ग्रहस्थिती : मंगळ मेषेत, हर्षल वृषभेत, गुरु शुक्र कर्केत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत, रवि-बुध मिथुनेत, केतू सिंहेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : ७ जुलै कालाष्टमी, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान, देहू, ८ जुलै संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान, आळंदी, १० जुलै योगिनी स्मार्त एकादशी

मेष : नोकरीत मनासारखी स्थिती राहील. सहकारी मदत करतील. व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. कुटुंबाबरोबर दूरचे प्रवास घडतील. नियोजित कामात अडथळे येतील. मित्रांची मदत घेताना जपून. मालमत्तेचे विषय मार्गी लागतील. तरुणांना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. वाणीवर ताबा ठेवा. घाई न करता निर्णय घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिकांना नव्या कामाच्या संधी मिळतील. घरातील वातावरण शांत ठेवा. ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारीमुळे खर्च वाढेल. नव्या ओळखी कामी येतील. महिलांचा आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील.

वृषभ : व्यवसायात मोठे धाडस करू नका. डोळ्यांचे विकार त्रास देतील. तरुणांना नोकरीची संधी मिळेल. नोकरीत कामाचे दडपण कमी होईल. नव्या घराचा प्रश्न मार्गी लागेल. भागीदारीत आर्थिक बाजू कमकुवत होईल. वाद टाळा. मुलांकडून आनंदवर्धक बातमी कळेल. नोकरीत कौशल्य कामाला येईल. महिलावर्गाला अपेक्षित यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. जवळच्या व्यक्तीचा भाग्योदय होईल. त्यानिमित्त घरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईक, मित्र भेटतील.

मिथुन : नोकरीत कामाचा गोंधळ होईल. वरिष्ठ नाराज होतील. कुटुंबाची चांगली साथ मिळेल. व्यवसायात कुरबुरी होतील. तरुणांना अनपेक्षित यश मिळेल. मित्रांबरोबर मौजमजा कराल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. fिववाहेच्छुकांसाठी चांगला काळ. सकारात्मक विचारांना चालना द्या. नोकरी-व्यवसायात आत्मविश्वास वाढेल. नव्या नोकरीच्या शोधात असणार्यांना मनासारखी संधी मिळेल. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होणे टाळा. बँकेची कामे अनपेक्षितपणे मार्गी लागतील. मुलाकडून चांगली कामगिरी घडेल.

कर्क : व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. उच्च शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. नोकरीत कामात विस्कळीतपणा येईल. जनसंपर्क क्षेत्रात नवीन संधी येतील. तरुणांना कामे पुढे नेण्यासाठी अधिकचे कष्ट करावे लागतील. कलाकार, अभिनेते यांच्यासाठी चांगला काळ. खेळाडूंकडून चमकदार कामगिरी होईल. सामाजिक कार्यात चांगला अनुभव येईल. गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवण्याच्या आमिषाला बळी पडू नका. नव्या संकल्पना यश देतील. अरेला कारे करण्याच्या भानगडीत पडू नका. अचानक धनलाभ होईल.

सिंह : नोकरीत कामाचे कौतुक होईल. तरुणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायानिमित्ताने अधिकचा प्रवास करावा लागेल. मित्रांशी चेष्टा-मस्करी टाळा, गैरसमज होतील. वाद टाळा. मनातल्या गोष्टी ओठावर आणू नका. घरात आनंददायी बातम्या कळतील. प्रवासात काळजी घ्या. सहलींमधून मौज-मजेचा आनंद घ्याल. महिलांना कामाच्या अपेक्षित संधी मिळतील. शिक्षण, संशोधन, विज्ञान या क्षेत्रात नव्या संधी चालून येतील. आत्मविश्वास आणि कामाचा वेग वाढेल.

कन्या : व्यवसायात नवीन क्षेत्रात प्रवेश कराल. आर्थिक नियोजनात खबरदारी घ्या. घरात मतभेद टाळा. समाजकार्यात महिलांच्या कामाचे कौतुक होईल. तरुणांचे निर्णय चुकतील. घाईत निर्णय करू नका. अहंकार दूर ठेवा. संयम ठेवा. कामे हलकी होतील. घरात वागताना बोलताना विचार करा. मित्रांशी बोलण्यामधून गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. कामासाठी विदेशात जाण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक नियोजनात गडबड होईल. जवळच्या व्यक्तीबाबत चिंता सतावेल. कोर्ट-कचेरीची कामे पुढे सरकतील.

