ग्रहस्थिती : मंगळ-हर्षल वृषभ राशीत, प्लूटो मकर राशीत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीन राशीत, रवि बुध मिथुनेत, गुरु कर्क राशीत, शुक्र केतु सिंह राशीत. दिनविशेष : १९ जुलै कुमारषष्ठी, २१ जुलै दुर्गाष्टमी.

मेष : अचानक नव्या बदलांना सामोरे जावे लागेल. नोकरी-व्यवसायात उत्तम संवाद ठेवा. नव्या योजना राबवताना अंदाज घेऊन पुढे जा. आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून आनंद वाढवणारी बातमी मिळेल. तरुणांना नवी दिशा मिळेल. आर्थिक व्यवहारात खबरदारी घ्या. देवधर्मासाठी भ्रमंती होईल. घरात आनंद वाढवणारी बातमी कळेल. नोकरीत वाढीव कष्ट घ्यावे लागतील. नव्या वास्तूच्या नियोजनाला गती मिळेल. सप्ताहाअखेरीस कौटुंबिक वाद होतील. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा त्रास होऊ शकतो. महिलांना यश मिळेल. सामाजिक कार्यातून उत्साह वाढीस लागेल.

वृषभ : प्रलोभनाला बळी पडू नका. नोकरीत जमवून घ्या. वरिष्ठ कामावर खूष होतील. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना कराल. घरात वाद टाळा. तरुणांना यशासाठी झटावे लागेल. आमदनी आणि खर्च यांचा मेळ साधा. प्रसंगावधानात राखा. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. विवाहेच्छुकांच्या लग्नाचे योग जुळून येतील. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल. अडकलेली सरकारी कामे झटपट मार्गी लागतील. पावसाळी सहलीत काळजी घ्या. आठवड्याअखेर जुने मित्र भेटतील. मौजमजेवर खर्च होईल. व्यवसायात जुने येणे वसूल होईल.

मिथुन : आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नव्या मालमत्तेचे काम मार्गी लागेल. सामाजिक क्षेत्रात नवी संधी चालून येईल. तरुणांचे उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांना आरोग्याचे प्रश्न त्रासदायक ठरतील. वडीलधार्यांचे आरोग्य सांभाळा. लेखक, कलाकारांचा गौरव होईल. ब्रोकरांना चांगले लाभ होतील. नोकरीत आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. व्यवसायात अचानक प्रवास करावा लागेल. घरासाठी मोठा खर्च होईल. निर्णय घेताना घाई नको. उद्योग क्षेत्रात आडमुठे धोरण नको. कुटुंबियांचा सल्ला ऐका.

कर्क : व्यवसायात बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळेल. नोकरीत कर्तृत्व सिद्ध करू शकाल. तरुणांना भरपूर कष्ट करावे लागतील. मुलांना शिक्षणात यश मिळेल. भावाचे सहकार्य मिळेल. शेजार्यांना मदत करावी लागेल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. महिलांना घाईत घेतलेले निर्णय अडचणीचे ठरतील. कोणालाही आर्थिक मदत करताना काळजी घ्या. नातेवाईकांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. देवदर्शनाला जाल. सकारात्मकता वाढेल. व्यवसायात कोणावर अतिविश्वास ठेवणे घातक ठरेल. अडकलेली कामे पुढे सरकतील.

सिंह : अनोळखी व्यक्तीमुळे विश्वासघात होईल. बहीण-भावाशी वैचारिक मतभेद होतील. लॉटरी, सट्ट्यापासून दोन हात दूरच राहा. काही ठिकाणी स्पष्टपणा कामी येईल. व्यवसायात काम आणि वेळाचा ताळमेळ सांभाळा. नोकरीत धावपळ होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. तरुणांना स्पर्धेचा सामना करावा लागेल. सरकारी कामे पूर्ण होतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. खेळाडूंना यश मिळेल. आठवड्याअखेर व्यवसायात घेतलेले धाडसी निर्णय चांगली कमाई करून देतील. कोणाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका.

