• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आंब्राई

श्रीकांत आंब्रे

marmik by marmik
June 8, 2026
in आंब्राई
0
आंब्राई

सरन्यायाधीश सूर्यकांत
आम्ही म्हणजे देवतुल्य हो
आमचा शब्द नेहमी प्रमाण
जे जे बोलू ते ते सत्य
सत्याशिवाय नाही इमान

आम्ही नाही दवडत कधीही
तोंडाच्या या फुकट वाफा
कधीच नाही मारत आम्ही
बोलघेवड्या निव्वळ थापा

आमच्या शब्दांचे होते ते
ब्रह्मवाक्यही सदासर्वदा
संशयाने त्या नकाच पाहू
नाहीतर येईल घोर आपदा

डोनाल्ड ट्रम्प
मुर्ख बनविले इतरांना मी
मुर्ख कधीच नव्हतो मी
मी डिक्टेटर क्रूर राक्षसी
ज्वाळ सूडाचा होतो मी

ट्रम्प मुर्ख ही तर बदनामी
मुळीच नाही मान्य मला ती
ब्रह्मराक्षस म्हणा तुम्ही मज
शोभून दिसेल मज उपमा ती

मुर्खासारखा जरी वाटलो
कळला नाही ट्रम्प कुणाला
तुम्हीच बनला मुर्ख तरीही
त्याचे नाही भान तुम्हाला

नरेंद्र मोदी
माझी नाही चूक मुळी ती
ट्रम्पाजीने दिला दणका
हाडे झाली खिळखिळी तुमची
मोडत चालला एकेक मणका

भरपूर केली मौजमजा ती
लुटला जनतेचा हा पैसा
दहा वर्षातच बुरे दिन हे
विकासाचाही झाला कोळसा

आमचे चेले पाहा कसे ते
उडती तरीही टणटणाटण
सात पिढ्यांची केली कमाई
नाणी वाजती खणखणाखण

भ्रष्टाचार
आजपर्यंत समजत होतो
राजकारणी भ्रष्टाचारी
आज पाहतो गुरुवर्य हे
त्यांच्यापेक्षा कितीतरी भारी

परीक्षा ह्या तर नावापुरत्या
बाजाराभावांचे व्यापारी
करिती सौदे आयुष्याचे
घेती लाखोंची सुपारी

होती डॉक्टर, उच्च अधिकारी
जीव घेती ते दीनदुबळ्यांचा
नसे नायकी तरीही तत्पर
घ्यास घ्यावया अस्सलतेचा

महाराष्ट्र
ओला दुष्काळ-सुका दुष्काळ
काय ताप जनतेच्या माथी
पाण्यासाठी वणवण फिरती
अच्छे दिनचे गाणे गाती

इतकी वर्षे सहन केले ना
सहन करा फक्त एकच वर्ष
साठवून ठेवा एकेक पैसा
नंतर फक्त हर्षच हर्ष

सोने-नाणे-पेट्रोल-डिझेल
जाऊंद्या सारे मरणालागूनी
आयुष्याची झाली माती
इमानानेही सदा वागूनी

Previous Post

राशीभविष्य (६ ते १२ जून २०२६)

Next Post

निगमाच्या वनात वनमाळी नाही!

Next Post
निगमाच्या वनात वनमाळी नाही!

निगमाच्या वनात वनमाळी नाही!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.