ग्रहस्थिती : मंगळ, हर्षल वृषभेत, प्लूटो मकरेत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत, रवि बुध मिथुनेत, गुरु कर्केत, शुक्र केतु सिंहेत. दिनविशेष : ९ ऑगस्ट कामिका एकादशी, १० ऑगस्ट सोमप्रदोष, ११ ऑगस्ट रोजी सोमप्रदोष, अमावस्या आरंभ उत्तररात्री १ वा. ५३ मि., १२ ऑगस्ट दीपपूजा, अमावस्या समाप्ती रात्री ११ वा. ६ मि., १४ ऑगस्ट पतेती, जरा-जिवंतिका पूजन.

मेष : कामे रेंगाळतील. व्यवसायात महत्वाचे निर्णय घेणे टाळा. आर्थिक बाजूचे नियोजन करा. घरात आणि मित्रांबरोबर भरपूर वेळ खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांचा शब्द पाळा. कामानिमित्ताने प्रवास कराल. तरुणांनी संयम ठेवून काम करावे. यशामुळे हुरळून जाऊ नये. रागामुळे नुकसान होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील. भागीदारीत काळजी घ्या. मालमत्तेचे व्यवहार पुढे सरकतील. आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. विमा सल्लागार, मार्केटिंग क्षेत्रात काम यश मिळवून देणारा काळ. लेखक, प्रकाशकांना आनंद देणारी बातमी मिळेल. नव्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. प्रलंबित आर्थिक कामे मार्गी लागतील. मुलांना शिक्षणात यश मिळेल. महिलांना यश मिळेल. घरात ज्येष्ठांची काळजी घ्या.

वृषभ : कामाचा कंटाळा येईल. घरात वेळ खर्च होईल. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी कामे मार्गी लागतील. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. व्यवसायात यश मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. शेअर, सट्टा, लॉटरीमधून लाभ होईल. सार्वजनिक ठिकाणी जपून बोला. तरुणांना नव्या कामाच्या संधी मिळतील. घरात एखादे शुभकार्य होईल. उत्साह, आनंद, सकारात्मकता वाढीस लागेल. नव्या नोकरीच्या शोधात असणार्यांना मनासारखी संधी मिळेल. व्यावसायिकांना नवे काम यशदायी राहील.

मिथुन : आर्थिक बाजू उत्तम राहील. व्यवसायातल्या अडचणी दूर होतील. घरात वागणे-बोलणे सांभाळा. अनोळखी व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. नोकरीत धावपळ होईल. जुने आजार डोके वर काढतील. आठवड्याअखेर व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. मुलांचे आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. मोठा निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला कामी येईल. मित्रांबरोबर मौजमजेत वेळ जाईल. मनातल्या गोष्टी प्रत्यक्षात येतील. त्यासाठी थोडा संयम बाळगा.

कर्क : महत्वाचे निर्णय पुढे ढकला. मित्रांशी मतभेद होतील. ब्रोकर मंडळींना लाभ होईल. घरातले वातावरण शांत ठेवा. ज्येष्ठांशी जमवून घ्या. नोकरीत मनासारखी स्थिती राहणार नाही. कर्जप्रकरणे मार्गी लागतील. तरुणांना मोठ्या कामाच्या संधी येतील. आपल्या बोलण्यातून गैरसमज होऊ देऊ नका. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. व्यवसायात आमदनी आणि खर्च याचा मेळ बसेल. नवीन व्यवसाय सुरू करताना घाई टाळा. कोणालाही आर्थिक मदत करताना विचार करा. कामात शॉर्टकट घेऊ नका. अकारण अडचणीत याल.

सिंह : आरोग्याकडे लक्ष द्या. सामाजिक कार्यात गौरव होईल. नोकरीनिमित्त प्रवास कराल. व्यवसायात अपेक्षाभंग होईल. खिसापाकीट सांभाळा. नवे परिचय लाभदायक ठरतील. शिक्षक, संशोधकांना, तरुणांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. घरातील कामाकडे दुर्लक्ष नको. धार्मिक कार्यातून आत्मचिंतन होईल. ब्रोकर, दलाल, मार्केटिंग व्यावसायिकांना वाढीव कष्ट करावे लागतील. सरकारी कामे पुढे नेताना सहकार्य मिळेल. नोकरीची संधी चालून येतील. मनातल्या गोष्टी ओठावर आणू नका.

कन्या : कामानिमित्ताने दूरचे प्रवास कराल. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. गुरुचे बळ चांगले राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सरकारी व कोर्टाची कामे पुढे सरकतील. प्रेमप्रकरणात वाद होतील. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. मुलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. वाहनदुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. नोकरीत तुमच्या शब्दाला किंमत राहील. कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नव्या संकल्पनेमधून लाभ मिळेल. नवी गुंतवणूक करताना काळजी घ्या. योगसाधनेचा फायदा मिळेल.

