• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (३० मे ते ५ जून २००६)

भास्कर आचार्य

marmik by marmik
May 29, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : मंगळ मेष राशीत, गुरु-शुक्र मिथुन राशीत, प्लूटो-मकर राशीत, राहू कुंभ राशीत, शनि-नेपच्युन मीन राशीत, रवि-बुध-हर्षल वृषभेत, केतू सिंह राशीत. दिनविशेष : ३ जून संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रा. ९ वा. ४६ मि.

 

मेष : व्यवसायात अडचणी येतील. आर्थिक बाजू सांभाळा. नोकरीत शांतता कामी येईल. तरुणांना यश मिळेल. घरात वाद टाळा. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. आरोग्याचे त्रास उद्भवतील. मित्रांशी वागताना काळजी घ्या. मानापमानचे प्रसंग टाळा. नवे बदल स्वीकारा. नव्या व्यवसायाच्या योजनांना आकार मिळेल. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांची अडकलेली कामे मार्गी लागतील. आठवड्याअखेर घरात उत्साहवर्धक वातावरण राहील. व्यवहारात घोळ टाळा. कोणावर अति विश्वास टाकू नका. मुलांचे आरोग्य सांभाळा. नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करणे टाळा.

वृषभ : नोकरीत गैरसमज टाळा. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. नियोजनास महत्व द्या. कामानिमित्ताने प्रवास कराल. वेळेचे गणित सांभाळा. वाद उकरून काढू नका. मालमत्तेचा व्यवहार पुढे ढकला. ज्येष्ठांच्या मताचा आदर करा, फायदा होईल. तरुणांच्या कर्तृत्वाला आकार देण्याची संधी चालून येईल. राग अनावर होऊ देऊ नका. मन शांत ठेवा. नवीन लोकांच्या संपर्कातून काही कामे पुढे जातील. शुभघटना कळाल्याने कामातला उत्साह वाढेल. घरासाठी महागड्या वस्तूची खरेदी होईल.

मिथुन : नोकरी, व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. मुलांच्या समस्या सोडवण्यात वेळ जाईल. भागीदारीत वाद होतील. घरात दगदग होईल. छोट्या कारणाने राग येईल. जनसंपर्क, पत्रकारितेत नवे काम मिळेल. साहित्यिक व कलाकारांचा गौरव होईल. सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. प्रवासात आरोग्य सांभाळा. तरुणांच्या लौकिकात भर पडेल. पत्नीची मदत होईल. सामाजिक कार्यात यश देणारा काळ. मुलांकडे लक्ष ठेवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

कर्क : नोकरीत वाढीव कष्ट पडतील. खर्च वाढतील. तरुणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नवीन घर घेण्याचा विषय पुढे सरकेल. सामाजिक कार्यात गौरव होईल. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील. कलाकार, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक यांना जास्त यश मिळेल. विवाहेच्छूंसाठी चांगला काळ. आर्थिक बाजू सांभाळा. नातेवाईकांकडून मदत होईल. वादात मध्यस्थी करणे टाळा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आठवड्यात मन प्रसन्न ठेवणार्‍या घटना घडतील. विदेशात नोकरी मिळेल.

सिंह : नोकरीत मनासारखी स्थिती राहील. महिलांचा सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. व्यवसायात यश मिळेल. तरुणांचा मौज-मजेकडे कल राहील. मुलांचा गौरव होईल. खेळाडूंना यश मिळेल. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. चित्त शांत ठेवून निर्णय घ्या. आवडत्या कामात वेळ जाईल. अहंकार डोक्यात ठेवून काम करू नका. कसोटीच्या क्षणांचा सामना करावा लागेल. कामात नियोजन सर्वात महत्वाचे. जमीन-जुमल्याचे व्यवहार करताना जपून. कलाकारांचा उत्कर्ष होईल. उधार-उसनवारी टाळा.

कन्या : नवीन वाहनाची खरेदी कराल. व्यवसायातले प्रश्न तज्ज्ञांच्या सल्ल्याने सोडवा. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. महिलांना यश मिळेल. बँकेच्या व्यवहारात काळजी घ्या. कलाकारांचा गौरव होईल. घरात छोटेखानी समारंभ होईल. जुने मित्र भेटतील. आर्थिक सल्लागार, जनसंपर्क अधिकारी यांना नव्या संधी मिळतील. नोकरीत वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. मित्रांच्या प्रलोभनाला बळी पड्रू नका. जुनी गुंतवणूक चांगला लाभ देईल. घरात आणि बाहेर संयम ठेवा, सकारात्मकता टिकवा.

