• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (१२ ते १८ सप्टेंबर २०२६)

भास्कर आचार्य

Marmik Team by Marmik Team
September 12, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : हर्षल – वृषभ राशीमध्ये, मंगळ -मिथुन राशीत, गुरु-कर्क राशीत, शुक्र- तूळ राशीत, प्लूटो-मकर राशीत, राहु -कुंभ राशीत, शनि -नेपच्युन-मीन राशीत, रवि-केतु-सिंह राशीत, बुध -कन्या राशीत. दिनविशेष : १४, सप्टेंबर रोजी हरितालिका आणि श्री गणेश चतुर्थी, १५, सप्टेंबर रोजी ऋषिपंचमी, १७, सप्टेंबर रोजी जेष्ठा गौरी आवाहन, १८, सप्टेंबर रोजी जेष्ठा गौरी पूजन.

 

मेष : आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळेल, त्याबरोबर मोठी आव्हाने समोर ठाकतीrल. त्यातून संयमाने मार्ग काढावा लागेल. नोकरात धीराने वागा.तरुणांनी कष्ट केले तर त्यांना यश मिळेल. दुसर्‍यांना सल्ला,मार्गदर्शन करण्याच्या भानगडीत पडू नका. मुलांकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी जबाबदार्‍या वाढतील. घरातील जेष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक फटका संभवतो. अध्यात्मिक व्यक्तीच्या भेटींमुळे सकारात्मकता वाढेल. आठवड्याच्या मध्यास कुटुंबासाठी अधिकचा वेळ खर्च करावा लागेल. महिलांसाठी हा आठवडा ख़ुशी कभी गमचा असा असेल. कलावंत मंडळींचा सन्मान होईल.

वृषभ : रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कामे बिघडतील.बोलण्यावर संयम ठेवा. वाहन हळू चालवा. नोकरीच्या ठिकाणी सबुरीने घ्या. व्यवसायात अचानक काही बदल होतील. नव्या आव्हानाचा सामना करताना कल्पनाशक्तीचा वापर करा. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. बँकेची रखडलेली कामे मार्गी लागतील. सरकारी कामे पूर्ण होतील. तरुण मंडळींचा भाग्योदय होईल. बहीण-भावाकडून चांगले सहकार्य मिळेल. महिलांनी आरोग्य सांभाळावे. खर्चावर नियंत्रण ठेवा.घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करा. ज्येष्ठांना सांभाळा. खेळाडूंना यश मिळेल. शिक्षक, संशोधक, मंडळींच्या कामाचा गौरव होईल.

मिथुन : मनासारखे काम झाले नाही म्हणून टोकाची भूमिका घेणे टाळा. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. घरातील वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. स्वत:च्या कामाचे आत्मपरीक्षण करणे फायदेशीर ठरेल. गृहपयोगी साहित्याची खरेदी कराल. आरोग्य सांभाळा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. सरकारी कामात शॉर्टकट घेऊ नका.तरुणांनी अतिघाईने कामे करणे टाळावे. विदेशात जाण्याची संधी मिळेल. व्यवसायाच्या नवीन कल्पना सुचतील. महिलांना अपेक्षित यश मिळेल.नोकरीची चांगली संधी मिळेल.मौज मजेकडे कल राहील, त्यामुळे आर्थिक गणित बिघडेल.

कर्क :मानापमानाचे प्रसंग घडतील,त्याकडे दुर्लक्ष करा. तरुणांसाठी हा आठवडा कष्टप्रद. सामाजिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल. नोकरी-व्यवसायातील गोष्टी जगजाहीर करू नका. नातेवाईकांना मदत करावी लागेल,त्यामुळे आर्थिक ताण येईल. व्यावसायिक मंडळींना यश मिळेल. विवाहोच्छुक मंडळींना चांगला काळ. प्रेमप्रकरणातील वाद घरापर्यंत येतील. मित्र-नातेवाईकांबरोबर वाद संभवतात. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव. नव्या गुंतवणुकीसाठी आगामी काळ उत्तम राहील.

सिंह : नोकरी, व्यवसायात नवीन जबाबदार्‍या येतील. शिक्षक, संशोधकांसाठी उत्तम काळ. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नातेवाईक,शेजारी मदत करतील. पैशांच्या अपव्यय टाळा. सहलीचे योग संभवतात. व्यावसायिक मंडळींना स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. संयम बाळगल्यासं चांगले लाभ संभवतात. तरुणांनी संयम बाळगावा.वाहने हळू चालवा. संततीकडून सुवार्ता कानावर पडेल. नव्या ओळखीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका.

कन्या : गोड बोलून कामे साध्य करून घ्या. नोकरीच्या ठिकाणी कठीण कामे चर्चेतून सोडवा. नवीन नोकरीच्या संधी. व्यावसायिकांचा कामाचा व्याप वाढेल.लहान चुकांकडे दुर्लक्ष करू नका. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. कलाकारांचा गौरव होईल. कलाक्षेत्रातील मंडळींना यश मिळेल. प्रवासावेळी पाकीट सांभाळा. अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक संभवते. आठवड्याच्या शेवटी नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. तरुण मंडळींना त्यांच्या कामात यश मिळेल. बँकेच्या कामात विलंब संभवतो.खेळाडूंना अपेक्षित यश मिळेल. ब्रोकर, मेडिकल क्षेत्रात काम करणार्‍या मंडळींना चांगला काळ. कुटुंबासाठी वेळ द्याल. आर्थिक बाजू उत्तम असल्यानं घरातील वातावरण आनंददायी राहील.

