• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

marmik by marmik
June 5, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
बाळासाहेबांचे फटकारे

1641_UT_MARMIK CO 2_V64

२८ जून १९६४ या तारखेच्या मार्मिकचे हे जळजळीत मुखपृष्ठ चित्र. पूर्ण मुखपृष्ठामध्ये या चित्राच्या वर, इथे न दिसणारं, बाळासाहेबांच्या अग्रलेखाचं शीर्षकही आहे, त्यात त्यांनी देशातल्या अन्नटंचाईचं खापर सरकारची नालायकी, बेपर्वाई आणि भ्रष्टाई यांच्यावर थेट फोडलं होतं. हा देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाला एक महिनाच झाल्यानंतरचा काळ होता. बाळासाहेबांसारखे पत्रकार संपादक सरकारवर खरपूस टीका करत होते आणि देशातल्या जनतेची काय अवस्था झाली आहे, हे भेदक चित्रातून दाखवूही शकत होते. हे चित्र निव्वळ विषयासाठी महत्त्वाचं नाही. काळा, करडा आणि पांढरा या रंगांच्या वापरातून आणि चित्रामधल्या अफाट संतुलनातून बाळासाहेबांनी परिस्थितीचं गांभीर्य किती प्रभावीपणे रेखाटलं आहे. वाईट काळासाठी योजलेला काळा रंग चित्रात जवळपास अर्धी जागा व्यापून आहे. त्यातच स्वराज्याचा सूर्य आणि त्याला झाकणारा अन्न परिस्थिती, भ्रष्टाचार आणि महागाईचा चंद्र यांची नाट्यमय रचना आहे. खाली करडे ढग आणि सर्वात खाली, संकटांपुढे छोटे दिसणारे फाटक्या कुटुंबाचे सदस्य… त्यांच्या देहाकृती, हावभाव आणि चेहर्‍यांमधून त्यांची भुकेकंगाल अवस्था जिवंत झाली आहे… आजही देशात हीच स्थिती आहे, पण, सत्ताधार्‍यांना बकरी ईदच्या बकर्‍यांचं राजकारण करायचं आहे, सारसबाग बंद ठेवण्याचा कोतेपणा करायचा आहे, पंतप्रधानांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत भरपूर पाणी पीत चला असा सल्ला द्यायचा आहे आणि चाटुकार मीडियाला जनतेचे हाल दाखवायचे नाहीत, हीच लक्ष उडवणारी चापलुसी चालवायची आहे. सरकारपेक्षा प्रसारमाध्यमांची ही नालायकी अधिक दु:खदायक आहे. त्यांच्यावरचा विश्वास उडवणारी आहे.

Previous Post

रक्षक

Next Post

पुरोगामी चेहरा पुसण्याचे षडयंत्र!

Next Post
पुरोगामी चेहरा पुसण्याचे षडयंत्र!

पुरोगामी चेहरा पुसण्याचे षडयंत्र!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.