्रवास होईल. खेळाडूंचा सन्मान होईल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. महागडी वस्तू खरेदी कराल. पत्नीसाठी वेळ खर्च होईल. अचानक धनलाभाचे योग आहेत. लहान वादांकडे दुर्लक्ष करा. काही ठिकाणी मन चंचल होईल. आत्मपरीक्षण करा. व्यवसायात विचार करून पुढे जा. भागीदारीत आपले मत रेटण्यातून वाद होतील. तरुणांना नव्या नोकरीच्या संधी चालून येतील.

मिथुन : घरातील वातावरण आनंददायी राहील. विवाहेच्छुकांंसाठी चांगला काळ. धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. मनासारखी घटना घडेल. व्यवसायात नव्या संकल्पना सुचतील. ब्रोकर मंडळींना चांगला लाभ मिळेल. नोकरीत मन आणि आचरण शुद्ध ठेवा. व्यवसायात कामाचा ताण वाढेल, त्यामुळे नाराज होऊ नका. नव्या क्षेत्राची ओळख होईल, त्यातून यश मिळेल. तरुणांना यश देणारा काळ. अतिउत्साह दाखवणे त्रासदायक ठरेल. कामातले बदल आनंदाने स्वीकारा. उच्च शिक्षणात अपेक्षित यश मिळेल.

कर्क : डोक्याचा ताप वाढेल असे वागणे टाळा. शब्द हे शस्त्र आहे याचा विसर पडू देऊ नका. व्यवसायात कामाचा गोंधळ आणि आर्थिक नुकसान होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. कलाकार, संगीतकार, खेळाडूंसाठी उत्तम काळ. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. महत्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. भागीदारीत तुटेपर्यत वाद ताणू नका. नोकरीत काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. बँकांची कामे लांबणीवर पडतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. वेळेचे गणित पाळा. तरुणांना तडजोड करावी लागेल. लहान निर्णय देखील विचारपूर्वकच घ्या.

सिंह : अनेक दिवसांपासून अडकलेले काम धाडसी वृत्तीमुळे पुढे जाईल. बँकेची कामे पुढे सरकतील. नोकरीत आठवड्याअखेरीस मनोबल वाढेल. अति आत्मविश्वास दाखवू नका. नव्या मैत्रीमुळे कामे पुढे सरकतील. सरकारी कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी डोकेदुखी वाढवतील. घरात अचानक खर्च वाढतील. नात्यात दुरावा आणणारी कृती टाळा. नोकरीत नेतृत्व करण्याची संधी मिळेल. गोडबोल्या व्यक्तीपासून सावध राहा. व्यवहारात काळजी घ्या. नवीन नोकरीची संधी स्वीकारताना जपून.

कन्या : कौटुंबिक सहलीला जाल. कुटुंबात वातावरण आनंददायी राहील. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. हातात खेळता पैसा राहील. जुने थकीत येणे वसूल होईल. संततीकडून चांगली बातमी कळेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. काही गोष्टी मनात ठेवा. बोलताना सौम्यपणा कामी येईल. राग व्यक्त करू नका. तरुणांचे कर्तृत्व उजळून निघेल. खेळाडूंना यश मिळेल. शिक्षक, प्राध्यापकांसाठी यशदायी काळ. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. काही ठिकाणी ऐकून घ्यावे लागेल. मन:स्वास्थ बिघडू देऊ नका. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. नवे वाहन खरेदी कराल.

तूळ : व्यवसायात बरकत होईल. नव्या ऑर्डर मिळतील. कामाचा ओघ वाढेल. नोकरीत वाद होतील. कुटुंबाबरोबर भरपूर वेळ खर्च होईल. नवीन घर घ्याल. मालमत्तेच्या बाबत सकारात्मक चर्चा घडतील. बँकेची कागदपत्रे तपासून सही करा. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. मौज-मजा कराल. नोकरी-व्यवसायात विवेकबुद्धीचा वापर करा. उधार-उसनवारीचे व्यवहार अंगाशी येऊ शकतात. धार्मिक ठिकाणी मन रमेल. आपण बरोबर आहोत, दाखवण्याचा प्रयत्न त्रासदायक ठरेल. सामाजिक कार्यातून मान उंचावेल. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा जपा.

