• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (११ ते १७ जुलै २०२६)

भास्कर आचार्य

marmik by marmik
July 10, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : मंगळ मेषेत, हर्षल वृषभेत, गुरु-शुक्र-कर्क राशीत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत, रवि-बुध-मिथुनेत, केतू सिंहेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : ११ जुलै भागवत एकादशी, १२ जुलै रोजी प्रदोष आणि शिवरात्री, १३ जुलै दर्श अमावस्या आरंभ : सायं. ६ वा. ५० मि., १४ जुलै दर्श अमावस्या समाप्ती, दुपारी ३ वा. १३ मि., १७ जुलै विनायक चतुर्थी.

 

मेष : कामे वेगाने पूर्ण होतील. व्यवसायातील आर्थिक अडचणी दूर होतील. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च होईल. मित्रांबरोबर सहलीला जाल. नोकरीच्या निमित्ताने दूरचे प्रवास कराल. तरुणांना नवी कामे मिळतील. आपल्या चांगुलपणाचा कुणाला गैरफायदा घेऊ देऊ नका. प्रेमप्रकरणात वाद होतील. चंगळवादी वृत्ती टाळा. नोकरीत गोड संवाद ठेवा. संशोधकांना नवीन संकल्पना यश देतील. मुलांना शिक्षणात यश मिळेल. विवाहेच्छुकांसाठी आगामी काळ उत्तम राहील. व्यवसायात नुकसान टाळा. वाहन चालवताना जपून.

वृषभ : प्रवासात त्रास होतील. नोकरीत कामाचे गणित बिघडेल. कुटुंबाची चांगली साथ मिळेल. महिलांना यश मिळेल. व्यवसायात वाद टाळा. कुटुंबासोबत प्रवासाला जाल. भावाशी जमवून घ्या. व्यवसायात नव्या कल्पना आणि नवे काम यातून आनंद मिळेल. आर्थिक बाजू चांगली राहील. नोकरीत कामाचा भार वाढेल. व्यवहारात काळजी घ्या. भावना, संवेदना बाजूला ठेवा. रागाला आवर घाला. घरातील वातावरण शांत ठेवा. तरुणांना समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करावे लागतील. घरातील आनंदात भर पाडणारी घटना घडेल. मनासारखी नोकरी चालून येईल.

मिथुन : आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या, अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. प्रवासातही सजग राहा. खिसा, पाकीट सांभाळा. जनसंपर्क क्षेत्रात यश देणारा काळ. सामाजिक क्षेत्रात गौरव होईल. व्यवसायात आत्मविश्वास आणि समाधान वाढेल. भागीदारी व्यवसायात निर्णय घेताना ताणाताणी करू नका. नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठ खूष होतील. तरुणांना विदेशात नोकरीची संधी येईल. सामाजिक कार्यात चांगला अनुभव येईल. नातेवाईकांशी संयमाने बोला. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. घरात मनासारख्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना यश मिळेल. संततीकडे लक्ष ठेवा.

कर्क : मौज-मजेवर वाढीव खर्च होईल. तरुणांची तब्येत बिघडेल. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. कामाचे गणित विस्कळीत होईल. पण, अडकलेले काम मार्गी लागेल. काही गोष्टी मनात ठेवा. नोकरीत जपून बोला. येणे वसूल होईल. शेजार्‍यांना मदत करावी लागेल. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. अचानक धनलाभाचे योग आहेत. दाम्पत्यजीवनात किरकोळ कुरबुरी घडतील. मित्रांशी वागताना-बोलताना काळजी घ्या. चेष्टा -मस्करी टाळा. नवीन ओळखीचा चांगला फायदा होईल. मोठे निर्णय सल्लामसलतीने घ्या.

सिंह : नोकरीच्या ठिकाणी मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठ मंडळींचे मन सांभाळा. बदली, पगारवाढीचे योग आहेत. घरात सांभाळून घ्या. कोणाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. खिशातले पैसे आणि खर्च यांची सांगड घालावी लागेल. नव्या व्यक्तीवर विश्वास टाकणे महागात पडेल. व्यवसायात अचानकपणे नव्या बदलांचा सामना करावा लागेल. मनावरील दडपण वाढून काही चुका होतील. आर्थिक व्यवहारात शॉर्टकट टाळा. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल. त्यात काळजी घ्या. कुटुंबाबरोबर भटकती होईल. बँकेची कामे पुढे सरकतील.

कन्या : नवीन परिचय होतील, त्यातून कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठ कामावर खूश राहतील. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. ज्येष्ठ नागरिकांशी वाद होतील. समाजकार्यात वेगळा अनुभव येईल. वाचन, ध्यान, यातून मन:शांती वाढीस लागेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात यश मिळेल. भावंडांशी संबंधित अचानक मोठा खर्च निघेल. शेअर, लॉटरीतून लाभ होईल. आध्यात्मिक कार्यातून आत्मविश्वास वाढेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जुने दुखणे पुन्हा डोके वर काढेल. अभियांत्रिकी क्षेत्रात यशदायी काळ. ब्रोकर मंडळींचे अडकलेले काम पूर्ण होईल.