तूळ : घरात आनंद वाढेल. आर्थिक प्राप्तीचा वेग वाढेल. नातेवाईकांशी वाद घडतील. बँकेची कामे मार्गी लागतील. नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. घरासाठी नवी खरेदी होईल. पत्नीच्या मदतीने काम मार्गी लागेल. नोकरीत नवी जबाबदारी मिळेल. व्यवसायात मनासारखे यश मिळेल. महिलांना कामाची, कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. तरुणांना अधिक कष्ट करावे लागतील. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या. जुने आजार डोके वर काढतील. हृदयरोग, मधुमेहाच्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. संततीच्या बाबतीत काळजी घ्या. पती-पत्नीमध्ये विनाकारण वाद होतील. आर्थिक बाजू चांगली ठेवा. खेळाडूंना मोठे यश मिळेल. विज्ञान संशोधक मंडळींना चांगला काळ.

वृश्चिक : नोकरीत चांगल्या घटना घडतील. गुरुची चांगली कृपा राहील, कामे झटपट मार्गी लागतील. देवदर्शनासाठी प्रवास कराल. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. विमाविषयक व वित्तीय सल्ला देणार्यांसाठी चांगला काळ. आरोग्याच्या लहान तक्रारींकडे दुर्लक्ष नको. व्यवसायात कर्तृत्व सिद्ध कराल. पत्रकार, लेखकांसाठी चांगला काळ. एखादा सन्मान मिळेल. जनसंपर्क क्षेत्रात चांगल्या कामाच्या संधी येतील. सार्वजनिक ठिकाणी कायदेशीर त्रास होईल, असे वागणे टाळा. मौजमजेपासून दूर राहा.

धनु : नोकरीत वरिष्ठ कामावर खूष होतील. मोठे बक्षीस मिळेल. घरातील वातावरण आनंद वाढवणारे राहील. व्यवसायात मोठी झेप घेण्याची संधी चालून येईल. बँकेच्या व्यवहारात गोंधळ होतील. घरामध्ये वादाचे प्रसंग टाळा. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मुलांकडून शिक्षणात चांगली प्रगती होईल. तरुणांचे उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. समाधान मिळेल. कामाचा हुरूप वाढेल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठेचा सन्मान मिळेल. घरात जुन्या विषयांवर चर्चा करू नका. कलाकारांना नव्या संधी मिळतील.

मकर : थकलेले येणे वसूल होईल. नोकरी-व्यवसायानिमित्त दूरचे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीत यश मिळेल. घरात मतभेद घडतील. भागीदारीत वाद घडतील. नोकरीत कामाचा कंटाळा येईल. मित्रांसोबत मौज-मजा कराल. नव्या कामात यश मिळेल. नवीन गुंतवणूक करताना फसगत होऊ शकते. ब्रोकरांनी आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी. वायफळ खर्च टाळा. चुका महागात पडतील. तरुणांच्या मनासारखी कामे होणार नाहीत, त्यामुळे मरगळ जाणवेल. व्यवसायात नव्या संधी खुणावतील. काळजीपूर्वक पुढे जा. पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने भ्रमंती होईल. संशोधकांना यशदायी काळ.

कुंभ : अडकलेली कामे पुढे सरकतील. तरुणांची बेचैनी वाढेल. नोकरीत गोंधळ उडेल. घरात वेळ खर्च होईल. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खेळाडूंना यश मिळेल. मित्रांबरोबरचे मतभेद मिटतील. नोकरीनिमित्त अधिकचा प्रवास कराल. नवीन ओळखी तापदायक ठरतील. मामा-मावशींचे सहकार्य मिळेल. उतावळेपणा करू नका. कोणाला सल्ला देऊ नका.सामाजिक क्षेत्रात कामाची संधी मिळेल. तरुणांना कर्तृत्वाच्या जोरावर उत्तम यश मिळेल. महिलांना यशासाठी वाढीव कष्ट पडतील. भावाकडून चांगले सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

मीन : उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ राहील. नोकरीत कामाचे वेळापत्रक बिघडेल. अचानक घरासाठी खर्च कराल. आर्थिक गणित विस्कळीत होईल. तरुणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मुलांच्या शिक्षणाचा आलेख उंचावेल. जुनी गुंतवणूक मोठा लाभ मिळवून देईल. नोकरदारांना अधिकचा वेळ प्रवासात खर्च होईल. पत्नीच्या प्रयत्नामुळे अनेक दिवसांपासून अडकलेले काम मार्गी लागेल. श्रावणात कुटुंबाबरोबर धार्मिक ठिकाणांना भेट द्याल.

