• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खापरपोळी

शुभांगी जोशी (चवदार साठवण)

marmik by marmik
July 2, 2026
in चवदार साठवण
0
खापरपोळी

काही कारणाने आई माझ्याकडे आली होती. योगायोगाने तारीख होती ८ मार्च. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मी आईला विचारले, ’काही पदार्थ काळाआड गेलेले… तुला तुझ्या आईने खायला दिलेले, पण तो पदार्थ तू कधीच केला नाहीस, आणि तो आपल्याला करता आला नाही याची रुखरुख वाटते असा कोणता विशेष पदार्थ तू मला सांगशील?’

क्षणाचाही विलंब न करता पटकन उत्तर आले, ‘खापरपोळी’.

‘आई, मला शिकवच हा प्रकार,’ म्हणून मी मागे लागले. जरा काळजीने मला म्हणाली, ’तुझ्यामागे व्याप काय कमी आहेत! नसते खूळ डोक्यात घेऊ नकोस. हे बघ, आजी चुलीवर खापर ठेवून हे करीत असे. आता चूल आणा, खापर शोधा, लाकडे व गोवरी गोळा करा, परत धूर होणार तो वेगळाच.’

बोलता बोलता आईने खापरपोळी करायसाठी काय काय लागणार ते सांगितले होते. या सर्व प्रकरणाचा निकाल अवघ्या दहा मिनिटांत लावला. जय्यत तयारी करून ठेवली. दुसर्‍या दिवशी सकाळी छान साग्रसंगीत खापरपोळी बनविण्याच्या सोहळ्याची तयारी झाली. अंगणात चूल लावली. बाकी आईने सांगितलेले सर्व साहित्य निगुतीने लावून घेतले. शेण्यांचा वापर करून, चुलीत घातलेली लाकडे प्रज्वलित केली. त्यासाठी झालेला धूर आनंदाने सहन केला.
आता खापरपोळीचे साहित्य व कृती पाहूया.

साहित्य :
२ वाट्या तांदळाची पिठी
१ वाटी पातळ पोहे
१ चमचा लोणी
अर्धा वाटी तेल
चवीपुरते मीठ

कृती :
१. रात्री पाण्यात तांदूळाची पिठी भिजत घाला. सरसरीत भिजवा.
२. जेव्हा आपण पोळी करणार आहोत त्याच्या आधी पोहे धुवून घ्या. पोहे भिजले की त्यांना लोणी लावून कुस्करून भिजवलेल्या पिठात एकत्र करा. किंचित मीठ घालून मिश्रण फार पातळ अथवा फार घट्टही नसेल, असे करा.
३. खापर धुवून घ्या, जरा हडकलं की चुलीवर चांगले १० मिनिटे तापवून घ्यायचे.
४. तापलेल्या खापराला तेल लावा आणि भांड्यात पीठ घेऊन एकाच जागी ओतायचे. पसरवायचे नाही. झाकण ठेवा. वाफ आल्यावर उलटा आणि बाजूने तेल सोडून भाजा.

खापरपोळी खायची कशाबरोबर?
१. नारळाचे दूध आणि गूळ यांच्या मिश्रणाशी. पहिली तव्यावरची पोळी नारळाच्या दुधात भिजवायची. तोपर्यंत दुसरी पोळी खापरावर घालायची. ती होईपर्यंत पहिली पोळी छान मुरते दुधात. मग पानात घेऊन हवे असल्यास त्यावर अजून दूध घेऊन खाऊ शकता.
२. नुसते दूध आणि गूळ
३. नाहीतर कोणत्याही चटणीबरोबर.
हा सर्व सोपस्कार सोपा नाही याची पुरेपूर कल्पना आहे. पण एका स्त्रीने दुसर्‍या स्रीचा आदर करण्याचा तो दिवस होता ८ मार्च, महिला दिन! माझ्या आईला तिच्या आईने शिकवलेला पदार्थ तिने मला सांगितला. ते सांगताना तिला वाटणारी रुखरुख ही होती की तो पदार्थ तिला करता आला नाही… ही रुखरुख काही प्रमाणात तरी आज दूर झाली, त्याचे समाधान काही वेगळेच. एकप्रकारे हा आजी, आई व मी या परंपरेचा जणू महिलादिनी आनंदोत्सव झाला.
ही पोळी करताकरता ‘खापरपणजी’ या शब्दातील वात्सल्य मनाला येऊन बिलगले.

टीप :
१. खापरावरच करायला हवी पोळी हे जरी खरे असले तरी निर्लेप तवा, बिडाचा तवा यापैकी कशावरही तुम्ही ती करू शकता. हल्ली तर मातीचे पातळ तवेही मिळतात.
२. तांदूळ पिठी तीन ते चार तास भिजली तरी पुरेसे होते.

Khamang.blog
khamangbyShubhangi YouTube Channel

Previous Post

ॐ क्षुधा शांती

Next Post

गद्दारांची हास्यजत्रा!

Next Post
गद्दारांची हास्यजत्रा!

गद्दारांची हास्यजत्रा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.