तूळ : नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. सरकारी कामे पुढे सरकतील. व्यवसायात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण होईल. मित्रांचे चांगले सहकार्य लाभेल. कुटुंबियांबरोबर पर्यटनाला जाल. परिस्थिती स्वीकारून पुढे जा. बोलण्यात स्पष्टता ठेवा, गोड बोलून काम पुढे जाईल, शब्दाकडे लक्ष द्या. कुटुंबातील वातावरण चांगले ठेवा. ब्रोकर मंडळींनी व्यवहारात काळजी घ्यावी. तरुणांना नव्या नोकरीची संधी येईल. सरकारी कर्मचार्‍यांनी नियम पाळावे. बुद्धिवादी, विचारवंत, लेखकांचा सहवास लाभेल. वडीलधार्‍यांचा आदर ठेवा. आर्थिक बाजू चांगली ठेवण्यासाठी नियोजन कामी येईल.

वृश्चिक : घरात कटकटी होतील. आमदनी आणि खर्चाचा ताळमेळ ठेवा. तब्येत बिघडेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. मोठे निर्णय घेताना सावधान. सकारात्मक विचारांमुळे समस्या कमी होतील. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. तरुणांनी तडजोड करण्याचे धोरण ठेवावे. व्यवसायात कर्तृत्वावर चार चाँद लागतील. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. शेअर, लॉटरी, सट्टा यामधून आर्थिक लाभ होतील. वडीलधार्‍यांचे ऐका. वाहन जपून चालवा. थकीत येणे वसूल होईल. व्यवसायात नोकरांकडून त्रास होईल.

धनु : नोकरीत नवीन जबाबदारी पडेल. मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. तरुणांनी निर्णय घेताना घाई करू नये. मौज-मजा सहलीवर खर्च होईल. कामे पुढे नेताना सल्ला घ्या. अनेक दिवसांपासून डोक्यात सुरू असणारे विषय मार्गी लागतील. व्यवसायात सामंजस्य दाखवा. डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवा, कामे अलगद पुढे सरकतील. उच्चशिक्षणाचा प्रश्न पुढे जाईल. अचूक आर्थिक नियोजन करा. घरासाठी वेळ द्यावा लागेल. कामानिमित्ताने बाहेरगावी जाल. नोकरीनिमित्ताने विदेशवारी होईल.

मकर : नोकरी-व्यवसायात कामाचे गणित विस्कळीत होईल. दगदग वाढेल. भागीदारीतले व्यवहार टाळा. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. नवीन गुंतवणूक जपून करा. मुलांनी एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. नव्या नोकरीची संधी मिळेल. आरोग्याची छोटी तक्रार हलक्यात घेऊ नका. विवाहेच्छूंसाठी चांगला काळ. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या समस्या दूर होतील. विदेशात उच्चशिक्षणाच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिक व्यवहारांत पारदर्शीपणा ठेवा.

कुंभ : मित्रांबरोबर गैरसमज निर्माण करणारे प्रसंग घडतील. व्यवसायात यश मिळेल. नोकरीनिमित्ताने प्रवास कराल. मालमत्तेचा व्यवहार लांबणीवर पडतील. पत्नीसाठी मोठी खरेदी होईल. आत्मविश्वासाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. तरुणांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. नातेवाईकांशी मतभेद होतील. संशोधन, वैद्यक या क्षेत्रांत उत्तम काळ. पर्यटनाला जाण्याचे प्लॅन निश्चित कराल. कलाकार, पत्रकारांसाठी उत्तम काळ. अपेक्षित यश मिळेल. साहसी निर्णय घेताना काळजी घ्या.

मीन : नियोजित कामे पुढे नेताना अडचण येईल. व्यवसायात नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा. नोकरीत अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबात वावरताना जमवून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. क्षमता ओळखून पुढे जा. सरकारी कामांत शॉर्टकट टाळा. सामाजिक कार्यातून ऊर्जा मिळेल. बंधूबरोबर वाद होतील. सामाजिक क्षेत्रात चांगला अनुभव येईल. मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक प्रश्न मार्गी लावताना कसरत करावी लागेल. मुलांच्या बाबतीत चिंता वाढेल. तरुणांचा वेळ मौजमजेत खर्च होईल.

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

झुरळांना न्याय हवा!

Next Post
झुरळांना न्याय हवा!

झुरळांना न्याय हवा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.