• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

Marmik Team by Marmik Team
September 28, 2026
in भाष्य
0
नाय नो नेव्हर

काय मग संतोषराव, ‘त्या’ दिवशी तुम्ही दिवा लावलात की नाही आपल्या त्या ह्यांना आशीर्वाद देण्यासाठी?- संदीप माळकर, जुन्नर
काय संदीपराव, कोणाला आशीर्वाद द्यायचं म्हणताय? देवाला? दिवा लावायच निमित्त करून आग लावायची आहे का? आणि तुम्ही लावलात का दिवा ते सांगा… की तुम्ही सुद्धा एकाच माळेतले माळकर?

आईला वार्‍यावर सोडून मावशीला डोक्यावर घेणार्‍याला काय म्हणतात?- रत्नाकर शेंडगे, हातकणंगले
आई खड्ड्यात गेली तरी खड्ड्याला भोक म्हणू नका. उगाच आईवरच्या अन्यायामुळे एखादी मावशीच दुखावली तर… हातकणंगलेचे असलात तरी कुठल्याही खड्ड्यात पाय घालू नका… काही कळलं का? नसेल कळलं तर जाऊदे ‘खड्ड्यात’!

आपण सण-उत्सवाचा आनंद साजरा करत आहोत, हे घरावर लाऊडस्पीकर लावून इतरांना का ऐकवायचं असतं माणसांना? आता गावचे गणपतीही बिघडवून टाकलेत या भोंग्यांनी. – प्रेरणा मोरे, विन्हेरे
आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी या पद्धतीने तुम्ही बोंब मारताय… भोंगा ही तांत्रिक वस्तू आहे. मानवाने तिचा शोध लावून, ती विकसित करून, तिचा भोग घेण्यास सुरुवात केली, परंतु काही मानवांना त्याची शिक्षा ‘भोगावी’ लागत आहे… आमची ही भाषा म्हणजे बापट इफेक्ट वाटत असेल तर तुमच्या-आमच्या भाषेत सांगतो… अक्कल नाही चोंग्यांना, दोष मात्र भोंग्यांना…

आपल्या कल्पनांच्या विरोधात बोलणार्‍या एखाद्याला त्याचे मुद्दे खोडून काढणारं मुद्देसूद उत्तर देण्याच्या ऐवजी त्याच्या थोबाडीत मारल्याने आपला मुद्दा बरोबर कसा सिद्ध होतो?- शंकर गेजगे, धाराशिव
थोबाडीत मारणार्‍याचा मुद्दा सिद्ध नाही झाला तरी तो प्रसिद्ध होतो, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. आणि मारायला सांगणारा प्रसिद्ध होत नाही. तो कोण आहे हे जगाला कळलं तरी ते सिद्ध करता येत नाही… पण आपला चुकीचा मुद्दाच बरोबर आहे, म्हणून त्याला बोंब मारता येते… आणि त्याविरुद्ध बोलणार्‍याला परत थोबाडीत मारता येते… हे पण सिद्ध झालं आहे.. थोडक्यात काय, तर सिद्ध आणि प्रसिद्ध यांचा हा खेळ आहे… तुम्हाला ही सिद्धी प्राप्त झाली असेल तरच या खेळात पडा… नाहीतर फुकट महागात पडायचं!

मी मैत्रिणीला बागेतल्या अगदी कोपर्‍यातल्या शांत, निवांत, लोकांच्या नजरेबाहेरच्या बाकड्यावर घेऊन गेलो तर ती म्हणाली, किती कामचुकार आहेत आपले पालिकावाले. कित्येक वर्षांत साधा रंगसुद्धा मारलेला नाही त्यांनी या बाकड्याला… आता मी तिला प्रपोझ करू की नको? – सागर पाळंदे, पिंगरुट
काहीही करा, पण तिला घेऊन लोहगडावर फिरायला जाऊ नका… आणि त्यातूनही लग्न केलंत तर निळा ड्रम घरी आणू नका… हा विनोद नाही. आणि जरी हा विनोद वाटला, तरी विषाची परीक्षा घेऊ नका… त्यापेक्षा पालिकेकडून कॉन्ट्रॅक्ट घ्या आणि तो बाकडा रंगवा… फक्त काळा रंग वापरू नका… चुकून तोंडाला लागला तर लोक वाटेल ते बोलतील.

तुमच्या माहितीत कोणी असा गुप्तहेर आहे का, जो आपल्या गुप्त कामगिरीच्या कहाण्या गावभर रंगवून रंगवून सांगत फिरतो? ज्याला हेही गुप्त ठेवता येत नाही, तो गुप्तहेर कसा? – विवेक जोपळे, सिन्नर
एक काम करा, अशा गुप्तहेराच्या जागी स्वतःला ठेवा आणि विचार करा… तुम्हाला शत्रूसुद्धा हिंग लावूनही विचारात नसेल आणि तुमच्या लोकांकडून तुम्ही स्वतःला जेम्स बॉण्ड म्हणवून घेत असाल आणि इतर लोक मात्र तुम्हाला गावठी जेम्स बॉण्ड म्हणत असतील तर तुम्ही काय कराल? आणि स्वतःबद्दल सांगण्यासारखं दुसरं काहीच नसेल तर मग तुम्ही म्हणताय त्या गुप्तहेराने काय करायचं? (प्लीज विषय वाढवू नका… नाहीतर अशा हेरावर अख्खा पिक्चर बघावा लागायचा… ‘बिलंदर’ या नावाचा!)

यूपीआयच्या व्यवहारांवर शुल्क लावलं जाणं, हा कसा मोदीजींचा मास्टरस्ट्रोक आहे, असा प्रश्न मला परीक्षेत आला, तर मी त्यावर कसं उत्तर देऊ, प्लीज, मार्गदर्शन करा. – अनिता भोळे, गोवंडी
मास्टरस्ट्रोक डायरेक्ट जाहीर केला जातो. तो मास्टरस्ट्रोक आहे का? असा प्रश्न विचारलाच जात नाही. उलट त्यावर प्रश्न विचारणार्‍यांवरच प्रश्न निर्माण केले जातात. मग हा असा अडचणीचा प्रश्न कोणतेही पेपरफोडे कुठल्याही परीक्षेत विचारू शकतील का? हा प्रश्न स्वतःला विचारा… आणि चमत्कार बघा… तुम्हाला पडलेला प्रश्न, परत पडणार नाही आणि उत्तर देण्याची वेळच येणार नाही.

Previous Post

पर्यावरणाचा श्वास कोंडणारी बॅनरबाजी!

Next Post

पितृपक्ष आणि सत्तापक्ष!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.