• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

उंडेर्‍याची खीर

शुभांगी जोशी (चवदार साठवण)

Marmik Team by Marmik Team
September 19, 2026
in चवदार साठवण
0
उंडेर्‍याची खीर
गणपती बाप्पा मोरया! 
गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्याच्या स्वागतासाठी तुमचे मोदक करून झाले असतीलच. मोदकासाठी केलेले सारण जास्त झाले तर त्याच्या आपण गौरीच्या आगमनासाठी करंज्या करतो. उकड जास्त झाली तर काय करायचे हो? किंबहुना माझं तर म्हणणं असं आहे की थोडीशी उकड जास्त करतच चला, म्हणजे उंडेर्‍यांची खीर करता येईल. ही पाककृती माझ्या आजीची आहे. कोकणात पूर्वी भाज्या आणि मिठायांची दुकानं ही काही नव्हतीच आणि दीड दिवसाच्या गणपतीत घरातली सगळी कामं करणारी एकमेव बाई काय काय म्हणून करेल? मग आहे तेवढ्याच सामग्रीत बाई आपला वेळ वाचवेल आणि खिशाला परवडेल असे पदार्थ करत असे. आज मी तुम्हाला जी खीर दाखवणार आहे ती उरलेल्या उकडीतून केलेली खीर आहे. तिचे नाव आहे उंडेर्‍याची खीर.
दीड दिवसाच्या गणपतीत पहिल्या दिवशी मोदक होतात, दुसर्‍या दिवशी गणपती विसर्जन. सकाळी विसर्जनाची तयारी. पत्री काढणे, पूजेची तयारी, चांदीच्या वस्तू धुवून पुसून जागेवर ठेवणे, परत बाप्पाला जातानाची शिदोरी देणे ह्या सर्व कामात ही खीर पटकन करता येण्यासारखी आहे. वेळ वाचवते आणि कष्ट सुद्धा. चला तर आता आपण ही खीर कशी करतात, ते पाहू या…
साहित्य : 
१. दोन मोदकांना पुरेल एवढी उकड घेऊन त्याचे वाटाण्याएवढे गोळे करा.
२.काजू,बदाम, पिस्ता, केशर आवडीप्रमाणे.
३. दीडशे ग्रॅम साखर
कृती : 
१. उकडीचे गोल गोळे गरगरीत व गुळगुळीत असावेत.
२. पॅनमध्ये अर्धा लिटर दूध आटवून पाव लिटर करा.
३.त्यात साखर घालून ती एकजीव करा.
४.केशराच्या काड्या थोड्याशा परतून दुधात एकजीव करून घ्या.
५.दुधाला उकळी आली की आपण तयार केलेले उकडीचे गोळे त्यात सोडा.
६.परत दुधाला छान उकळी येऊ दे, जेणेकरून उकडीचे गोळे व दूध एकजीव होतील.
७.दूध आटवायचे नसल्यास अर्धा लिटर दुधाला एक चमचा रवा लावून दूध घट्ट करता येईल.साखर न घालता दुधात मिल्कमेड देखील घालता येईल.
८. उकळत्या दुधात उकडीचे गोळे फुगून वर येतील.
९. आता या दुधात तयार केलेले केशर आणि बदाम, काजू, पिस्ता तुमच्या आवडीप्रमाणे घाला.
Khamang.blog
khamangbyShubhangi
YouTube Channel
Previous Post

राशीभविष्य (१९ ते २५ सप्टेंबर २०२६)

Next Post

फलाटावरची अन्नपूर्णा एक्सप्रेस!

Next Post
फलाटावरची अन्नपूर्णा एक्सप्रेस!

फलाटावरची अन्नपूर्णा एक्सप्रेस!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.