कन्या : कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. कोणाला मार्गदर्शन करताना विचार करा. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. गायक, कलाकारांना नव्या संधी मिळतील. मुले डोकेदुखी वाढवतील. महिलांकडून कामाचा गोंधळ होईल. सरकारी कामात शॉर्टकट नको. नोकरीत वातावरण चांगले राहिल्याने दोन कामे अधिकची होतील. काही ठिकाणी अंतर ठेवणे फायदेशीर ठरेल. घरात आणि कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. मित्र, नातेवाईकांशी गाठीभेटी होतील. प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वासू नका.

तूळ : मित्रांच्या मदतीला धावून जाल. उत्तम संवाद ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात काही ठिकाणी तडजोड करा. लहान वादांकडे दुर्लक्ष करा. भावंडांविरोधी भूमिका घेणे त्रासदायक ठरेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. जुने आजार त्रासदायक ठरतील. अहंकार दूर ठेवा. संयमाने कामे पुढे सरकतील. तरुणांना यश देणारा काळ. खेळाडू, कलाकार, संगीतकारांना यश मिळेल. आठवड्याच्या मध्यास घरात आनंद वाढेल. महिलांना यश मिळेल. उच्च शिक्षणाचे प्रश्न लांबणीवर पडतील. नवीन वास्तूच्या खरेदीचा विषय पुढे सरकेल. व्यवसायात नवी कल्पना सुचेल. आर्थिक बाजू भक्कम होईल.

वृश्चिक : व्यवसायात गणित चुकेल. नोकरीत कसोटीच्या क्षणांचा सामना करावा लागेल. संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर काम पुढे सरकेल. तरुणांना कामात चांगले अनुभव येतील. महिला उद्योजकांना यश मिळेल. नव्या संकल्पना यश देतील. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. उगाच सल्ले देत बसू नका. घरात तुमच्या मतांचा आदर होणार नाही. त्याकडे दुर्लक्ष करा. आर्थिक नियोजन करणे कामी येईल. काही ठिकाणी अतिविश्वास ठेवणे अंगाशी येईल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल.

धनु : नोकरी-व्यवसायात कुणाचा अनादर करू नका. पोटातल्या गोष्टी ओठावर आणू नका. व्यवसायात निर्णयावर ठाम राहा. मालमत्तेचे व्यवहार करण्याबाबतची चर्चा पुढे ढकला. बँक व्यवहारांत काळजी घ्या. तरुणांच्या मनासारखी घटना न घडल्याने नाराजी निर्माण होईल. भागीदारीत काम पुढे नेताना अधिकचे लक्ष द्या. डोकेदुखी, पोटदुखी, मानदुखी अशा व्याधी डोके वर काढतील. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. कलाकार, संगीतकारांना यशदायी काळ. मित्रांची चेष्टा महागात पडू शकते.

मकर : वाद टाळा. नोकरीत अर्धा वेळ फिरतीवर जाईल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. चिंतन करा. घरात आनंद वाढेल. खेळाडूंना स्पर्धेत मोठे यश मिळेल. कलाकारांचा सन्मान होईल. व्यवसायात मनासारखी कामे होतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. अनोळखी व्यक्तीशी बोलताना काळजी घ्या. नव्या योजनांना आकार मिळेल. कुणाचे मन दुखावेल असे वर्तन टाळा. विवाहेच्छुंसाठी चांगला काळ. नव्या ओळखींचा फायदा होईल. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील. धावपळही वाढेल.

कुंभ : भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. मुलांना शिक्षणात यश मिळेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. ज्येष्ठांकडे लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीत सामोपचाराने घ्या. कौटुंबिक सहलीचे बेत आखाल. नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. वरिष्ठ खूश होतील. आत्मविश्वास वाढेल. तरुणांनी मनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे. मनाविरुद्ध घटना घडू शकतात. घरातील वाद बाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्या. बँक व्यवहारांत काळजी घ्या. नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण करणारे भाष्य टाळा.

मीन : जनसंपर्क क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. नोकरीत योग्य ध्येय ठेवून काम केल्यास मोठे यश मिळेल. कामानिमित्ताने विदेशात जावे लागेल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या. ब्रोकरांनी आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे महागात पडेल. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च होईल. कोर्टकचेरीची कामे पुढे जाण्यास विलंब होईल. सरकारी कामांना गती मिळेल. मेडिकल, मार्केटिंग, विमा क्षेत्रात चांगला काळ.