तूळ : व्यवसायात आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरीत अधिकचे कष्ट करावे लागतील. नवीन वास्तूचे व्यवहार करताना जपून. घरात मतभेद होतील. मुलांकडून आनंद वाढवणारी बातमी मिळेल. मामा-मावशींची मदत मिळेल. महिलांनी अति विश्वास दाखवणे टाळावे. शेअर, लॉटरीतून लाभ होतील. कमी बोला आणि अधिक काम करा. तरुणांना अपेक्षित यश देणारा काळ. कलाकार, चित्रकारांच्या कामाचा गौरव होईल. बुद्धिचातुर्याच्या जोरावर यश मिळवाल. अति उत्साह दाखवणे टाळा. नव्या योजनांना, सकारात्मक विचारांना गती मिळेल. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल. विवाहेच्छुंसाठी आगामी काळ चांगला राहील.

वृश्चिक : नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग जुळून येतील. व्यवसायात प्रवास करावा लागेल. आमदनी आणि खर्च यांचा मेळ घालावा लागेल. तरुणांच्या कर्तृत्वाला संधी मिळेल. व्यवसायात आत्मविश्वास वाढेल. सरकारी कामे पुढे नेताना सरळ मार्गाचा विचार करा. समाजकार्यात गौरव होईल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. संततीकडून चांगली बातमी कळेल. क्रीडापटूंना यश मिळेल. मालमत्तेच्या प्रलंबित प्रश्नाबद्दल सकारात्मक गोष्टी घडतील. मार्केटिंग, रियल इस्टेटमध्ये यश मिळवून देणारा काळ.

धनु : घरातल्या कामाच्या जबाबदार्या वाढतील. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरीत कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. व्यवसायात तीव्र स्पर्धा जाणवेल. आरोग्याच्या समस्या डोके वर काढतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कागदपत्रे तपासूनच सही करा. नवीन घर घेण्याच्या विषयाला गती मिळेल. तरुणांना यश देणारा काळ. बोलताना संयम ठेवा. विज्ञान, कृषीक्षेत्रात आगामी काळ उत्तम जाईल. जुने मित्र भेटतील, त्यामधून भ्रमंती, मौजमजा होईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. बंधू वर्गाची तब्येत सांभाळा.

मकर : घरासाठी वेळ खर्च होईल. व्यवसायात चांगले दिवस अनुभवाल. खेळाडूंचा गौरव होईल. अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. बँकेची कामे मार्गी लागतील. कलाकारांना नव्या संधी लाभतील. नोकरीत लहान चूक महागात पडेल. बोलताना अहंकारी वृत्ती दाखवणे टाळा. वादाचे प्रसंग घडू शकतात. काही गोष्टी मौनात राहून साध्य करा. महिलांच्या बाबतीत आदरभाव ठेवा. सार्वजनिक जीवनात काळजी घ्या. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. कामाचे वेळापत्रक पाळा.

कुंभ : सभ्यता कामाला येणार आहे. घरातील लोकांच्या अडचणी सोडवा. खर्चाचे गणित बिघडेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. तरुणांच्या कामाचे कौतुक होईल. समाजकार्यात मान-सन्मान वाढवणार्या घटना घडतील. आठवड्याच्या उत्तरार्धात कामाचा कंटाळा येईल. व्यवसायात अधिक श्रम घ्यावे लागतील. डोळे झाकून आर्थिक व्यवहार करू नका. घरातील वातावरण बिघडू देऊ नका. ज्येष्ठांशी चांगला संवाद ठेवा. नोकरीत अच्छे दिन अनुभवाल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. काम करताना थोडे सबुरीने घ्या.

मीन : चिंता वाढवणारी घटना घडेल. नोकरीत बदली होईल. विदेशात जाण्याची संधी चालून येईल. कुटुंबासाठी वेळ खर्च कराल. महागड्या वस्तूंची काळजी घ्या. व्यवसायात अधिक कष्ट पडतील. तरुणांसाठी यशाची दारे खुली होतील. स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल. लग्न जुळण्याचे योग आहेत. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. कायदेशीर कटकटी त्रासदायक ठरतील. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न त्रासदायक ठरतील. नवीन वास्तू घेण्याच्या योजनेला गती मिळेल. व्यवसायात घवघवीत यश मिळवून देणारा काळ.