तूळ : खर्चावर नियंत्रण ठेवा.नोकरीच्या ठिकाणाच्या समस्या कल्पकतेने हाताळा. व्यवसायात बुद्धिचातुर्याच्या जोरावर यश मिळेल. नवीन गुंतवणूक काळजीपूर्वक करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास अवघड काम सोपे होईल. प्रेमप्रकरणातून त्रास संभवतो. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. बँकेच्या कागदपत्रांवर सही करताना काळजी घ्या. नवीन ओळखींतून लाभ संभवतो. संततीकडे लक्ष द्या. शिक्षक,संशोधकांना मान मिळेल. धार्मिक कार्य कराल.मनासारखी नोकरी मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला घ्या.

वृश्चिक : यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल.कोर्टाची कामे मार्गी लागतील. नवे बदल स्वीकारणे हिताचे ठरेल.नोकरीच्या ठिकाणी ताण निर्माण होईल. नवीन वाहनाचा योग. मनातल्या गोष्टी उघड करू नका. कुणाला ही सल्ले देऊ नका. गृहकलह संभवतो. व्यवसायात अनोळखी व्यक्तीचा सल्ला ऐकू नका. तरुणांसाठी खर्चिक कालावधी. कौटुंबिक आनंद देणारे प्रसंग घडतील.कलाकार मंडळींचा गौरव होईल. मुलांचे अडलेले प्रश्न मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल. कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी. करमण्ाुकीवर पैसे खर्च होतील. खेळाडूंसाठी खडतर काळ.

धनु : सजग रहा. व्यवसायात आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर मोठे यश संपादन कराल. नोकरीच्या ठिकाणी काम करताना काही गोष्टी मनातच ठेवा.अहंकार बाजूला ठेवून संयमीवृत्ती बाळल्यास फायदा होईल. मुलांकडे लक्ष द्या. घरात किरकोळ वाद होतील. भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. आर्थिक नियोजन करताना काळजी घ्या. उधार-उसनवारी टाळा. गोड बोलण्याला फसून निर्णय घेऊ नका. नातेवाईकाना आर्थिक मदत कराल. मित्र-मंडळींबरोबर चेष्टा मस्करी टाळा, अन्यथा गैरसमज निर्माण होतील. देवदर्शनाचा योग.सरकारी कामात विलंब संभवतो. महिलांना कामात यश मिळेल. तरुणांना परदेश योग.

मकर : नोकरीच्या ठिकाणी काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागणार आहेत. व्यवसायाची काही गणिते बिघडतील. कुणालाही आर्थिक मदत करणे टाळा. तरुण मंडळींना आणि महिलांना यश मिळेल. विवाहोच्छुक मंडळींसाठी चांगला काळ. घरातील काही प्रसंगांमुळे मनस्थिती द्विधा होईल. कलाकारांचा गौरव होईल. आरोग्यविषयक तक्रारी संभवतात. मित्रांसोबत वादाचे प्रसंग. व्यावसायिक मंडळींना नव्या संधी मिळतील. शेअर, लॉटरीतून धनलाभ.रियल इस्टेट व्यवसायातील मंडळींना उत्तम काळ. कलाकार, संगीतकार, खेळाडू यांच्यासाठी चांगला काळ आहे. संततीकडून मनस्ताप वाढवणारी घटना घडेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. मालमत्तेचे निर्णय पुढे ढकला.कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकला.

कुंभ : जुने आजार डोकेदुखी वाढवतील.तरुणांना विदेशात शिक्षणाच्या संधी. व्यवसायात धाडसी निर्णय घ्यावे लागतील. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. ब्रोकर,मार्वेâटिंग क्षेत्रातील मंडळींसाठी चांगला काळ. जुनी कामे मार्गी लागतील. सार्वजनिक ठिकाणी बोलताना काळजी घ्या. सामाजिक कार्य करणार्‍यांचा गौरव होईल. वाहन सावकाश चालवा. व्यावसायिक मंडळींना यश मिळेल.
ज्येष्ठांसोबत समजुतीने वागा. समाजिक कार्यात हुरुप वाढेल. मित्रमंडळी मदत करतील. खेळाडूंना यश मिळेल. बँकेची कामे पुढे सरकतील.

मीन : हाती घेतलेले काम योग्यप्रकारे मार्गी लावा. व्यवसायात काळजीपूर्वक निर्णय घ्या. नोकरीच्या ठिकाणी बदली संभवते. पगारवाढ आणि प्रमोशनचे योग. जिद्द आणि आत्मविश्वासामुळे तरुणांना यश मिळेल. कराराची कागदपत्रे वाचूनच सही करा,अन्यथा कायदेशीर कटकटी मागे लागतील.मामा-मावशींकडून मदत मिळेल. सकारत्मक ऊर्जा वाढीस लागेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. नवीन वाहन खरेदी कराल.युवकांची कामे मार्गी लागतील. मित्र-मंडळींबरोबर मतभेद होतील, त्यामुळे काळजी घ्या.संसर्गजन्य आजरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. महिलांना यश मिळवून देणारा काळ.

Previous Post

डिसेंबरमध्ये इराणी भूमीवर अमेरिका उतरणार?

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय नो नेव्हर

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.