वृश्चिक : प्रवासाचे गणित बिघडेल. संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्या. व्यवसायात चांगली स्थिती राहील. बँकेची कामे पुढे सरकतील. वादामुळे कामाला विलंब होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. तरुणांचा खर्च वाढेल. आर्थिक नियोजन करा. मित्र-मंडळींना आर्थिक साहाय्य करावे लागेल. त्यातून वाद होतील. कुटुंबातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी अधिकचे प्रयत्न करा. व्यवसायात आपले काम सरळमार्गी पूर्ण करा. आकर्षक प्रलोभनांपासून दूर राहा.

धनु : लहान कारण घरात मोठे वाद निर्माण करेल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. यशासाठी संयम कामी येईल. निर्णयक्षमता वाढीस लागेल. व्यवसायात आमदनी Dााणि खर्च यांचा ताळमेळ ठेवताना कसरत करावी लागेल. तरुणांना यशासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. कोणाला आश्वासने देऊ नका. नोकरी-व्यवसायात वाणी चांगली ठेवा, काम अलगद पुढे सरकेल. बँकांचे व्यवहार करताना घाई नको. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. मोठ्या लाभाच्या मोहात पडू नका. आठवड्याअखेरीस आनंद वाढवणारी बातमी कानावर पडेल. मामा-मावशींची मदत होईल.

मकर : मौन पाळले तर अनेक कामी सहजपणे मार्गी लागतील. धार्मिक यात्रेमुळे मनोबल वाढेल. विवाहइच्छुकांसाठी चांगला काळ. व्यवसायात आर्थिक स्थिती भक्कम राहील. योग्य नियोजन करा. व्यवसायासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील. मन विचलित करणारा एखादा प्रसंग त्रासदायक ठरू शकतो. मार्केटिंग क्षेत्रात यश मिळेल. मालमत्तेच्या बाबतीत प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. त्यामुळे निर्णय चुकतील. उच्चशिक्षणासाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल.

कुंभ : कामाची दगदग होईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. थकीत येणे वसूल होईल. तरुणांना मोठे यश मिळेल. मैत्री आणि व्यवहारात गल्लत करू नका. घरात निर्णय घेताना कार्यतत्परता कामी येईल. मित्रांशी जपून वागा, बोला. कामांत अडथळ्यांचा सामना करावा लागेल. घरात मानापमान होऊ शकते, काळजी घ्या. ज्येष्ठांच्या मताचा आदर करा.नव्या ओळखीतून चांगला लाभ होईल. जुने काम एका झटक्यात पूर्ण होईल. तरुणांची मन:स्थिती बिघडेल. लहान गोष्टीचा फार विचार करत बसू नका. नोकरीत धाडस दाखवणे टाळा. खेळाडूंसाठी यशदायी काळ.

मीन : नोकरीत आनंद वाढवणारी घटना घडेल. व्यवसायात कामाची गती वाढेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. घरात महागडी वस्तू खरेदी होईल. काही ठिकाणी मते व्यक्त करणे टाळा. तरुणांच्या मनात गोंधळ उडेल. व्यवसायात वेळेचे नियोजन आणि संयमाचा अवलंब करा. मित्रांची टिंगल करू नका. अचानक धार्मिक ठिकाणाला भेट द्याल. नव्या क्षेत्राचा परिचय होईल, त्यातून आर्थिक उन्नती होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास अधिक बळकट होईल. मोठे निर्णय घेणे टाळा. ज्येष्ठांच्या सल्ल्याचा आदर करा.

Previous Post

पितृपक्ष आणि सत्तापक्ष!

Next Post

गंध केशराचा… चिंतामुक्ती देण्याचा!गंध केशराचा… चिंतामुक्ती देण्याचा!

Next Post
गंध केशराचा… चिंतामुक्ती देण्याचा!गंध केशराचा… चिंतामुक्ती देण्याचा!

गंध केशराचा... चिंतामुक्ती देण्याचा!गंध केशराचा... चिंतामुक्ती देण्याचा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.