तूळ : कोणाच्या मनाविरुद्ध काही करू नका. कामाला उशीर झाला म्हणून कोणाला बोल लावू नका. आठवड्याअखेरीस कामाचा कंटाळा येईल. मुले डोकेदुखी वाढवतील. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च होईल. तरुणांना यश मिळेल. खेळाडूंचा गौरव होईल. मोठ्या व्यक्तींच्या भेटीतून चांगला अनुभव मिळेल, आत्मविश्वास वाढेल. व्यवसायाची नवी संकल्पना पुढे येईल. महिलांच्या नव्या योजनांना गती मिळेल. नोकरीनिमित्ताने विदेशात असणार्‍या मंडळींना लॉटरी लागेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये. घरातील खर्चात वाढ होईल.

वृश्चिक : बुद्धीचातुर्यामुळे कामे मार्गी लागतील. अतिविश्वास दाखवणे टाळा. घरात धार्मिक कार्य होईल. तरुणांच्या मनासारखी संधी चालून येईल. कौटुंबिक यात्रा घडू शकते. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरीत आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी चालून येईल. व्यवसाय करताना हिशेबाचे व्यवहार बारकाईने सांभाळा. मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होईल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. क्रीडापटूंना यश मिळेल. कलाकारांचा सन्मान होईल. मालमत्त्ोच्या विषयात सकारात्मक गोष्टी घडतील. आनंद वाढवणारी बातमी कळेल. घरात छोटेखानी समारंभ घडेल.

धनु : व्यवसायात काही नवीन प्रयोग कराल. पती-पत्नीत वाद होतील. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. तरुणांनी संयम ठेवावा. नोकरीत काम पुढे नेण्यासाठी अधिकचे कष्ट पडतील. ध्येय सहज साध्य होईल. योजना यशस्वी होतील. निर्णय घेताना घाई टाळा. सरकारी कामात अडथळे येतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. भावाची तब्येत बिघडू शकते. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल. मोहाच्या गोष्टींच्या प्रेमात पडू नका. विज्ञान, कृषी क्षेत्रात आगामी काळ उत्तम जाईल. वाक्चातुर्याच्या जोरावर समोरच्याचे मन जिंकाल. सामाजिक कार्यात कौतुक होईल.

मकर : मोठे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. भागीदारी व्यवसायात चांगला फायदा होईल. नोकरीत वाद टाळा. आप्तेष्टमित्रांशी वागताना काळजी घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत ताण वाढेल. जमीनजुमल्याचे निर्णय घेताना विचार करून पाऊल पुढे टाका. नवे घर घेण्याचा विचार पुढे जाईल. तरुणांना करियरच्या, उच्च शिक्षणाच्या नव्या संधी चालून येतील. सरकारी कामात शॉर्टकट नको. व्यवसायात येणे वसूल होईल. तरुणांचा हिरमोड करणार्‍या घटना घडतील. कलाकार, संगीतकार, चित्रकारांना नव्या संधी मिळतील. कामाचे वेळापत्रक पाळा.

कुंभ : कोर्ट-कचेरीच्या कामात वेळ आणि पैसे खर्च होतील. नोकरी-व्यवसायातील अडचणींवर समंजसपणे मात करा. संयम ठेवा. आत्मविश्वास वाढेल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. महिलांना कामाच्या नवीन संधी चालून येतील. व्यवहारात काळजी घ्या. तरुणांचे कौशल्य कामी येईल. घरातील वातावरण बिघडवू नका. ज्येष्ठांबरोबर चांगला संवाद ठेवा. मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होईल. अचानक धनलाभ होतील. ज्येष्ठांना हाडाचे विकार त्रासदायक ठरतील. नव्या नोकरीचे प्रयत्न सफल होतील. कला क्षेत्रात काही मंडळी प्रसिद्धीच्या झोतात येतील.

मीन : मनातल्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल. नोकरी, व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तरुणांना स्पर्धेत अपेक्षति यश मिळेल. व्यवसायात नव्या योजना सहज सफल होतील. लॉटरी, सट्टा, शेअर यांच्या अधिक प्रेमात पडू नका. सामाजिक कार्य करणार्‍यांचा गौरव होईल. नवीन वास्तू घेण्याच्या योजनेला गती मिळेल. नवीन वाहन खरेदी कराल. व्यवसायात घवघवीत यश मिळवून देणारा काळ. नोकरदारांना आर्थिक नियोजनाची गरज राहील. निर्णय घेताना अति आत्मविश्वास टाळा. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. पोटातल्या गोष्टी ओठावर आणू नका. नोकरीत डोक्यावर बर्फ ठेवून काम करा.

Previous Post

या बालांनो या रे या ऽऽऽ

Next Post

‘राँग नंबर’चा फटका!

Next Post
‘राँग नंबर’चा फटका!

‘राँग नंबर’चा फटका!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.