मेष : आरोग्याच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष द्या. नोकरी-व्यवसायानिमित्ताने लांबचे प्रवास होतील, त्यात त्रासदायक प्रसंग घडतील. कामे मागे पडतील. नातेवाईकांशी जमवून घ्या. राग आणि वाद यांच्यापासून दूर राहा. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर पडतील. तरुणांची कामे पूर्ण होतील. मनासारख्या नोकरीची संधी चालून येईल. जनसंपर्क अधिकारी, प्रकाशक, पत्रकार, लेखक, कलाकारांना चांगले दिवस येतील. महिलांना कामातून मिळणारा आनंद द्विगुणित होईल. विवाहाचे योग जुळून येतील. मुलाकडून आनंददायी बातमी कळेल. व्यवसायात नव्या योजना यशस्वी होतील.

वृषभ : घरातील वातावरण आनंदी राहील. शुभकार्य होईल. नातेवाईक-मित्र यांच्या गाठीभेटी होतील. प्रेमप्रकरणात वाद होतील. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. नवीन वास्तू घेण्याचा विषय पुढे सरकेल. व्यवसायात काम व वेळेचे गणित बिघडेल. अचानक प्रवास करावे लागतील. न गोंधळता निर्णय घ्या. तरुणांना वाढीव कष्ट घ्यावे लागतील. अहंकार दूर ठेवा. संयम कामी येईल. शैक्षणिक प्रश्न, नव्या नोकरीच्या संधी असे प्रश्न मार्गी लागतील. कलाकार, संगीतकार, गायकांसाठी उत्तम काळ.

मिथुन : धाडस आणि अतिआत्मविश्वासामुळे कामाचे गणित बिघडेल. मित्रांना आर्थिक मदत करताना काळजी घ्या. मोठे आर्थिक व्यवहार करताना गोंधळ उडू शकतात. व्यवसायात नव्या कल्पना सुचतील. नियोजन करून पुढे जा. तरुणांना नव्या नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत सकारात्मक वातावरणातून प्रगती साधू शकाल. मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होईल. मामा-मावशींकडून चांगली मदत होईल.कोणावरही अति विश्वास दाखवू नका, अडचणीत याल.

कर्क : अडकलेली सरकारी कामे पुढे जातील. नवीन ओळखीचा लाभ होईल. तरुणांनी मनातल्या गोष्टी ओठावर आणणे टाळावे. व्यवसायात यश मिळेल. उलाढाल वाढेल. येणे वसूल होईल. सल्ला घेऊनच मोठे निर्णय घ्या. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. भावनेत अडकून राहू नका. कलाकार, संगीतकार, लेखकांचा मानसन्मान होईल. समाजकार्यातून समाधान मिळेल. घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. नोकरदारांची सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील.

सिंह : मनासारखी कामे होणार नाहीत. राग व्यक्त करू नका. शांत बसा. व्यवसायात वाद नकोत. स्पर्धेचा सामना करावा लागेल. तरुणांना कामे पुढे नेण्यासाठी वाढीव कष्ट करावे लागतील. नोकरीत कामात चुका टाळा. जुनी येणी अचानक पदरात पडतील. नातेवाईक, मित्रांची मदत होईल. नोकरीत नव्या जबाबदार्या मिळतील. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. घरात आपलेच खरे करू नका. भागीदारीत मनस्ताप वाढेल. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा.

कन्या : घरात भरपूर वेळ खर्च होईल. व्यवसायात नियोजन कामी येईल. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. नवीन व्यवसाय सुरू होईल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. खेळाडूंना अधिकचे कष्ट घ्यावे लातील. सामाजिक कार्याचा गौरव होईल. भागीदारीत चांगले यश मिळेल. पित्ताचा त्रास असणार्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. नोकरीत सामोपचार राखा. अहंकार व हेकेखोर वृत्तीपासून दूर राहा. मित्रांमध्ये मत व्यक्त करताना काळजी घ्या. गैरसमज टाळा. नव्या ओळखीने काम पूर्ण होईल.

तूळ : वास्तूचे अडकलेले काम मार्गी लागेल. पत्नीच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. नोकरी-व्यवसायात मनासारखी स्थिती राहील. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. मोठे आर्थिक व्यवहार करताना योग्य काळजी घ्या. सरकारी कामे पुढे जातील. जुने येणे वसूल होईल. तरुण बुद्धीच्या जोरावर यश मिळवतील. सकारात्मक ऊर्जा वाढेल. खेळाडूंना यश मिळेल. कामात निस्वार्थी वृत्तीचा फायदा होईल. व्यवसायात लाभ मिळेल. भागीदारीत कटकटी होतील. वडीलधार्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचे काम आजच पूर्ण करा. आठवड्याअखेर मनाची प्रसन्नता वाढेल. कलाकार, लेखकांचा सन्मान होईल.

वृश्चिक : कामाचा झपाटा दाखवाल. महिलांना, तरुणांना यश मिळेल. कोणाच्याही म्हणण्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळा. पत्नीची मदत होईल. आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. दंतविकार त्रास देतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. यशासाठी शॉर्टकटची निवड करू नका. नवीन वास्तू घेण्याचा विचार पुढे सरकेल. व्यवसायातून चांगली उलाढाल झाल्याने चार पैसे शिल्लक पडतील. ब्रोकर, मार्केटिंग अधिकारी यांना अनपेक्षित लाभ मिळतील. नोकरीत बदली होईल. कौटुंबिक प्रश्नाकडे दुर्लक्ष नको.

धनु : अपूर्ण राहिलेले काम अलगद पूर्ण होईल. गुरुकृपा राहील. मुलांना यश मिळेल. महिलांनी आरोग्य सांभाळावे. विवाहेच्छुंसाठी चांगला काळ. सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी शॉर्टकट टाळा. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. स्पर्धेत यश मिळेल. प्रेमप्रकरणाला वादाची किनार लाभेल. नव्या ओळखींमधून नवा प्रोजेक्ट आकाराला येईल. नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात मोठा निर्णय घेताना आर्थिक बाजूचा लेखाजोखा घ्या. घरात एखादा निर्णय घेताना त्यात भावना आणू नका.

मकर : प्रवासात खबरदारी घ्या. व्यवसायातल्या मोठ्या योजना यशस्वी होतील. नोकरीत वरिष्ठांचे मन सांभाळा. तरुणांचे कामाचे गणित बिघडू शकते. अहंकार त्रासदायक ठरेल. घरातील आनंदात भर पडेल. मित्रांना सल्ले देणे, मध्यस्थी करणे, यापासून दोन हात दूर राहा. आरोग्याचे गणित बिघडेल. सकारात्मक विचारातून चांगले अनुभव येतील. भागीदारीत आव्हानांचा सामना करावा लागेल. महिलांना आरोग्याचे प्रश्न सतावतील. आर्थिक व्यवहारात घाई नको. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील.

कुंभ : पैशाची आवक आणि खर्च यांचा अंदाज चुकेल. घरात वेळ द्यावा लागेल. नोकरीत जबाबदारीचे काम येईल. दूरचे प्रवास करावे लागतील. व्यवसायात अचानक कामाचा ताण वाढेल, नियोजन करूनच पुढे जा. शिक्षण क्षेत्रात गौरव होईल. कलाकारांसाठी उत्तम काळ. भावाबहिणींचे चांगले सहकार्य मिळेल. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात चांगली बातमी कळेल. तरुण मौजमजेवर पैसे खर्च करतील. वाहन चालवताना काळजी घ्या. कुणी गोड बोलले म्हणून शब्दात अडकू नका. तत्वावर ठाम राहून निर्णय घ्या.

मीन : व्यवहारात कटुता टाळा. सरकारी काम न झाल्यास नाराजीचा सूर आळवू नका. संयम कामी येईल. एखादा निर्णय घेताना धाडस दाखवावे लागेल. मनातल्या गोष्टी बोलू नका. नोकरीत अचानक सकारात्मक बदल होतील. व्यवसायात खिसा भरलेला राहील. तरुणांचा कल जल्लोष करण्याकडे राहील. स्पर्धेत यश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी अरेरावी नको. आर्थिक बाजू चांगली ठेवण्यासाठी योग्य नियोजन करा. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. व्यवसायात अधिकचे श्रम करावे लागतील.
